Book Title: Prakrit Vyakaran Author(s): Hemchandracharya, Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra View full book textPage 6
________________ प्रस्तुति मानवी जीवनामध्ये भाषेचा उपयोग परप्रत्यायनासाठी (दुसऱ्यांना विषयाचे ज्ञान करविण्यासाठी)होतो. मानवाच्या मुखातून उच्चारलेले शब्द जेव्हा नियमबद्ध होतात तेव्हा व्याकरण तयार होते. व्याकरणाने प्रमाणित भाषाच साहित्य व अलौकिक पदार्थांचे प्रतिनियत आणि अभिप्रेत अर्थ प्रतिपादन करण्यास सक्षम असते. आचार्य भगवान् श्री हेमचंद्रसू.म.सा.नी प्राकृतभाषांचे व्याकरण सूत्रबद्ध करून या भाषेची महत्ता विद्वज्जगतामध्ये प्रस्थापित केली. या भाषांच्या अभ्यासाशिवाय प्राचीन साहित्य व जैन साहित्याचे ज्ञान होणे अशक्य आहे. डॉ. केशवराव वामनराव आपटे कृत व्याकरणाची हिंदी आवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाली. प्राकृत भाषेचा प्रचार करण्याच्या शुभाशयाने मराठी भाषेमध्ये सुद्धा याची आवृत्ती प्रकाशित होत आहे. या आवृत्तीने विद्यार्थी व विद्वानांना अवश्य फायदा होईल. प्राध्यापक साहेब यांच्या प्राकृतनिष्ठेचे अभिनंदन. - वैराग्यरतिविजय श्रुतभवन संशोधन केंद्र, पुणे ०६/०२/२०१५Page Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 ... 594