Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 2
________________ ३२४ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ राष्ट्रकूट शासक नृपतुंग नवव्या शतकात होवून गेला. त्याने कविराज मार्गाची रचना केली. कविराज मार्ग हा कर्नाटक साहित्याच्या दर्शनाकरिता दर्पणाप्रमाणे आहे. या ग्रंथाच्या अध्ययनाने असे अनुमान करता येईल की नृपतुंगाच्या पूर्वीही कर्नाटक साहित्याची रचना झाली आहे. त्याच्या पूर्वी जुनी कन्नड म्हणजे जिला हळे कन्नड म्हणतात, तीतून ग्रंथांची रचना होत असे. कविराज मार्गामध्ये नृपतुंगाने काही हळे कन्नड काव्यप्रकारांचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय ग्रंथकाराने काही प्राचीन कवींचाही निर्देश केला आहे. श्रीविजय, कविपरमेश्वर, पंडितचंद्र आदि कवींचे ग्रंथकर्त्याने स्मरण केले आहे. महाकवि पंपनेही समंतभद्र, कवि परमेष्ठी, पूज्यपाद आदींचे स्मरण केले आहे. समंतभद्र आणि पूज्यपाद यांचा काळ फार प्राचीन आहे. या आचार्यांची जन्मभूमि आणि कर्मभूमि कर्नाटकच आहे. म्हणून अनुमान करू शकतो की या आचार्यांनीही कर्नाटक भाषेत काही रचना केल्या असतील. परंतु सध्या काही उपलब्ध नाही. पूज्यपादांच्या अनेक ग्रंथांची कर्नाटक टीका उपलब्ध आहे. समंतभद्र यांच्या ग्रंथावरील जुन्या कनडमधील टीका मिळाली आहे. म्हणून त्या काळातही कर्नाटक साहित्याची सृष्टी होती या अनुमानाला फार प्रबळ जागा आहे. नपतुंगाने उल्लेखिलेल्या श्रीविजयनेही काही कर्नाटक ग्रंथांची रचना केली असावी. काही उत्तरेकडील ग्रंथांतही काही ठिकाणी यांचा उल्लेख मिळतो. __ या श्रीविजयाबरोबरच कवीश्वर किंवा कवि परमेष्ठीचा उल्लेख येतो. तेही एक प्राचीनतम कवि आहेत असे निस्संशय प्रतिपादन करता येईल. या कवीची रचना महापुराणकार भगवज्जिनसेन आणि गुणभद्रांच्याही आधी अस्तित्वात असावी असे सांगता येईल. कारण भगवज्जिनसेनांनीही आपल्या आदिपुराणामध्ये यांचा आदराने उल्लेख केला आहे. सः पूज्यः कविभिलॊके कवीनां परमेश्वरः । वागर्थसंग्रहं कृत्स्नं पुराणं यः समग्रहीत् ।। आदिपुराण पर्व, १, श्लोक ६० याचप्रमाणे उत्तरपुराणामध्येही आचार्य गुणभद्र यांनी वरील कवि परमेश्वरांचा उल्लेख केला आहे. या उल्लेखामुळे हा निष्कर्ष काढता येईल की जिनसेन आणि गुणभद्रांच्या आधीच त्रिषष्टि शलाका पुरुषांचे चरित्र कवि परमेष्ठीकडून रचले गेले होते. आणि तो ग्रंथ कर्नाटक भाषेतील होता. कदाचित् तो ग्रंथ संक्षिप्त असेल, परंतु भगवज्जिनसेनादिकांनी त्याचा विस्तार केला असावा. ___या सर्वांचा उल्लेख करण्याचा आमचा मुख्य हेतु हा की कर्नाटक जैन साहित्याची परंपरा फार प्राचीन आहे. जिनसेन गुणभद्रांच्या युगाच्या आधी कितीतरी शतकापूर्वीपासून कर्नाटक ग्रंथांची रचना होत आली आहे. यासंबंधीचे उल्लेख उत्तर काळातील ग्रंथांत आढळतात. त्यापूर्वीचे अनेक शिलालेखही उपलब्ध Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7