Book Title: Ek Bhagyavan Vyapari arthat Hargovinddas Ramji Shah
Author(s): Shankarrav Karandikar
Publisher: Bharatiya Vidyabhavan

View full book text
Previous | Next

Page 23
________________ ....... एक भाग्यवान् व्यापारी .xn.mmune कवजा घेण्याकरतां, त्या किल्ल्याची बारीक सारीक माहिती घेत असतो. किल्ल्याचे गुप्त भाग, गुप्त वाटा, तो रोज शोधत असतो. जन्म घेऊन प्रत्येक व्यक्ति या आयुष्याच्या भयंकर भुयारांत शिरत असते आणि बाहेरील प्रत्येक व्यक्ति, 'आंत गेलेला' मनुष्य कोठे गेला, याचा शोध करीत असते; तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर देणारे कोणी भेटत नाही, मग ती स्वतांच, त्या आयुष्याच्या भयंकर भुयारांत प्रवेश करते ! आयुष्य कसे आहे ? तर तें एक लहान-मोठ्या अनेक वस्तूंचें गांठोडे आहे. मृत्यु हा एकदांच, स्वर्गप्राप्ति एकदांच, त्याचप्रमाणे जन्महि पण एकदांच! अर्थात् जन्माचे महत्त्व अतोनात आहे आणि तें माहात्म्य समजल्यावर त्या व्यक्तीचे चारित्र्य अगर चरित्र पाहणे, फार अगत्याचे आहे. दीर्घायुषी व्हावे अशी इच्छा प्रत्येकाची असते, पण आयुष्यभर फार चांगल्या त-हेनें जगावे, अशी महत्वाकांक्षा, फारच थोड्यांमध्ये आढळते! आमच्या चरित्रनायकाची इच्छा, ही दुसन्या प्रकारची होती. सूर्य उगवला की, प्रत्येक दिवशी ही त्याची इच्छा वाढत असे आणि अजूनहि वाढतच आहे. 'एकाचे आयुष्य म्हणजे दुसऱ्याचा आरसा आहे ! दुसरा मनुष्य त्या पहिल्याच्या आरशांत आपले प्रतिबिंब पहात असतो.' __ श्रीहरगोविंद दासनां लहानपणी कोणीहि खरे गुरु भेटले नाहीत; त्यांनी पुष्कळ पुष्कळ विचार करून एका 'तत्वाला' गुरु केले! आणि तें तत्व म्हणजे 'ज्ञान.' 'ज्ञान' हेच श्री हरगोविंद दासजींचें खरें गुरु ! म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व आयुष्यभर "जें राज्य व्यापारी आहे, किंवा व्यापारी बनेल, वें राष्ट्र कधीहि नाश पावणार नाही." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46