Book Title: Ek Bhagyavan Vyapari arthat Hargovinddas Ramji Shah
Author(s): Shankarrav Karandikar
Publisher: Bharatiya Vidyabhavan

View full book text
Previous | Next

Page 27
________________ ..... एक भाग्यवान् व्यापारी www.m. तोटाच अधिक घडून आला! कारण, जी रक्कम विक्रीची उभी राहील,-जमा होईल, ती सर्व रकम मोठमोठ्या ग्रंथांच्या व्ही० प्या० मागवून, त्या सोडवत बसण्यांतच, खर्च होऊं लागून, दुकान चालेनासे झालें ! दुकानांत त्यांचे चित्तच नव्हते. व्यापार व्यवहार करण्यापेक्षां, “वाचन ? वाचन ! वाचन !" हाच त्यांना विलक्षण नाद होता! मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी गेलों असतां आपला वाचनाचा छंद-शौक-पूर्ण होईल, असे त्यांच्या मनाने अखेरीस ठाम घेतले आणि पुनः मुंबईस येऊन वडगादी-भागांत एका दुकानांत एक वर्ष त्यांनी नौकरी केली. ___ज्ञानपिपासा पूर्ण होण्यास ग्रंथ पाहिजेत, आणि ग्रंथ पाहिजे असल्यास ते विकत घेण्यास भरपूर द्रव्य पाहिजे, या प्रश्नांनी त्यांना विचलित करून टाकलें; आणि सरतेशेवटी अधिक द्रव्य मिळवण्याकरता वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे सन १९१३ साली त्यांनी आपल्या भावाबरोबर भागीदारी केली. त्यावेळी जव्हेरभाई नरोत्तमदास कंपनी अशा नांवाने दुकान चालले होते. ती भागीदारी ५ वर्षे म्हणजे १९१८ पर्यंत टिकून राहिली. नशिबाने, चोगठ आणि उमराला या गांवांचा त्याग करावयास लावून, श्री हरगोविंद दासजींना मुंबईला आणलेलें होते! त्या ठिकाणी त्यांचे नशिब विकास पावू लागले. तेव्हां, मुंबईजवळ मुलुंडला, लाखोवार जमीन पडीक म्हणून होती. "व्यापा-याने काळा बाजार करून कधींहि देशाचे शत्रु बनूं नये; -तो सजन न्यापारी गणला जाणार नाही." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46