Book Title: Ek Bhagyavan Vyapari arthat Hargovinddas Ramji Shah
Author(s): Shankarrav Karandikar
Publisher: Bharatiya Vidyabhavan

View full book text
Previous | Next

Page 38
________________ mmmm. एक भाग्यवान व्यापारी ...(३१) श्री हरगोविंददास यांच्या डाव्या हातांत सर्व रेषा व अनेक शुभ-चिन्हें स्पष्ट, उठावदार अशी आहेत. व्यापारी व्यक्तिस बुधभाग्यरेषेची व उत्तम बुध-उंचवट्याच्या सामर्थ्याची अतिशय जरूरी असते. उत्तम यशस्वी व्यापाऱ्याच्या उजव्या हातांत, शुक्रापासून म्हणजे आयुष्यरेषेच्या आधाराने उत्पन्न झालेली व शनिपर्वताकडे जाणारी उत्कृष्ट भाग्यरेषा तरी अनुकूल असावी, अथवा व्यापारांत गुजराती नातीचे वैशिष्टय म्हणून, त्यांच्या डाव्या हातांत महत्वाची बुधरेषा तरी स्पष्ट अस्तित्वांत असावी. श्री हरगोविंद दास यांच्या डाव्या हातांत भाग्यरेषा, रविरेषा, व बुधरेषा, यांचे प्रभाव पहावे. विशेष महत्त्वाची गोष्ट त्या हातांत अशी आहे की, भाग्यरेषेच्या आधाराने बुधपर्वताकडे जाणारी बुध-भाग्य-रेषा अगदी सुस्पष्ट अंकित झालेली आहे. मुख्य भाग्य-रेषा, ग्वाही किंवा खात्री देऊन त्या बुधरेषेस सांगत आहे की, संपत्तिचा पाठिंबा व्यापारास खात्रीने मिळेल. व्यापारांत यश निश्चित. द्रव्याचे सहाय्य त्या बुधपर्वतगामी बुधरेषस संपूर्णपणे आहे, असा सिद्धान्त, ती भाग्यरेषा स्पष्ट दर्शविते आहे. 'Great Success in business' असें त्या, भाग्यरेषेपासून निघणाऱ्या बुधरेषेचे सांगणे आहे. बुध'पर्वत, रविरेषा व बुधभाग्यरेषा यांच्यामुळे, यश मिळविण्यास कारण असणारी शास्त्रोक्तता, शास्त्रीयता, व ज्ञानार्जनाची अत्यंत आवड, हे गुणधर्म, त्या रेषांनी व बुधउंचवट्याने व्यक्त होतात. रविरेषेनें उत्साह, शनिरेषेनें द्रव्य, शोधक बुद्धि, व बुधरेषेर्ने शास्त्रीय विषयांची, आणि ज्ञानसंपादनाची आवड, हे धर्म स्पष्ट होतात. रविरेषा, भाग्यरेषा, बुधरेषा, आणि चतुष्कोणी बोटें अगर हात, तसेच " जोडोनिया धन उत्तम व्यवहारें। उदास विचारें. वेंच करी॥" -श्रीतुकाराममहाराज. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46