Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara Author(s): Vardhaman Parshwanath Shastri Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf View full book textPage 3
________________ कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा ३२५ होतात. इकडच्या तिकडच्या या प्राचीन ग्रंथांचे नामोल्लेख मिळतात. दुर्दैव हे की ते ग्रंथ मात्र आज उपलब्ध होत नाहीत. काळाच्या उदरात गडप झाले आहेत. यासंबंधी आम्ही फक्त दिग्दर्शनच केले आहे. विशेष विस्तार केल्यास स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. जैन कवींनी कर्नाटक भाषेत गद्यकाव्य आणि पद्यकाव्यांची रचना केली आहे. आदिकवि पंप याने चंपूकाव्यानेच आपल्या साहित्यकलेचा श्रीगणेश केला आहे. चंपूकाव्यामध्ये गद्य आणि पद्याचे मिश्रण असते, चाचकांना वाचतांना कंटाळा येत नाही. विभिन्न प्रतिपादन, विभिन्न रसास्वादन, आदि या चंपूकाव्यामध्ये अनुभवात येत असल्यामुळे साहित्यभोग्यांना विशेष आनंदच येत असतो. पंप महाकवि महाकवीने क्रि. शक ९४१ मध्ये आदिपुराण आणि पंप-भारताची रचना केली आहे. सदर रचना चंपू काव्यामध्ये आहे. चंपू काव्याचा पंपकविच आद्यजनक होता असे सांगता येईल. पंपाच्या या चंपू काव्याला कर्नाटक साहित्यात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पंप मूळचा वैदिक ब्राह्मण, अर्थात् त्याचे पूर्वज वैदिक होते. परंतु त्याचे वडील अभिराम हे जैनधर्माच्या महत्तेने प्रभावित होऊन जैन बनले. म्हणून पंपाच्या जीवनावर जैनधर्माचे संस्कार बिंबले हे साहजिकच आहे. ___ सर्वप्रथम महाकवीने आदिपुराणाची रचना केली आहे. आदिपुराणाची रचना मुख्यतः भगवज्जिनसेन आचार्यविरचित आदिपुराणाची कथावस्तु समोर ठेवून कवीने केली आहे. तथापि त्याची शैली स्वतंत्र आहे. मूल संस्कृत महापुराणामध्ये आचार्यांनी केवळ कथासाहित्याची निर्मिती केली नाही, तर वेळप्रसंगी धर्मबोध, आचार व तत्त्वप्रतिपादनाचीही दृष्टि ठेवली आहे. त्याप्रमाणे पंप महाकवीने आपल्या ग्रंथात साहित्य आणि धर्मबोध, या उद्देशांना साधले आहे. आदिपुराणामध्ये भगवान् आदिप्रभूचे चरित्र मोठ्या सरस शैलीने चित्रित केले आहे. भोग आणि योगाची सुंदर तुलना करीत कवीने ग्रंथात सर्वत्र भोगविरक्तीचा उपदेश दिला आहे. पंपाची दुसरी रचना पंपभारत आहे. याचा विषय भारत महाकाव्य आहे. तत्कालीन राजा प्रभु अरिकेसरीला अर्जुन मानून त्याची ठिकठिकाणी प्रशंसा केली आहे. अर्जुनाबरोबर आपल्या राजाची तुलना करण्याच्या तंद्रीत असता कोठे कोठे कथावस्तूमध्ये किंचित् फरकही कवीला करावा लागला आहे. तरीही काव्याची महत्ता काही कमी झालेली नाही. या काव्यामध्ये कवीचे काव्यनैपुण्य उठून दिसते. हा कवि कर्नाटकातील आद्य साहित्यकार म्हणून संबोधला जातो. जैन जैनेतर सर्व साहित्यक्षेत्रामध्ये पंपाच्या साहित्याला फार उच्चस्तरीय आदराचे स्थान आहे. म्हणूनच प्रायः नंतरच्या ग्रंथकारांनी पंपाचे स्मरण आदराने केले आहे. त्यानंतरच्या कवि नागचंद्रांनी रामायणाची रचना करून स्वतःचा अभिनव पंप म्हणून उल्लेख केला आहे. यावरूनही पंपाचे ज्येष्ठ व्यक्तित्व कळून येण्यासारखे आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 2 3 4 5 6 7