Book Title: Ek Bhagyavan Vyapari arthat Hargovinddas Ramji Shah
Author(s): Shankarrav Karandikar
Publisher: Bharatiya Vidyabhavan

View full book text
Previous | Next

Page 28
________________ wwwwwwww. एक भाग्यवान् व्यापारी ...... निव्वळ माळ-जंगल असें तें ठिकाण होते. आजचे मुलुंड आणि त्या वेळचें ओस मुलुंड, यांत जमीन-अस्मानाचे अंतर आह. __ मुलुंडला जमिनीचे दर्शन होतांच, 'जव्हेरभाई कं०' म्हणून जें दुकान होते, त्याच कंपनीच्या दुकानाच्या नांवावर मुलुंडची शेकडों एकर जमीन खरेदी झाली. __ जमीन खरेदी झाल्यानंतर १९२० साली श्री हरगोविंद दासजींनी कंपनीतून आपला भाग काढून घेतला; त्या वेळी प्रत्येकास लाख लाख रुपये मिळाले व त्याच भांडवलाच्या जोरावर श्री हरगोविंद दास यांनी " हरगोविंद दास रामजी" या नांवाचे नवें किराणा दुकान तेव्हांपासून सुरू केले. आज ३० वर्षे तें दुकान त्याच नांवाने चालत आहे. __ व्यापार हा जरी मुख्य हेतू तेव्हां होता, तरी ज्ञानार्जनाचा व ग्रंथ-वाचनाचा इतका विलक्षण नाद त्यांना आहे, की, आगगाडीत पहिल्या वर्गात कोणी वाचत बसलेले दिसलें, की, ते 'हरगोविंद दास रामजी!' असें थट्टेने मित्रमंडळींकडून म्हटले जात असते! दोन तास आगगाडीच्या प्रवासास लागले, तरी वाचन कधीच बंद नसावयाचे. दोन तास घरों मिळत, तेवढ्यांतही तो वाचनाचा योग, साधला जात असे. निरयन सायन ज्योतिष, हस्तरेषासामुद्रिक, जैनधर्मीय अभ्यास, भगवद्गीता-उपनिषदें, योगशास्त्र, सर्वोदय, रमलशास्त्र, वैद्यक, त्याचप्रमाणे इंग्रजी-बंगाली-हिंदी-मराठी या भाषांचाही त्यांनी उत्तम अभ्यास केला. सर्व धर्मग्रंथ मनःपूर्वक " उदारपणाचा व्यापार माणि उदार व्यापारी यांच्यामुळेच कोणताहि देश सुवर्णाचा होत असतो." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com - -- --

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46