________________
१४३
इष्टोपनिषद्
પરિશિષ્ટ-૧ घर, धन, शरीर, दारा शत्रू मित्रादि पुत्र वस्तूंना ।। अन्यस्वभावि सगळे परि मानी मूढ आपुले त्यांना ॥ ८ निशिं खग येउनि बसती, दिग्देशांतुन नगानगावरती । निज निजकार्यवशें ते देशोदेशी उजाडतां जाती ॥ ९ केविं विराधक मारिति त्यातें, करि त्या जनावरी कोप । व्यंगुलेपदी धरोनी पाडी, दण्डे पडे अपोआप ॥ १० रागद्वेषं मथितां कर्माचे बघ निघेचि नवनीत । जीवात्मा अज्ञानें त्या चिर संसार-सागरी भ्रमत ॥ ११ विपदा भवपथवर्ती पथिकेसम जाति सारली दूर । जोवरि तोवरि दुसरी विपदा, जीवासमोर ये प्रचुर ॥ १२ रक्षाया मिळवाया धनादि नश्वर कठीण जे असती। मानी सुखी तयें नर पिउनि घृता ज्वर हरावया बघती ॥ १३ इतरांसम अपणातें येति विपत्ति न विचार मूढांस । पशु जळती वनिं बघुनी तरुवर बसुनि न विचारी निजनाश ॥ १४ आयुक्षय धनवृद्धिसं कारण निर्गमन होय कालाचे । तत्प्रेमी धनिकातें जीवाहुन अधिक इष्ट पैशाचे. ॥ १५ निर्धन करि धनसंचय, कर्मा श्रेयेंचि प्राप्त त्यागाया । स्नान करावे म्हणुनी पंके लिंपन करीच देहा या ॥ १६
१. बदला घेणारा, २. एक माती खांदणेचे यंत्र अर्थात् कुदाल फावडे या सारखे, ३. लोणी, ४. संसारांत पदोपदी येणारी, ५. चिखलाने