Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 5
________________ कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा ३२७ करतो. परिचय दिल्यास लेख वाढेल. त्यातील उल्लेखनीय कवि खालील प्रमाणे आहेत. नेमिनाथ पुराणाचा कर्ता कवि कर्णपार्य (११४०), चंद्रप्रभ पुराणाचा कर्ता अग्गलदेव (१९८९), वर्धमान चरित्राचा कर्ता कवि आचण्णा (११९५), पुष्पदंत पुराणाचा निर्माता कवि गुणवर्म (१२३५), शांतीश्वर पुराणाचा रचयिता कवि कमलभव (१२३५), नेमिनाथ पुराणाचा रचयिता कवि महाबल (१२५४), धर्मनाथ पुराणाचा कर्ता मधुर कवि ( १३८५) यांचा खास उल्लेख करता येईल. या सर्वांच्या रचना महत्त्वपूर्ण आहेत. कविचक्रवर्ती जन्न इ. स. ११७० ते १२३५ पर्यंत जन्न महाकवी होवून गेला. त्यांनी आपल्या कृतीने कर्नाटक साहित्यामध्ये मोठी भर घातली आहे. जन्न महाकवी विरचित यशोधरचरित प्रसिद्ध आहे. त्यात काव्यमाधुर्याबरोबर कवीने रचनाकौशल्य व्यक्त केले आहे. ___या ग्रंथाचे प्रमेय यशस्तिलक चंपू महाकाव्य हे आहे. राजा यशोधराच्या रहस्यमय जीवनाचे चित्रण करून जीवदयाष्टमी कथेचा सूत्रपात या काव्याने केला आहे. संस्कृत साहित्यामध्ये सोमदेबाच्या यशस्तिलकाला जे स्थान आहे तेच स्थान कर्नाटक साहित्यामध्ये जन्नाच्या यशोधरचरिताला आहे. हा कवि कविचक्रवर्ती उपाधीने विभूषित होता. याच बेळी हस्तिमल्ल झाला. तो उभयभाषाचक्रवर्ती होता. त्याने गद्यमय आदिपुराणाची रचना केली होती. हा कवि १२९० मध्ये होवून गेला. या कवीचे काही संस्कृत ग्रंथही आहेत. अभिनव पंप कवि नागचंद्र बाराव्या शतकात नागचंद्र नावाचा विद्वान् कवि होवून गेला. त्याने रामायणाची रचना केली आहे. त्याची ही रचना फार सुंदर आहे. त्याने स्वतःला अभिनव पंप या नावाने संबोधित केले आहे. या कवीने विजयपुरात मल्लिनाथ भगवंताच्या जिनालयाची निर्मिती करविली आणि त्याच्या स्मरणार्थ मल्लिनाथ पुराणाची रचना केली असावी. यानंतर १४ व्या शतकात भास्कर कवीने जीवंधरचरित काव्याची रचना भामिनी षट्पदी छंदामध्ये सुंदर शैलीने केली आहे. कवि बोम्मरस यांनी सनत्कुमार चरित्र आणि जीवंधर चरित्राची रचना केली याचाही उल्लेख करणे जरूर आहे. तसेच १६ व्या शतकाच्या प्रारंभी मंगरस कवीने सम्यक्त्व-कौमुदी, जयनूप काव्य, नेमिजिनेश संगति, श्रीपाल चरित्र, प्रभंजन चरित्र आणि सूप शास्त्र आदि ग्रंथांची रचना केली आहे. याचप्रमाणे साळ्व कवीने भारत आणि कवि दोड्डय्याने चंद्रप्रभ चरित्र याचे निर्माण याच काळात केले आहे. महाकवि रत्नाकर वर्णी यानंतर महाकवि रत्नाकर वर्णी यांचा उल्लेख मोठ्या आदराने साहित्यजगात करावा लागेल. त्यांनी भरतेश वैभव नामक मोठ्या आध्यात्मिक सरस ग्रंथाची रचना केली आहे. यात सुमारे १०००० सांगत्य Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 3 4 5 6 7