Book Title: Ishtopadesh
Author(s): Pujyapadswami, Kalyanbodhisuri
Publisher: Jinshasan Aradhak Trust

View full book text
Previous | Next

Page 158
________________ १४४ પરિશિષ્ટ-૧ इष्टोपदेशः आरंभि तापदायक मिळतां अतृप्ति बाढते जाण । भोगून, हेयभोगी अधिकचि भोगील तो सुधी कवण ? ॥ १७ ज्याच्या संगतिने जगि बनती वस्तूं पवित्र अपवित्र । त्या इच्छिणें वृथा हो काया संतत अपाय जी करित ॥ १८ उपकारक जें जीवा अपकारक तेंच होय देहास । जें उपकारक होतें अपकारक तें ठरेचि जीवास ॥ १९ चिंतामणी दिव्य तसा खंड पेंडिचा तथापि निःसार । लाभति उभयध्यानें कोणा बुध मानतील बघ सार ॥ २० स्वानुभवें तो प्रगटे प्राप्त देह सम जया असे मान । अत्यंत सुखी आत्मा लोकालोकावलोकिं बघ जाण ॥ २१ एकाग्रमनें इंद्रिय-विषयातें त्यजुनि संयमें जगती । आत्मज्ञानी आत्मा आत्म्यामाजीं बसे तया चिंती ॥ २२ अज्ञभक्ति अज्ञाना जन्मा ज्ञानभक्ति दे दान । जे ज्या जवळी तो तें जगिं दे प्रख्यात हे असे वचन ॥ २३ अध्यात्म्याच्या योगें परीषहादिक न तेच अनुभवतां । आस्रव निरोधिकर्मा येइ निर्जरा सुशीघ्र की सुगतां ॥ २४ कर्ता चटईचा मी यांतचि संबंध भिन्न दोघांचा । ध्यान ध्येयचि आत्मा केवीं संबंध भिन्न वद त्यांचा ॥ २५ १. तुकडा, २. श्रेष्ठ, ३. प्रमाण, ४. सद्बुद्धिशाली, केवलज्ञानी

Loading...

Page Navigation
1 ... 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186