Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
Catalog link: https://jainqq.org/explore/009843/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख) भाग -३ * लेखन व संपादन * डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट २०११ Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ १२. जैन ऐतिहासिक साहित्य (शिवाजी विद्यापीठ आयोजित द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील विशेष व्याख्यान आयोजक : भ. महावीर जैन अध्यासन, मार्च २००८) 'जैनविद्या' हे अभ्यासाचे एक विस्तृत क्षेत्र आहे. जैन इतिहास आणि परंपरा, जैन साहित्य, जैन तत्त्वज्ञान आणि जैन कला हे जैनविद्येचे चार प्रमुख स्तंभ आहेत. त्याखेरीज सर्व इतर विद्याशाखांशी केलेला तौलनिक अभ्यास हे त्याचे एक नवे अंग झपाट्याने पुढे येत आहे. त्यातील ऐतिहासिकता या आयामाविषयी आपण साहित्यिक दृष्टने विचार करणार आहोत. तसे पाहिले तर साहित्य हे ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने सर्वात कमी महत्त्वाचे अंग आहे. पुरातत्त्वविषयक प्रमाणे ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जातात. शिलालेख, स्तंभलेख, मंदिरे, स्तूप, चैत्य, चित्रकला, मूर्तिकला, ताम्रपट, दानपत्रे इत्यादींच्या माध्यमातून कोणत्याही परंपरेचे दृष्टिगोचर होणारे रूप निखळ सत्य म्हणून स्वीकाले जाते. जैन परंपरेतील वरील पुरावे भारतभर पसरले आहेत. ऐतिहासिकतेच्या दृष्टीने जैन साहित्यातील सर्वात महमाच्या आहेत त्या पटवली ! अर्धमागधी भाषेतील पर्युषणाकल्प अथवा कल्पसूत्रातील स्थविरावली हा भाग त्या दृष्टीने सर्वात प्राचीन आहे. १२ व्या शतकात होऊन गेलेल्या हेमचंद्रांनी संस्कृतमध्ये परिशिष्टपर्व' लिहून त्याची बऱ्याच प्रमाणात पूर्ती केली. गण व गच्छ परंपरा सुरू झाल्यावर विविध गुर्वावलि, पट्टावलि लिहिल्या जाऊ लागल्या. आंचलगच्छ, खरतरगच्छ, तपागच्छ इ. च्या पट्टावली जैन इतिहासावर चांगला प्रकाश टाकतात. या पट्टावलींचे संग्रह जामनगर, भावनगर आदि संस्थांनी प्रकाशित केले आहेत. अद्यापही काही पट्टावली प्रकाशनाची वाट पहात आहेत. पट्टवलींव्यतिरिक्त जैन ग्रंथांच्या प्रशस्तींमधूनही विविध प्रकारची ऐतिहासिक माहिती मिळते. त्यानंतर महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे प्रबंध होत. आज आपल्याला प्रथम जैन साहित्यातील 'प्रबंध या विषयाची अधिक माहिती करून घ्यावयाची आहे. सिंघी जैन ग्रंथमालेने ते अत्यंत चिकित्सापूर्वक प्रकाशित केले आहेत. ते बहुतांशी संस्कृतमध्ये आहेत. पुढ्याची हिंदी भाषांतरे फोटो इत्यादींसह प्रकाशित करण्याचा त्यांचा मनोदय होता. आत्तापर्यंत तरी माझ्या पहाण्यात अशी भाषंतरे आलेली नाहीत. ब्राह्मण किंवा बौद्ध परंपरेत अशा प्रबंधरचना अगदी तुरळक दिसतात. जैन आचार्यांनी याबाबत आघाडी मारलेली दिसते. कालानुक्रमे पहिला प्रबंधग्रंथ आहे धनेश्वरसूरिविरचिर्तशत्रुञ्जयमाहात्म्य'. नावावरूनच स्पष्ट होते की शत्रुञ्जय तीर्थाची, त्याच्या निर्मितीची आणि दंतकथांची समग्र माहिती धनेश्वरसूरींनी संकलित केली आहे. १३ व्या शतकक्लि प्रभाचन्द्रकृत 'प्रभावकचरित' हा ग्रंथ या मालिकेतील दुसरी महत्त्वपूर्ण प्रबंधरचना आहे. वज्रस्वामींपासून आरंभ करून आर्यरक्षित, आर्यनन्दिल, कालकसूरि अशा क्रमाने हेमचन्द्रसूरींपर्यंतची चरित्रे यात नोंदवली आहेत. या सर्वांची गणना त्या त्या काळातील प्रभावसंपन्नं व्यक्ती अशी केली आहे. चरितांच्या ओघात प्राकृत व अपभ्रंश काव्ये, प्राकृत म्हणी व देशी शब्दांचा वापर केलेला दिसतो. १४ व्या शतकात होऊन गेलेल्या श्री मेरुतुङ्ग यांनी रचलेला प्रबन्धचिन्तामणि' हा ग्रंथही संस्कृतमध्येच असून त्याची रचना अधिक सुघट आहे. विक्रमादित्य, सातवाहन, वनराज, मूलराज, मुञ्जराज, भोजराज, सिद्धराज, कुमारफा, वस्तुपाल, तेजपाल यांच्याविषयीची कथानके एकेका प्रकाशात' समाविष्ट केलेली असून अनेक महत्त्वाचे आचार्य, श्रावक व अन्यधर्मीय प्रभावी व्यक्तींचा वटच्या प्रकरणात दिला आहे. शैलीची वैशिष्ट्ये प्रभावकचरिताप्रमोप्य आहेत. १४ व्या शतकातील श्री राजशेखरकृत 'प्रबन्धकोश या मालिकेतील पुढचा ग्रंथ आहे. यातील बहुतांशी विषय प्रभावकचरिताप्रमाणेच आहेत. भद्रबाहु-वराह-प्रबन्धाने आरंभ होतो. वस्तुपाल-तेजपाल प्रबंध शेवटचा आहे. Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ एकूण प्रबंधसंख्या २४ आहे. हरिहरकवि, अमरचन्द्र, मदनकीर्ति, रत्नश्रावक व आभडश्रावक यांवरील प्रबंध पूर्वीच्या प्रबंधांहून वेगळे आहेत. आपल्या या चर्चासत्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे विविधतीर्थकल्प हा होय. १४ व्या शतकातच जिनप्रभसूरींनी हा ग्रंथ लिहिला. ग्रंथातील प्रत्येक निबंधाला 'कल्प' म्हटले आहे. एकूण ६२ कल्प आहेत. यातील पहिला शत्रुञ्जयतीर्थकल्प संस्कृतात आहे. बाकीचे प्रायः ५० कल्प जैन महाराष्ट्री प्राकृतात आहेत. प्राकृत भाषा अतिशय रसाळ आहे. प्रस्तावनेतच मुनि जिनविजय म्हणतात की हे जणू काही भारतातील तीर्थक्षेत्रांचे गाइडबुक'च आहे. भारतात ११-१२ व्या शतकापासून ते १६-१७ व्या शतकापर्यंत मुस्लीम राजवट कमी-अधिक प्रमाणात पसरलेली होती. ५ पातशाह्यांचा अंमल चालू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळात जैन आचार्यांनी मात्र संस्कृत, जैन महाराष्ट्री आणि अपभ्रंश या भाषांमध्ये विपुल ग्रंथसंपत्ती निर्माण केली. काही मुगल बादशहांच्यदरबारात त्यांचा प्रभाव लक्षणीय दिसतो. ___इतिहासात 'वेडा महम्मूद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महम्मद तुघलकाच्या दरबारात जिनप्रभसूरींना अतिशय मान होता. (गिरीश कर्नाड यांनी 'तुघलक' नाटकात या बादशहाच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.) आपल्या विरक्त, निःस्पृह आणि ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाने जिनप्रभसूरींनी या सम्राटाला प्रभावित केले होते. त्यांचे इतिहासाचे आणि तीर्थभ्रमणाचे प्रेम विविधतीर्थकल्पातून उत्तम रीतीने व्यक्त होते. गुजरातव काठेवाडमधील ८ तीर्थक्षेत्रे, युक्तप्रान्त आणि पंजाबमधील ६, राजपुताना व माळव्यातील ७, अवध व बिहारमधील ११, दक्षिण व बराड (व-हाड) मधील ३ आणि कर्णाटक व तेलंगणातील ३ तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून यांनी त्यावर आधारित 'कल्प' लिहून मोलाची कामगिरी केली. (या ठिकाणी काश्मिरी कवी कल्हण याच्या राजतरङ्गिणी' ग्रंथाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. काश्मिरचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचे ते एकमेव साहित्यिक साधन आहे.) १६ व्या शतकात झालेल्या सम्राट अकबराच्या दरबारात ज्या प्रतिभावंतांना मानाचे स्थान होते त्यात जैन आचार्य हीरविजयसूरि यांचा गौरवाने उल्लेख करता येईल. येथे आयोजित केलेल्या चर्चासत्राशी सुसंगत अशा तीन कल्पांचा आपण या चारही ग्रंथांच्या आधारे आढावा घेऊ. 'नासिक्यपुरकल्प हा २८ वा कल्प संपूर्णतः प्राकृतात आहे. तो आठवे तीर्थंकर चन्द्रप्रभ यांच्या संदर्भात आहे. 'नासिअकलिमलनिवह' (नाशित-कलि-मल-निवह) असा नाशिक नावावर श्लेष केलेला आहे. ब्राह्मणादि तीर्थिक याविषयी काय माहिती सांगतात ते आरंभी दिले आहे. कृतयुगात ब्रह्मदेवाचे कमळ अरुणा-वरुणा-गंगा यांनी भूषित अशा महाराष्ट्रात पडले. तेथे ब्रह्मदेवाने पद्मपुर वसविले. यज्ञात देव आले. दानव येईनात. ते म्हणाले,जर चंद्रप्रभस्वामी आले तरच आम्ही येऊ. ब्रह्मदेवाने विहार करणाऱ्या चंद्रप्रभस्वामींचा शोध घेऊन येण्याची विनंती केली. चंद्रप्रभ म्हणाले, 'माझ्या प्रतिरूपाने म्हणजेच मूर्तीनेही काम होईल. चंद्रकांत रत्नांपासून बनविलेली प्रतिमा ब्रह्मदेवाने सौधर्म इंद्राकडून घेतली. नाशिकक्षेत्र हे कृतयुगातले पद्मपुर' होय. त्रेतायुगात राम, लक्ष्मण, सीता पितृआज्ञेने वनवास पत्करून गौतमीगंगा'तीरावरील पंचवटीत राहिले. गौतमी म्हणजे प्राकृतात गोदमी - त्यावरून 'गोदावरी' नाव पडले असावे. शूर्पणखेचे 'नाक' रामाने छेदले म्हणून नासिक्क' नाव पडले. रामायण घडले. अयोध्येस परत जाताना, येथे थांबून रामाने चंद्रप्रभमंदिराचा उद्धार केला. कालांतराने पुण्यभूमी म्हणून जनकराजा येथे आला. त्याने यज्ञ केला. 'जनकस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आजही नाशिकजवळचा आदिवासी भाग 'जनस्थान' म्हणून प्रसिद्ध आहे. कवी कुसुमाग्रजांनी तेथे बरेच कार्य केले हे आपल्याला माहीत आहेच. शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचे दंडकराजाने अपहरण केले. शक्राचार्यांनी शाप दिला. दंडक राजा चंद्रप्रभस्वामींना शरण गेला. शापमुक्त झाला. या घटनेनंतर कवी लिहितो, 'परतीर्थिकही ज्याचा महिमा गातात त्या Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ क्षेत्राचा महिमा आरहंतलोक कसा गाणार नाहीत ?' द्वापारयुगात कुंतीपुत्र युधिष्ठिराने चंद्रप्रभस्वामींच्या प्रासादाचा उद्धार केला. जवळ बिल्ववृक्ष लावला. ते स्थान 'कुंतीविहार' म्हणून प्रसिद्ध झाले. जैन परंपरेप्रमाणे द्वीपायन ऋषींच्या भविष्यवाणीनुसार द्वारकेचा विनाश झाला. त्या प्रसंगी वज्रकुमार यादव याची पत्नी या ठिकाणी आली. चंद्रप्रभस्वामींना शरण गेली. प्रसूत झाली. तो पुत्र मोठा पराक्रमी नगरप्रमुख झाला. यादव वंश येथे रुजला. त्यानेही चंद्रप्रभतीर्थाचा उद्धार केला. कलियुगात शान्ताचार्यांनी (उत्तराध्ययनाचे टीकाकार) हे तीर्थ उद्धरले. त्यानंतर कल्याणकटक नगरातील 'परमड्डी' राजाने ती प्रतिमा घेण्याचा असफल प्रयत्न केला. मग भवनोद्धार करून २४ गावे दिली. पुढे पल्लीवाल वंशातील माणिक्यपुत्र आणि नाऊ यांचा पुत्र साहु कुमारसिंह या परमश्रावकाने हा प्रासाद नवा केला. आजही तेथे चारही दिशांनी संघ येऊन उत्सव करतात. शेवटी असे म्हटले आहे की हा कल्प त्यांनी नासिक्यपुरातच लिहिला. 'प्रतिष्ठानपत्तनकल्प' हा देखील जैन इतिहासाशी कित्येक शतकांपासून जोडलेला दिसतो. त्या कल्पाचा आरंभ महाराष्ट्राच्या वर्णनाने होतो. महाराष्ट्रात ६८ लौकिक तीर्थे असून ५२ जैन तीर्थे आहेत असा उल्लेख आहे. आंध्रभृत्य वंशातील सातवाहन राजांच्या इतिहासाशी प्रतिष्ठान अथवा पैठणचे नाव निगडित आहे. या सर्वच प्रबंधकांनी शातवाहन - सातकर्णी - सालवाहन-सालाहण या राजांना 'जैनधर्मी' असे संबोधले आहे. प्राचीन भारताचे इतिहासकार हे मान्य करीत नाहीत. सातवाहनांच्या राजवटीत जैन धर्माचा प्रचार, प्रसार मात्र येथे भरपूर झालेला दिसतो. मुनिस्त तीर्थंकरांच्या जीवत्स्वामी प्रतिमेचा, लेप्यमयी प्रतिमेचा वारंवार उल्लेख येतो. या क्षेत्राची देवता अम्बादेवी असून 'कपर्दी' (कवड्डिय) हा 'यक्ष' आहे. ‘कालकाचार्यकथानक' या विषयावर प्राकृतामध्ये अनेक खंडकाव्ये दिसून येतात. उज्जैनीचा राजा गर्दभिल्ल, त्याने केलेले कालकसूरींच्या 'सरस्वती' नावाच्या बहिणीचे अपहरण, त्यांनी घेतलेले शक (शाखि) राजांचे सहाय्य इ. घटना जैनांमध्ये प्रचलित आहेत. हे कालकसूरी विहार करीत प्रतिष्ठानपुरास आले. सातवाहनाने मोठ्या थाटाम प्रवेश करविला. त्यावेळी इंद्रमहोत्सव सुरू होता. पर्युषणपर्वात नेहमी येणारी अडचण जाणून सातवाहन व कालक यांनी एकत्रितपणे पर्युषणपर्वसांगता 'चतुर्थी 'ला करावी असा निर्णय घेतला. प्रतिष्ठान नगर या घटनेचे साक्षीदार आहे. उपलब्ध पुराव्यानुसार सुमारे ४ थ्या शतकात होऊन गेलेल्या पादलिप्त- पालित्तय- या आचार्यांचाही प्रतिष्ठानच्या इतिहासाशी संबंध वर्णिला आहे. पादलिप्ताचार्य 'दक्षिणाशामुखभूषण' अशा प्रतिष्ठान नगरात आले. सातवाहनाच्या दरबारातील लोकांनी तुपाने भरलेले भांडे पाठवणे - पादलिप्तांनी त्यात सुई टाकून कुशाग्रता सिद्ध करणेइ. घटना वर्णिल्या आहेत. त्यांच्या 'निर्वाणकलिका' आणि 'प्रश्नप्रकाश' या ग्रंथांचा उल्लेख आहे. आज अजूनपर्यंत त्यांची हस्तलिखिते सापडलेली नाहीत. सातवाहनाच्या राज्यातच त्यांनी 'तरंगलोला' नावाचे अप्रतिम काव्य रचले. आज तेही उपलब्ध नाही. त्यावर आधारित काव्ये मात्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये पादलिप्तांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. सातवाहन म्हणतो, 'सर्वजण आपली स्तुती करतात. अमुक अमुक गणिका स्तुती करीत नाही. तिला स्तुती करायला लावा'. पादलिप्त योगसाधनेने श्वासनिरोध करतात. प्रेतयात्रा गणिकेच्या घरासमोरून जात असते. तिने तरंगलोला काव्य वाचून आस्वाद घेतलेला असतो. ती उद्गारते "सीसं कहवि न फुटं जमस्स पालित्तयं हरंतस्स जस्स मुहनिज्झराउतो तरंगलोला नई वूढा ।।” उज्जैनी (अवंती) चे विक्रमादित्य आणि सातवाहन राजे यांचा परस्परसंबंध सांगणारी कथाही या प्रतिष्ठानकल्पात येते. उज्जैनीत भविष्यवेत्ते घोषित करतात की, 'प्रतिष्ठानला सातवाहन राजा होणार आहे. दरम्यान सातवाहनाचे बुद्धिकौशल्य व पराक्रम उज्जैनीत समजतो. विक्रमादित्य आक्रमण करतो. सातवाहन अद्भुत शक्ती व पराक्रमाने त्यांना पळवितो. सातवाहनाचा राज्याभिषेक होतो. तो तापी नदीपर्यंत राज्यविस्तार करतो. ५० जिनमंदिरे बांधतो. Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ सातवाहन हा शृंगारप्रेमी राजा असून त्याने कोट्यवधि सुवर्णनाणी खर्च करून गाथासंग्रह केल्याचा उल्लेखही या प्रबंधामध्ये येतो. ‘शूद्रकं' नावाचा एक 'वीर' आणि दोघांविषयीच्या दंतकथा रंगवून दिल्या आहेत. आज उपलब्ध असलेल्या गाथासप्तशतीत 'पालित्तय' आणि 'शूद्रक' यांच्या नावावर प्राकृत गाथा दिसतात. सातवाहनाच्या दानशूरतेची आणि तीर्थस्थापनेची वर्णने सर्वच आचार्य करतात. सातवाहनाने ' सत्तूंचे दानं पूर्वभवात मुनींना केले इत्यादी दंतकथाही जोडल्या आहेत. प्रतिष्ठानकल्प मुख्यत्वाने सुव्रतजिनांशी संलग्न असून वारंवार त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कथा येतात. विविधतीर्थकल्पात ‘दक्षिण व बराड' संबंधी जे कल्प आहेत त्यातील एक म्हणजे 'श्रीपुर' येथील 'अन्तरिक्षपार्श्वनाथकल्प' होय. कथेचा आरंभ थेट रामायणापासून होतो. रावण आपल्या माली व सुमाली या योद्ध्यांना कामासाठी दुसरीकडे पाठवितो. त्यांचा बटुक पुजारीही बरोबर असतो. विमानप्रवास सुरू होतो. पुजारी गडबडीत जिनप्रतिमा घेण्यास विसरलेला असतो. विद्याबलाने तो भाविजिन पार्श्वनाथांची वालुकामय प्रतिमा करतो. मालीसुमालींनी पूजन केल्यावर ती विसर्जित करतो. खाली सरोवर असते. दीर्घकाळ प्रतिमा सरोवरात तशीच रहाते. कित्येक वर्षांनी चिंगउल्ल किंवा विंगउल्ल प्रदेशाचा श्रीपाल राजा तेथे येतो. तो कुष्ठरोगी असतो. सरोवरातील स्नानाने कुष्ठरोग बरा होतो. राणी आश्चर्यचकित होते. तिला स्वप्नात पार्श्वनाथ प्रतिमेचा दृष्टांत होतो. राजा रथातून प्रतिमा नेऊ लागतो. मध्येच वळून पहातो. प्रतिमा अंतरिक्षात सिर होते. राजा 'श्रीपुर' नावाचे नगर वसवितो. चैत्य बांधतो. अंबादेवी क्षेत्रपाल व धरणेंद्र - पद्मावतींच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करतो. आजही 'श्रीपुर' येथे यात्रा महोत्सव असतो. 'श्रीपुर' या ठिकाणाची विविधतीर्थकल्पात आलेली नोंद अशा प्रकारची आहे. कौंकण प्रदेशाच्या उत्पत्तीची कथा प्रबन्धचिन्तामणीत आली आहे. समुद्र हटवून काही द्वीपे तयार करून महानन्द राजाने, आपल्या प्रसंगवशात् नावडत्या झालेल्या राणीच्या पुत्राला ती दिली असा उल्लेख आहे. ब्राह्मण परंपरेतील परशुरामाशीही त्याचा संबंध या प्रबंधांमध्ये दिसत नाही. प्रभावकचरितात वज्रस्वामी विहार करीत दक्षिण्याला येतात, असा उल्लेख आहे. ‘स शनैः प्रायात् कुंकणान् वित्तवञ्चणान्ं असा कोंकण प्रांताच्या दारिद्र्याचा उल्लेख दिसतो. तेथून ते 'सोपारपत्तना'स जातात असे म्हटले आहे. अशोकाचे शिलालेख जेथे सापडले ते ' शूर्पारक' (ठाण्याजवळ - नाला सोपारा) हेच असण्याची शक्यता आहे. कोंकणातील जैन तीर्थ अगर प्रतिमांचा उल्लेख नाही. चतुर्दशपूर्वधारी भद्रबाहू यांचा वृत्तांत प्रबन्धकोशात प्रतिष्ठान (पैठण) येथे घडला असे नोंदविले आहे. भद्रा व ब्राह्मण परंपरेतील सुप्रसिद्ध खगोल- ज्योतिषी वराहमिहिर यांना 'सहोदर' (भाऊ) म्हटले आहे. त्यांचा बृहत्संहिता ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. कथानकात भद्रबाहू वराहमिहिरांचे' त्यांचे भविष्य कसे अचूक नाहीं हे दाखवून देतात. वराहमिहिर विघ्ने उत्पन्न करतात. त्या विघ्नांच्या उपशमासाठी भद्रबाहू 'उपसर्गहर' स्तोत्राची रचना करतात असे म्हटले आहे. प्रबंधचिंतामणीत मात्र हाच सर्व वृत्तांत पाटलीपुत्र येथे घडला असे म्हटले आहे. 'न्यायावतारसूत्र' या सुप्रसिद्ध जैन न्यायविषयक ग्रंथाचे कर्ते, 'स्तुतिविद्या' आणि 'कल्याणमंदिर' स्तोत्रांचे कर्ते सिद्धसेन दिवाकर आपल्या अखेरच्या दिवसात 'प्रतिष्ठानपुरास आले. त्यांनी तेथेच प्रायोपवेशनाने देहत्याग केला असे प्रभावकचरितात म्हटले आहे. प्रबन्धचिन्तामणी ग्रंथात गुर्जराधिपती सिद्धराज आणि 'कोल्लापुर येथील राजा यांच्या संबंधातील एक हकीगत सांगितली आहे. तेथील महालक्ष्मी मंदिरातील दीपोत्सवाचा उल्लेख लक्षणीय आहे. उपसंहार : आरंभीच म्हटल्याप्रमाणे साहित्यात आख्यायिका, दंतकथा आणि इतिहास यांचे सतत मिश्रण झालेले असते. त्यातून प्रमाणित इतिहास शोधणे फार कठीण असते. हे सर्व गृहीत धरले तरी जैन आचार्यांनी लिहिलेल्या पाच प्रबन्धविषयक ग्रंथांमधून जैन क्षेत्रे व जैन धर्मप्रभावक व्यक्तींचा इतिहास नोंदविण्याची असलेली त्यांची दृष्टी मोलाचा Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ मानली पाहिजे. सध्या जैन साहित्याचा शतकानुसारी आढावा घेण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. इसवीसनपूर्व काळापासून १७ व्या शतकापर्यंत श्वेतांबर-दिगंबर आचार्यांनी सातत्याने आरंभी अर्धमागधी व जैन शौरसेनी भाषांतून आणि नंत जैन महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश भाषांतून जी साहित्यनिर्मिती केली आहे, त्याला भारतीय वाङ्मयाच्या झहिासात तोड नाही, हे नक्की. संदर्भ-ग्रंथ-सूची १) प्रभावकचरित : प्रभाचन्द्र, सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजयमुनि, अहमदाबाद, १९४० २) प्रबन्धचिन्तामणि : मेरुतुङ्ग , सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजय, शान्तिनिकेतन, १९३३ ३) प्रबन्धकोष : राजशेखर, सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजय, शान्तिनिकेतन, १९३५ ४) विविधतीर्थकल्प : जिनप्रभ, सिंघी जैन ज्ञानपीठ, शान्तिनिकेतन, १९३४ ५) प्राकृत साहित्य का इतिहास : जगदीशचन्द्र जैन, वाराणसी, १९८५ ६) भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान : डॉ. हीरालाल जैन, भोपाळ, १९६२ ७) प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास : डॉ. नेमिचन्द्र शास्त्री, वाराणसी, १९६६ ***** Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ १३. जैन पुराणातील राजे (इतिहास-संकलन-परिषद, पुणे येथे वाचलेला शोधनिबंध, २०१०) लेखक : श्री. सुमतिलाल भंडारी मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी 'सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च । वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् ।।' अर्थात् पुराण पाच प्रकारचा विचार करते. उत्पत्ति, प्रलय, वंश, मन्वन्तर मनु व वंशाचा इतिहास. 'पुराण' शब्दाची हिंदू साहित्यातील ही परिभाषा जैन पुराणांनाही लागू पडते. रामायण, महाभारत, हरिवंशपुराण आदि हिंदूंचे ग्रंथ 'पुराण' या स्वरूपात मोडतात. पुराण याचा अर्थ प्राचीन. ही हिंदूंची पुराणे जेव्हा लोकप्रिय होऊ लागली तेव्हा जैन विद्वानांनाही पुराण लिहावेसे वाटू लागले. मग त्यांनी पुराणांतर्गत जैन महापुरुषांची चरित्रे लिहिली. तीर्थंकरांची तसेच राम, श्रीकृष्ण आदि प्रभावी पुरुषांची चरित्रे लिहिली. (राम आणि श्रीकृष्ण हे जैनांमध्ये आदरणीय मोक्षगामी पुरुष आहेत. 'त्रिषष्टिशलाकापुरुष' या चरित्रग्रंथात राम व श्रीकृष्ण यांना अनुक्रमे बलदेव व वासुदेव असे संबोधले आहे.) श्रुतकेवली भद्रबाहू स्वामी यांनी अर्धमागधी भाषेत रचलेल्या 'कल्पसूत्र' या ग्रंथात ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ व महावीर या तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. 'हरिवंशपुराण' हे महाकाव्य २२ वे तीर्थंकर नेमिनाथ अथवा अरिष्टनेमी यांचे चरित्र वर्णन करणारे आहे. त्यामुळे या महाकाव्याचे दुसरे नाव 'अरिष्टनेमिपुराणसंग्रह ' असेही आहे. याचे कर्ता पुन्नाटसंघीय जिनसेन असून निर्मितीकाल अंदाजे ८ वे शतक आहे. वसुदेवहिंडी या आचार्य संघदासगणि व धर्मसेनगणि यांनी इ. स. च्या ६ व्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रंथात, ऋषभदेवांचे तसेच श्रीकृष्णपिता वसुदेव यांचे चरित्र दिले आहे. विमलसूरि या आचार्यांनी 'पउमचरिय' हे रामचरित्र, महाकाव्य या रूपाने इ.स.च्या तिसऱ्या शतकात म्हणजे वाल्मीकि रामायणानंतर जवळ जवळ २०० वर्षांनी लिहिले आहे. हे जैन रामायण आहे. अशाकरिता की यातील घटना व क्रम वाल्मीकि रामायणाप्रमाणेच आहे. पण त्यांना वाटणाऱ्या विपरीत, असंभवनीय गोष्टींना तर्काचा, तत्त्वांचा व कर्मसिद्धांतांचा आधार देऊन त्यांनी काही फेरबदल केले आहेत. विमलसूरि, या महाकाव्याला 'पुराण' असे संबोधतात. ज्ञातृधर्मकथा, अंतकृद्दशा, उत्तराध्ययनसूत्रावील सुखबोधाटीका या ग्रंथात अनेक राजांच्या कथा आल्या आहेत. जैन पौराणिक महाकाव्यांची कथावस्तू जैन धर्मातील ६३ शलाकापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारलेली आहे. शलाकापुरुष म्हणजे स्तुत्य पुरुष, सर्वोत्कृष्ट महापुरुष अथवा सृष्टीत उत्पन्न झालेले वा उत्पन्न होणारे सर्वश्रेठ महापुरुष. हे शलाकापुरुष म्हणजे २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव, ९ प्रतिवासुदेव व ९ बलदेव हे होत. या ६३ पुरुषांमध्ये भरत, ब्रह्मदत्त, श्रीकृष्ण, राम, बलराम, जरासंध, रावण आदींचा समावेश आहे. या महापुरुषांनी भरत क्षेत्राच्या इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ६३ शलाकापुरुष हे एक धार्मिक काव्य आहे व कथेद्वारा धर्मोपदेश देणे हाच याचा उद्देश आहे. ६३ शलाकापुरुष ही रचना पुराण याकरिता आहे की यामध्ये प्राचीनांचे इतिवृत्त आहे. हे वर्णन प्राचीन कवींनी केले आहे. हे महान याकरिता आहे की यात महापुरुषांचे वर्णन आहे. हे महान याकरिताही आहे की हे महान शिकवण देते. ६३ महान पुरुषांचे वर्णन करणारे काव्य म्हणून हे 'महापुराण' आहे. त्यामुळे जैनांमध्ये या महाषाणाचे महत्त्व तेवढेच आहे जितके रामायण, महाभारताचे आहे. ‘त्रिषष्टिमहापुरुषगुणालंकार' हा महाकाय काव्यग्रंथ 'पुष्पदंत' या कवीने अपभ्रंश भाषेत लिहिला. याचा निर्मितीकाळ इसवी सनाचे १० वे शतक असा आहे. आचार्य जिनसेन यांनी 'आदिपुराण' हा ग्रंथ ९ व्या शतकात लिहिला. तिसरा ग्रंथ ‘त्रिषष्टिशलाकापुरुषचरित' हा आचार्य हेमचंद्रांनी (श्वेतांबर जैन मुनी) संस्कृतमध्ये इ.स.च्या १२ व्या शतकात लिहिला. अशा पुष्कळ लेखकांनी ६३ शलाकापुरुषांवर ग्रंथ लिहिले आहेत. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ हे शलाकापुरुष असे आहेत. २४ तीर्थंकर : वृषभ, अजित, संभव, अभिनंदन, सुमति, पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, सुविधि, शीतल, श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्मनाथ, शांतीनाथ, कुन्थु, अरह, मल्ली, मुनिसुव्रत, नमि, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर. १२ चक्रवर्ती : भरत, सगर, मघवा, सनत्कुमार, शांतिनाथ, कुन्थुनाथ, अरह, सुभौम, पद्म, हरिषेण, जयसेन, ब्रह्मदत्त. ९ वासुदेव : त्रिपृष्ठ, द्वयपृष्ठ, स्वयंभू, पुरुषोत्तम, पुरुषसिंह, पुरुषपुंडरीक, दत्त, नारायण, श्रीकृष्ण. ९ प्रतिवासुदेव अश्वग्रीव, तारक, मेरक, मधुकैटभ, निसुम्भ, बलि, प्रहरण, रावण, जरासंध. ९ बलदेव : वितय, अचल, धर्म, सुप्रभ, सुदर्शन, नंदी, नंदिमित्र, राम, बलभद्र. जैन पौराणिक ग्रंथात अनेक राजांचा उल्लेख आढळतो. प्रायः हे राजे चार प्रकारात आढळतात. एक म्हणजे आपल्या राज्याचा, संपत्तीचा त्याग करून, दीक्षा घेऊन लोकांना धर्मोपदेश देणारे. यात तीर्थंकरादि व्यक्ती येतात. उदा. ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ, महावीर इ. दुसरे म्हणजे गृहस्थाश्रमात राहून काही एका विशिष्ट प्रसंगाने प्रतिबोधित होऊन स्वत:च दीक्षा घेणारे व मोक्षाला जाणारे मोक्षगामी पुरुष. यात प्रत्येकबुद्ध येतात. उदा. करकंडु, नमीराजा, नग्गतिराजा, द्विमुखराजा, शालिभद्र इ. तिसरा प्रकार म्हणजे राजपदावर राहून पण जैन धर्म स्वीकारून धर्माचा प्रसार करणारे व धर्माचा आधारस्तंभ झालेले राजे. हे राजे चांगले आचरण करीत प्रजेला सन्मार्ग दाखवितात या प्रकारात चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, राजा श्रेणिक (बिंबिसार), कुणिक (अजातशत्रू), जितशत्रू, कुमारपाल आदि राजे येतात. चौथ्या प्रकारात राजे दीक्षा घेतात पण धर्मोपदेश न करता एकांत स्थळी जाऊन तपश्चर्या करतात आत्मोन्नती साधतात. प्रत्येक प्रकारातील एक एक उदाहरण पाहूया. जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव : अयोध्या नगरीचे १४ वे अंतिम कुलकर नाभिराजा व राणी मरुदेवी यांच्या पोटी ऋषभदेवांचा जन्म झाला. नाभिराजा मरण पावल्यावर ते राजे बनले. पण सर्वांना ते परिचित आहेत ते त्यांच्या कार्यामुळे. सर्व मानवजातीला सुसंस्कृत करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या काळी मानवजात प्रगत नव्हती. लोक झाडाखाली झोपत. कंदमुळे खात. लोकांचे जीवन कर्तव्यशून्य व निष्क्रिय होते. लोकसंख्येची वाढ झाली होती. त्यामुळे भांडणे, वैर, घृणा, संघर्ष अशा अपप्रवृत्ती आढळून येऊ लागल्या होत्या. ऋषभदेवांनी या लोकांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांना शेती करण्याची, वस्त्रे विणण्याची कला शिकविली. स्वत: विनीता नगरी (आताची अयोध्या) निर्माण करून नगर, गाव कसे निर्माण करावे हे शिकविले. स्वत: दोन राण्यांशी - सुनंदा व सुमंगला यांच्याशी विवाह करून विवाहसंस्था अस्तित्वात आणली. आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्रियांना मानाचे स्थान दिले. जातीनुसार नाही तर प्रत्येकाच्या कामानुसार क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी वर्णव्यवस्था अस्तित्वात आणली. थोडक्यात त्यांनी लोकांना पुरुषार्थाचा धडा घालून दिला व निष्क्रियता नष्ट केली. मानवजात सर्वार्थाने प्रगत झाल्यावर आपला पुत्र भरत यास राज्यावर बसवून त्यांनी दीक्षा घेतली. श्रमण धर्माची स्थापना केली. साधु-साध्वी, श्रावक-श्राविका अशा चतुर्विध संघाची स्थापना केली. ऋषभदेवाचे नाव ऋषभ अथवा वृषभ अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. या त्यांच्या कार्यामुळेच जैनांबरोबर त्यांना वैदिक व बौद्ध धर्मात आदराचे स्थान मिळाले. (१) ऋग्वेदात त्यांचा उल्लेख जागोजागी आढळतो (ऋ. १०/१६६/१). Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ ऋषभं मासमानानां सपत्नानां विषासहिम् । हंत्तारं शत्रूणा कृधि, विराजं गोपतिं गवाम् ।। (ऋ. १०/१६६/१) तसेच त्यांचा उल्लेख अथर्ववेदात (ऋचा १९/४२/४) व तैत्तियारण्यकात (ऋ. २/७/१) मध्येही आढळतो. भागवत पुराणात ऋषभदेवांना २४ अवतारांपैकी एक अवतार मानले आहे. त्यातल्या 'रजसा उपप्लुतो अयं अवतारः ।' या उद्गारात ऋषभदेवांचा धुळीने माखले असण्याचा उल्लेख आहे. भगवान ऋषभदेवांची स्तुती मनुस्मृतीमध्येही खालीलप्रमाणे आढळते. अष्टषष्टिवु तीर्थेषु यात्रायां यत्फलं भवेत् । श्री आदिनाथस्य देवस्य स्मरणेनापि तद्भवेत ।। त्याचप्रमाणे शिवपुराण, आग्नेयपुराण, ब्रह्माण्डपुराण, विष्णुपुराण, नारदपुराण आदि पुराणातही ऋषभदेवांचा उल्लेख तर आहेच. त्याचबरोबर त्यांच्या जीवनातल्या घटनाही दिल्या आहेत. (२) मोहनजोदारो (इ.स.पू. ६०००) याच्या उत्खननात ऋषभदेवांची मूर्ती सापडली होती. ती मूर्ती ऋषभदेवांची होती हे अशाकरिता की मूर्तीच्या खाली वृषभाची आकृती होती जी त्यांची खूण आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ऋषभदेवांचा काळ हा मानवाच्या सुसंस्कृतपणाच्या सुरवातीचा काळ होता हे मान्य करावे लागते. त्यावरून त्यांचे प्राचीनत्व सिद्ध होते. इतर निरीक्षणे : २४ तीर्थंकरांपैकी केवळ ऋषभदेवच असे तीर्थंकर होऊन गेले की ज्यांनी अष्टापद अर्थात् कैलास पर्वतावर अंतिम तपस्या करून तेथून निर्वाणपद प्राप्त केले. त्यांचे जटाधारी स्वरूप, कैलास पर्वतावरील ध्यानस्थ अवस्था, नंदीशी असणारे वृषभाचे चिह्न तसेच वृषभदेवांना जसा पिता, पत्नी, पुत्र असा परिवार होता तसाच पौराणिक शंकरालाही होता. त्याचप्रमाणे शंकराचा स्मशाननिवास आणि भस्मलेपन हे अंशही ऋषभदेवांच्या वर्णनातून घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जैन अभ्यासकांचे असे मत आहे की ऋषभदेवांच्या व्यक्तिमत्वाचे काही अंश उत्तरकालीन, पौराणिक शिव देवतेच्या वर्णनात समाविष्ट केले असावेत. प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध राजे : गृहस्थाश्रमात राहून गुरूंच्या उपदेशाशिवाय, एखाद्या प्रसंगाचे किंवा वस्तूचे निमित्त होऊन काही राजे विरक्त झाले व त्यांना बोधि प्राप्त झाली. नंतर त्यांनी स्वत:च दीक्षा घेतली व लोकांना उपदेश न देता शरीराचा अंत करून ते मोक्षाला गेले. अशा राजांना प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध असे संबोधले जाते. हे प्रत्येकबुद्ध एकाकी विहार करणारे असतात व ते गच्छावासात रहात नाहीत. उत्तराध्ययन या मूलसूत्राच्या १८ व्या अध्यायात चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख आढळतो. तो असा - करकंडु कलिंगेसु, पंचालेसु य दुम्मुहो । नमी राया विदेहेसु, गंधारेसु य नग्गई ।। (उत्त. १८.४६) एए नरिंदेवसभा, णिक्खता जिणसासणे । पुत्ते रज्जे ठवित्ताणं, सामण्णे पज्जुवट्टिया ।। (उत्त. १८.४७) अर्थात् कलिंग देशाचा करकंडु, पांचाल देशाचा द्विमुख, विदेह देशाचा नमीराजा तर गांधार देशाचा नग्ग राजा, हे चार श्रेष्ठ राजे आपल्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून जिनशासनात प्रव्रज्या घेते झाले व श्रमणधर्मा सम्यक् प्रकाराने स्थिर झाले. श्वेतांबर संप्रदायात या चार प्रत्येकबुद्धांवर कथा दिलेल्या आढळतात. उत्तराध्ययन सूत्रावरील सुखबोधाटीका Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ या ११ व्या शतकात आ. देवेद्रगणि यांनी लिहिलेल्या ग्रंथात या कथा आलेल्या आहेत. बौद्धांच्या कुम्मकारजातक या पालिसाहित्यात या चार राजांना प्रत्येकबुद्ध मानून यांच्यावर कथा दिलेल्या आहेत (जातककथा क्र.४०८). बौद्ध लोक या चारही राजांना महात्मा बुद्धांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानतात. यातील करकंडु राजा पार्श्वनाथ संपरेतला जैन असण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे चारही राजे समकालीन होते. या प्रत्येकबुद्धांचा काळ भ. पार्श्वनाथ व भ. महावीर यांच्या मधला काळ मानला जातो जो २५० वर्षांचा आहे. या प्रत्येकबुद्धांवर प्राकृतमध्ये प्रत्येकबुद्धचरित' हा इ.स. १३ व्या शतकात लिहिलेला श्री तिलकसूरिरचित ग्रंथ आढळतो. संस्कृतमध्ये प्रत्येकबुद्ध महाराजर्षि चतुष्कचरित्र' हा जिनलक्ष्मीकृत ग्रंथ आढळतो. कनकामर मुमी यांनी अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ' हा ग्रंथ इ.स.च्या ११ व्या शतकात लिहिला आहे. ___या चौघांच्या पैकी, दिगंबर साहित्यात मात्र फक्त करकंडूचेच चरित्र आढळते. परंतु दिगंबरांनी करकंडूला प्रत्येकबुद्ध असे संबोधलेले आढळत नाही. ___ या चार राजांव्यतिरिक्त इतरही अनेक बुद्ध होऊन गेल्याचे आढळते. ऋषिभाषित या ग्रंथात या प्रत्येकबुद्धांची एकूण संख्या ४५ दिली आहे. त्यातले २०० नेमिनाथांच्या, १५ पार्श्वनाथांच्या तर १० प्रत्येकबुद्ध महावीरांच्या तीर्थकाळात झालेले दाखविले आहेत. वरील चार राजांव्यतिरिक्त अंबड, कूर्मापुत्र, धन्ना, शालिभद्र आदींची नावे यात आढळतात. राजपदावर राहून जैन धर्माचा प्रसार करणारे प्राचीन राजे : कलिंग देशाचा राजा सम्राट खारवेल हा इ.स.पू. पहिल्या शतकात होऊन गेला. तो चेदि महामेघवाहन वंशाचा होता. तो अतिशय शूर व पराक्रमी होता. त्याने कलिंग देशाला एक सुदृढ व शक्तिशाली राज्य बनविले. हे राज्य गंगापासून ते गोदावरीपर्यंत विस्तृत होते. खारवेल राजाचा जन्म जैन परिवारातच झाला होता. त्यामुळे तो जन्मत:च जैन होता. परंतु जैनधर्मी असूनही त्याचा इतर धर्मांप्रती उदार दृष्टिकोन होता. बौद्ध धर्मावरही त्याचे प्रेम होते. किंबहुना समसामायिक कलिंगावरबौद्ध धर्माचा प्रभाव वाढण्याचे तेही एक कारण मानता येईल. कलिंग देशाला जैन धर्माची परंपरा इ.स.पू. ५ व्या शतकात होऊन गेलेल्या करकंडु राजाकडून मिळाली होती. करकंडच्या काळी पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म प्रचलित होता. भुवनेश्वर जवळील उदयगिरी पर्वतात हाथी गुफा आहे. त्या गुफेत छतावर राजा खारवेल याने ब्राह्मी लिपीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावरून खारवेल राजाची माहिती मिळते. या शिलालेखात खारवेल राजाच्या १३ वर्षांच्या राज्यकारकीर्दीचा आढावा घेतलेला दिसतो. शिलालेखावरून राजा खारवेलने जैन धर्माच्या संस्थापनेचे व प्रसाराचे प्रमुख कार्य केल्याचे दिसते. राज्यपदावर आल्यावर त्याने जैन तीर्थ मथुरेला यवनाच्या तावडीतून मुक्त कले असे लिहिलेले आहे. शिलालेखावरून त्याकाळच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनावर प्रकाश पडतो. राज्यामध्ये संगीत, नृत्य, उत्सव आदींचे आयोजन केले जात होते. खारवेल स्वत: क्रीडा व संगीतप्रेमी असल्याचे त्यात म्हटले आहे. स्त्री, पुरुष दोघेही अलंकारप्रिय होते. धनिक लोक आपल्या पगड्यांनाही अलंकार घालीत. स्त्रियांना राज्यात मान होता. त्या पतीबरोबर उत्सवात सहभागी होत. एकट्या स्त्रिया राजपथावर अश्वारूढ व गजारूढ होत. त्या नृत्य, संगीत, वादन आदींमध्येही प्रवीण होत्या. कलिंग देशात शस्त्रास्त्रे निर्माण केली जात होती. शेतीबरोबरच पशुपालन हाही एक प्रगत व्यवसाय होता. त्याकाळच्या चित्रांवरून रोम देशाबरोबर कलिंग देशाचा व्यापार चालू होता व रोममधील भांडी कलिंगामध्ये आयात केलेली होती असे दिसते. दुसरा राजा कुमारपाल हा गुजराथेतील अणहिल्ल नगराचा राजा होता. तो चालुक्यवंशीय होता. व इ.स. १२ Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ व्या शतकात राज्य करीत होता. तोही अतिशय शूर व पराक्रमी होता. तसेच तो अतिशय हुशार व उदारमतवादी होता. न्यायाने राज्य करीत होता. सुखी जीवनाकरिता खरा धर्म जाणून घेण्याची त्याला उत्कंठा होती व प्रबळ इच्छा होती. गुजराथेत आलेल्या जैन आचार्य हेमचंद्रसूरि यांच्या प्रभावाने त्याने जैनधर्म स्वीकारला व त्याचा सर्वांगाने प्रसार केला. आचार्य हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला कथांद्वारे उपदेश दिला. प्राण्यांची हिंसा, छूत, मांसाहार, मद्यपान, वेश्यागमन इ. सप्त व्यसनांचे भयानक परिणाम त्यांनी दाखवून दिले. एवढेच नाही तर राजाला या व्यसनांना राज्यात बंदी घालण्याकरिता सांगून तसा राजादेशही काढविला. खरे देव, खरे गुरू व खरा धर्म याविषयी सांगून इतर धर्मतले मिथ्यात्व व अंधश्रद्धा दाखवून दिली. याकारणाने कुमारपालराजा श्रद्धायुक्त होऊन जैनधर्माकडे ओढला गेला. ____ कुमारपाल राजाने नंतर राज्यात जैन मंदिरे उभारली. त्यांना स्वत: भेटी देऊ लागला. अष्टाह्निकांसारखे जैनांचे उत्सव साजरे करू लागला त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली. दुर्बल घटकांकरिता अन्न व वस्त्रे देण्याची व्यवस्था केली. धार्मिक कृत्यांकरिता पौषधशाळा निर्माण केल्या. गिरनार पर्वतावरील जैन मंदिराकडे जाण्याकरिता पायऱ्या बांधल्या. ___ कुमारपाल राजाने आचार्य हेमचंद्रांकडून १२ श्रावक व्रते ग्रहण केली. मरेपर्यंत त्याने त्यांचे निष्ठापूर्वक आचरण केले. कुमारपाल राजाच्या मृत्यूनंतर सुमारे ११ वर्षांनी आचार्य हेमचंद्रांचे शिष्य सोमप्रभसूरि यांनी 'कुमारपालप्रतिबोध' या ग्रंथाची रचना केली. यात आ. हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला उपदेश देताना सांगितलेल्या कथा ग्रथित केल्या आहेत. या ग्रंथाची भाषा जैन महाराष्ट्री असून यातील काही प्रस्ताव संस्कृत व अपभ्रंश भाषेत आहेत. यावरून सोमप्रभसूरींची प्रकांड पंडितता व विविध भाषांवरचे प्रभुत्व दिसते. या ग्रंथात सप्तव्यसनांसहित एकूण ५४ कथा आहेत. या कथा अतिशय रंजक व बोधप्रद आहेत. ___ जैन पुराणातील राजांचा विचार करताना वर उल्लेखिलेल्या चार राजांचा प्रामुख्याने विचार केला. त्या पाठीमागील कारणमीमांसा अशी आहे. ___ भद्रबाहूरचित कल्पसूत्रात वृषभ, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर अशा चार तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. उरलेल्या २० तीर्थंकरांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या चार तीर्थंकरांपैकी क्षत्रिय राजे म्हणून ऋषभदेवाचे नाव घेतले जाते. तसेच ते घेतले जाते ते त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही. दुसरे कारण असे की ऋषभदेवांना वैदिक, जैन, बौद्ध अशा तिन्ही साहित्यात पुष्टी मिळालेली दिसते. राजा म्हणून व धर्माचा प्रसार करणारे म्हणून ऋषभदेवांबद्दल वर माहिती दिली आहे. करकंडु, नमि, द्विमुख व नग्गति अशा चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख उत्तराध्ययनसूत्रात केलेला आढळतो. या चौघांना जैन व बौद्ध धर्मात मान्यताही आहे. तरीही करकंडु राजा पार्श्वनाथांच्या काळातला जैन राजा असण्याची दाट शक्यता आहे. तसेच अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ हा ग्रंथही उपलब्ध असल्याने त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळते. खारवेल हा सर्वात जुना जैन परंपरा असलेला व शिलालेखी पुरावा असलेला एकमेव राजा होय. जैन कथांमध्ये चंद्रगुप्त व चाणक्य यांचे वर्णन जैन म्हणून केलेले दिसते. या दोघांनीही दीक्षा घेतली. चंद्रगुप्त आ.भद्रबाहूंबरोबर कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथे आला. तेथे चंद्रगुंफेमध्ये त्याने संथारा व्रत धारण केले. आदि वृत्तांत जैन याग्रंथांमध्ये आढळतात. परंतु चंद्रगुप्त हा प्रत्यक्ष जैन धर्मावलंबी असल्याचे इतिहासकार मानीत नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्व इतिहासकारांनी सम्राट खारवेल यांचे जैन धर्मावलंबन मान्य केले आहे व त्याचेच शिलालेखही असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याची माहिती वर दिली आहे. प्राचीन इतिहासाच्या तुलनेत त्यामानाने अर्वाचीन काळात म्हणजे इसवी सनाच्या १२ व्या शतकात होऊन गेलेला चालुक्यवंशीय राजा कुमारपाल याची ऐतिहासिकता सर्व इतिहासकारांनी मान्य केली आहे. वाङ्मयाच्या आधारे ऐतिहासिकतेचा शोध घेणे हे काम अतिशय अवघड आहे. अशा परिस्थितीत जैन Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ वाङ्मयाच्या आधारे ज्यांची ऐतिहासिकता निष्पक्षतेने मान्य करता येते अशा राजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा प्रस्तुत शोधनिबंधात घेण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भ-ग्रंथ-सूची १) प्राकृत साहित्य का इतिहास - डॉ. जगदीशचंद्र जैन २) जैन साहित्य का बृहद् इतिहास - डॉ. गुलाबचंद्र चौधरी, पार्श्वनाथ विद्याश्रम शोधसंस्थान, वाराणसी ३) महापुराण भाग १ व २ - डॉ. देवेंद्रकुमार जैन ४) त्रिषष्टिशलाकापुरुषचरित - अनुवादक श्री गणेश ललवाणी एवं श्रीमती राजकुमारी बेगानी ५) उत्तराध्ययनसूत्र ६) ऋषभदेव : एक परिशीलन - देवेंद्रमुनी शास्त्री ७) करकंडुचरिउ - डॉ. हिरालाल जैन ८) प्राकृत साहित्याचा संक्षिप्त इतिहास - सन्मति-तीर्थ प्रकाशन ९) कुमारपालप्रतिबोध - सं. आर.टी.व्यास (गायकवाड ओरिएन्टल सेरीज - १४), सोमप्रभाचार्य १०) खारवेल - श्री. सदानंद अग्रवाल (श्री दिगंबर जैन समाज, कटक) ११) आओ, जैन धर्म को जाने - प्रवीणचंद जैन ** ******** Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ १४. जैन तत्त्वज्ञान आणि जैन समाजातील परिवर्तने (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, मुंबई येथे विशेष व्याख्यान, नोव्हेंबर २०१०) (१) प्रस्तावना : समाजाची परिवर्तनशीलता ; परिवर्तनशीलतेला जैन तत्त्वज्ञानात स्थान आपल्या आजूबाजूचे जग, वस्तू, व्यक्ती, घटना सर्वांमध्ये सतत बदल चालू आहेत. काही बदल मंद तर काही शीघ्र आहेत. बदलांच्या अखंड मालिकेने डोळ्यात भरणारी पृथगात्मकता ज्याने जाणवते त्याला आपण 'परिवर्तन' म्हणू या. सामान्यत: अशी अपेक्षा केली जाते की धर्माचरणामध्ये अशी परिवर्तनशीलता असावी. परंतु ती इतकीही नसावी की जिने धर्माला आधारभूत चौकट देणाऱ्या सिद्धांतांना, तत्त्वांना धक्का बसेल. जैन परंपरेचे असे वैशिष्ट्य आहे की बदल, परिवर्तनशीलता आणि 'ध्रौव्य' या दोहोंना तिने आपल्या मूलभूत ढाचातच कौशल्याने विणून ठेवले आहे. 'सत्' म्हणजे reality'चे स्वरूपच जैन दर्शनाने कूटस्थ नित्य' न मानता 'उत्पाद-व्यय-ध्रौव्ययुक्त सत्' असे मानले आहे. अशी 'सत्' द्रव्ये एकूण सहा मानली आहेत. जगातील खऱ्याखुऱ्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींची विभागणी षड्-द्रव्यांमध्ये केली आहे. द्रव्याची व्याख्या-'गुणपर्यायवद् द्रव्यम्' अशी आहे. यातील ‘पर्याय' संकल्पनेत अवस्थांतरे, बदल, परिवर्तने याला भक्कम सैद्धांतिक पार्श्वभूमी आहे. ____ वस्तूकडे (व्यक्तीकडे, घटनांकडे) पाहण्याचे चार 'निक्षेप'ही परिवर्तनशीलतेला वाव देणारे आहेत. ते म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भाव. अनेकान्तवादाचा सिद्धांत तर theory of non-absolutism' अगर theory of relativity म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याचा अधिक विस्तार न करता म्हणेन की 'जैनत्व अबाधित राखणारे घटक' आणि 'जैन समाजातील कालानुसार परिवर्तने' या दोन मुद्यांचा विचार आणि त्यातील सुसंगती दाखवणे हे आजच्या माझ्या भाषणाचे प्रयोजन आहे. (२) जैनविद्येकडे पाहण्याचे अभ्यासकांचे जुने प्रारूप (model). ते बदलण्याची आवश्यकता ___ “मुळातला जैनधर्म हा अत्यंत सैद्धांतिक, मूलगामी व कडक असून, साहित्यात, समाजात आणि कलानिर्मितीत, केल्या गेलेल्या तडजोडी ही सर्व ‘भ्रष्टरूपे' आहेत”-असे एक प्रारूप जैनविद्येचे देशी-विदेशी अभ्यासक, कयासमोर ठेवून मूल्यांकन करीत असत. गेल्या दशकात म्हणजे २१ व्या शतकाच्या आरंभापासून हे वैचारिक प्रारूप बदलण्याच आवश्यकता, अभ्यासकांना वाटू लागली. डॉ. जॉन ई. कोर्ट, डॉ. पॉल डून्डास इ. पाश्चात्य विचारवंतांनी नवीन विचारसरणी प्रथम दृष्टिपथात आणली. वैदिक धर्मापासून पुराणातील हिंदुधर्मापर्यंत, त्या परंपरेत जे बदल, परिवर्तने व अवस्थांतरे झाली, त्याची अनेक अभ्यासकांनी 'लवचिक', 'समन्वयवादी' अशा शब्दात भलावण केली. हिंदूच्या विकसनशील दैवतशास्त्राचा चिकित्सक अभ्यास केला. नवीन बदलांना स्वीकृती दिली. __ हिंदू समाजाच्या अत्यंत निकट राहणाऱ्या, जैन समाजाने मात्र ज्या चालीरीती, श्रद्धा व देवदेवता स्वीकारल्या, त्याबद्दल जैनांमधल्या सनातन्यांनी पाखंड म्हणून हिणवले. विचारवंतांनीही 'जैनीकरण' 'जैनीकरण' अशी दूषणे लावली. जैनधर्म आणि हिंदुधर्म यांना असे दोन वेगळे निकष लावायचे का ? 'हे सर्व बदल बाह्य आचारबदल आहेत की सिद्धांताशीही तडजोड केली आहे, याचा पुनर्विचार होणे अत्यंत जरूरीचे आहे. (३) जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार टिकविण्याचे मुख्य आधार - १) कुटुंब २) स्वाध्याय मंडळे ३) साधुसाध्वी वर्ग औपचारिक शिक्षण पद्धतीतून जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार यांचे मिळणारे मार्गदर्शन जवळ-जवळ नगण्य आहे. समाजही अल्पसंख्य आहे. तरीही हे तिन्ही अव्याहतपणे २६००-२७०० वर्षे टिकून राहण्याचे मुख्य आधार, वर वर्णन केलेले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. हे आव्हान खरोखरच अवघड आहे. धर्माचरणाची व सिद्धांतांची Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ मूलभूत आवड असल्याशिवाय, हे टिकून राहणे दुष्कर आहे. त्यामुळेच द्रव्य-क्षेत्र - काल-भावानुसार काही तडजोड करतच, या धर्माचे अस्तित्व टिकून राहिले. (४) कोणत्या गोष्टींमुळे जैन समाज हिंदू बांधवांच्या अगदी जवळ आला असा आभास निर्माण होतो ? १) मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा : 'सैद्धांतिक दृष्टीने निरीश्वरवादी असलेल्या जैनधर्मीयांनी मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा इ. ना आपल्या धर्मात का बरे स्थान दिले ?' - असा कळीचा प्रश्न वारंवार विचारला जातो. हिंदुधर्माचा यांवरील प्रभाव पूर्ण नाकारता येणार नाही. तथापि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीतरागी जिनांची स्थापना करून, त्यांच्या आदर्शरूप मानवी गुणांची पूजा करणे, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. भक्ती, श्रद्धा, पूजा यांना स्थान असले तरी ते पुण्यबंधकारक मानले आहे. सिद्धांतानुसार भक्ती, पूजा, गुणानुवाद, दान इ. सर्व कृत्ये पुण्य बांधतात परंतु कर्मांची निर्जरा करू शकत नाहीत. त्यासाठी ज्ञानपूर्वक केलेल्या तपस्येची, शुद्ध आचरणाची आणि संयमित वृत्तींची आवश्यकता आहे, हे प्रत्येक जैन व्यक्ती प्राय: समजूनच असते. यक्ष-यक्षिणी, विद्यादेवता, शासनदेवता इ. मुळे कदाचित ऐहिक लाभ होऊ शकतील (अर्थात् तेही कर्मफलानुसार). परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी देवदेवता पूजन प्रत्यक्ष सहाय्यभूत होऊ शकत नाही. २) सण-वार- उत्सवात सहभाग : हिंदू बांधवांच्या सण-वार-उत्सवात जैन बांधवांचा सहभाग हा निव्वळ सामाजिक कारणाने असतो, धार्मिक नव्हे. अर्थातच काही अपवाद असू शकतात. अक्षयतृतीया, दिवाळी इ. प्रसंगी आवर्जून, जैन इतिहासातील व्यक्तींचे व घटनांचे स्मरण केले जाते. ३) चातुर्मास व इतर व्रते : हिंदूंच्या व जैनांच्या चातुर्मासाच्या पद्धतीत साम्प्रत काळातही बराच फरक दिसतो. जैनांच्या चातुर्मासात तप आणि उपवासाला विशेष महत्त्व असते. हिंदू व्रते प्राय: पूजाविधी व भोजनविधीच्या संबंधित असतात. मुळातच 'व्रत' हा शब्द जैन परंपरेत महाव्रते व श्रावकव्रते (अणुव्रते) यांच्याशीच जोडलेला आहे. इच्छित गोष्टीच्या प्रतीसाठी केलेली तात्कालिक व्रते जैनांमध्ये त्यामानाने अत्यल्प आहेत. त्यापेक्षा दैनंदिन, चातुर्मासिक अथवा वार्षिक नियम ग्रहण करून तो पाळण्याकडे अधिक कल दिसतो. ४) अनेक संप्रदाय - उपसंप्रदाय : अनेकांतवादी जैनधर्मातील श्वेतांबर - दिगंबर मतभेद आणि फाटाफूट होऊन निघालेले इतर संप्रदाय, याबद्दल अभ्यासक अनेकदा आक्षेप घेतात. फाटाफुटीचे समर्थन करण्याचा येथे उद्देश नाही. परंतु शैव, वैष्णव, माहेश्वरी, लिंगायत, नाथपंथी, वारकरी, रामानुजी आणि इतरही असंख्य उपसंप्रदाय असूनही, जेव्हा ते सर्वजण हिंदू म्हणून संबोधले जातात, तेव्हा समान सैद्धांतिक आधार असणारे संप्रदाय अनेक असले तरी, जैनधर्माच्या एकत्वाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. शिवाय आधुनिक काळात याच कारणासाठी धर्म आणि जात या दोन्ही शीर्षकाखाली फक्त 'जैन' असे लिहावे, असे आव्हान करण्यात येते. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे कारण जैन युवापिढीला संप्रदाय-उपसंप्रदायातील ही तेढ अजिबात मान्य नाही. येत्या दशकभरातच त्याचे परिणाम दिसण्याची सुचि जाणवू लागली आहेत. Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ (५) व्यापार व शेतीव्यवसायामुळे निर्माण झालेली अंगभूत वैशिष्ट्ये अ) साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण : भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार जैन समाजात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण जवळ-जवळ शत-प्रतिशत आहे. व्यापार आणि हिशेब ठेवणे ही तर कारणे आहेतच परंतु आदिनाथ ऋषभदेवांनी आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना लिपी विज्ञान आणि गणित यांचे शिक्षण दिले होते, ही ऐतिहासिक धारणाही यामागची पार्श्वभूमी असावी. ब) जेथे जातील तेथील समाजाशी एकरूप : भ. महावीरांच्या कार्यप्रवृत्ती प्रामुख्याने मगधात होत्या म्हणजे अंग-वंग आणि कलिंग या प्राचीन भारतीय प्रदेशात तो सर्वप्रथम पसरला. जैन इतिहासानुसार त्यानंतर तो पश्चिमेकडे व दक्षिणेकडेही प्रसृत झाला. विशेष गोष्ट अशी की व्यापारामुळे व धाडसी स्वभावामुळे जैन समाज भारतभर व भारताबाहेरही पसरत राहिला. विशिष्ट प्रदेशाशी निगडित नसल्यामुळे, त्या त्या प्रदेशाची भाषा, चालीरीती, पोषाख इ. ही स्वीकारीत गेला. एवढे सामाजिक अभिसरण होऊनही जैनधर्मीयांनी आपली पृथगात्मकता नेटाने जपली. क) भाषिक वैशिष्ट्ये : धर्म आणि आचार हा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठीच, जैन तीर्थंकरांनी आपले उपदेश ‘प्राकृत' भाषेमध्ये दिले होते. भ. महावीरांचे प्राचीन उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत आहेत. प्राकृत या बोलीभाषा असल्यामुळे त्या संपूर्ण भारतात आरंभापासूनच विविध होत्या. भाषेची स्थळानुसार आणि काळानुसार होणारी सगळी परिवर्तने, जैनधर्माने सकारात्मकतेने स्वीकारली. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश या पाचही भाषेतून ग्रंथनिर्मिती केली. १० व्या शतकानंतर गुजराती, हिंदी, मराठी कन्नड या चार भाषांमधील मूळ साहित्याला भरीव योगदान दिले. महत्त्वाची गोष्ट अशी की, आपले सर्व मूलगामी तत्त्वज्ञान वेळोवेळी त्यांनी या भाषांच्या माध्यमातून समाजापर्यंत झिरपवले. जैन समाजाचे हे वैशिष्ट्यच आहे की तो तीन-चार भाषा तरी सहजपणे बोलू शकतो. अर्थातच बहुभाषित्वाचे हे वरदान जैन साधु-साध्वी-वर्गामध्ये तर अधिकच विशेषत्वाने दिसते. ड) राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण : जैनांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहास वाचताना हे जाणवते की, या तिन्ही काळात त्यांनी राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवले. इ.स.पूर्व २०० मध्ये होऊन गेलेला सम्राट खारवेल' जन्माने जैन होता असे कलिंग अर्थात आधुनिक ओरिसातील हाथीगुंफा' शिलालेखावरून स्पष्ट होते. गुजरातेतील शैवारजा, वनराज चावडा जैनानुकूल होता. चालुक्य राजा कुमारपाल पूर्णतः जैन श्रावक होता. दक्षिणेतील कदंब, गंग, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ हे राजेही जैन साधुवर्ग व श्रावकवर्गाला अनुकूल होते. ह्या सर्व राजवटीत राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवणे त्यामानाने सोपे होते. मुघल राजांच्या आक्रमणानंतर तपागच्छ आणि 'खरतरगच्छा'च्या साधुवर्गाने त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. जिनप्रभसूरींच्या अंगी असलेल्या शक्ती व सिद्धींचा प्रभाव, ‘महम्मद तघलका'वर होता असे दिसून येते. त्यामुळेच जिनप्रभसूरींनी मुघल राजवट चालू असतानाही, अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत पुढाकार घेऊन जैनसंघाची व धर्माची खूप प्रभावना केली. त्याच्या आश्रयाने 'विविधतीर्थकल्प'सारख्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मितीही केली. १६ व्या शतकात सम्राट अकबरा'चा दरबारात आ. 'हीरविजयसूरींना सन्मानाचे स्थान होते. सम्राट अकबराने आपल्या संपूर्ण साम्राज्यात पर्युषणपर्वक्ळात कत्तलखाने बंद ठेवण्याची आज्ञा दिली होती. शिकारीलाही बंदी घातली होती. बादशाह जहांगिर'नेही अकबरानंतर हेच धोरण ठेवले होते. २० व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवरही Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ तपागच्छाच्या 'बुद्धिसागरसूरीं'च्या अहिंसाविचाराचा पगडा होता. ___पुढील काळात जैन आणि युरोपियन यांचे सामाजिक, आर्थिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. ब्रिटीश राजवटीतही जैन समाजाने Bankers, Traders and Merchants यांच्या रूपाने आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटन, आफ्रिका आणि अमेरिका या खंडात व्यापारानिमित्त पोहोचलेले लोक बहुतांशी जैनच होते. या खंडात पोहोचल्यानंतर त्यांनी आपोआपच संघटना बांधून, मंदिरनिर्मिती वअभ्यासकेंद्रे स्थापली. यशस्वी व्यापाराबरोबरच शाकाहार, अहिंसा आणि शांतता यांच्या प्रसाराचे काम, आपापल्या शक्तीनुसार चालू ठेवले. ___ या संक्षिप्त इतिहासावरून असे दिसून येते की सामोपचाराचे धोरण ठेवण्यासाठी, स्वत:त वेळोवेळी बदल घडवून आणण्याची जी शक्ती लागते, ती जैनांनी परंपरागत धर्मातून चालत आलेल्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मिळविली. (६) परिवर्तने चालू असतानाच जैनांनी जपलेले 'जैनत्व' : ___ वर वर पाहता समाजाशी एकरूप झाल्यासारखे दिसणारे जैन लोक, कोणकोणत्या बाबतीत आपल्या जैनत्वाची चिह्न जपून आहेत, या विषयाचे काही मुद्दे, माझ्या २५ वर्षांच्या निरीक्षणाच्या आधारे नमूद करीत आहे. १) अहिंसेचे आहारात प्रत्यक्षीकरण : अहिंसातत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात सूक्ष्म वापर करत असताना, जैनांनी प्रथम स्वत:च्या आहारात पूर्ण अहिंसा आणली. शाकाहाराच्या अंतर्गतही प्रत्येक वनस्पतिजीवाचा सूक्ष्म विचार करून, अनेक प्रकारच्या संयम व मर्यादा सांगितल्या. आधुनिक काळातही देश-विदेशी मिशनरी वृत्तीने शाकाहार चळवळ चालू ठेवली. त्या चळवळीला सकारात्मक पाठिंबाही मिळत आहे. २) 'आपला समाज'-अशी संघभावना : सामाजिकता जपत असतानाच स्वत: अल्पसंख्य असल्यामुळे धर्माच्या समानतेच्या आधारे, छोट्या-मोठ्या संघटना उभ्या करून, त्या द्वारे आपल्या आणि इतर समाजाच्या हिताची कामे करण्याची एक सर्वसाधारण प्रवृत्ती, जैन माणसामध्ये मूलत:च रुजलेली असते. धर्म आणि आचार टिकून राहण्यासाठी, अशा छोट्या-मोठ्या संघटना आपोआपच कार्यरत असतात. ३) साधु-साध्वी वर्गाचे तुलनेने काटेकोर आचरण : पायी विहार, वस्त्र-पात्र मर्यादा, सचित्त सेवनाचा त्याग, रात्रिभोजनत्याग इ. अनेक प्रकारचे कडक अथवा कठोर आचरण इतर धर्मीयांच्या तुलनेत, जैन साधु-साध्वीवर्ग काटेकोरपणे करीत असलेला दिसतो. वेळोवेळी यामध्ये शिथिलता आणण्याची चर्चाही होत राहते. परंतु जैनत्व जपण्यासाठी अंतिमतः हे कडक आचरण उपयुक्तच ठरते. ४) दान-मदत-सेवा यांचे सैद्धांतिक स्थान : ‘जीवो जीवस्य जीवनम्' या वचनामध्ये 'एकाने दुसऱ्याच्या जिवावर जगणे', असा भाव विशेषत्वाने दिसतो. जैन तत्त्वज्ञानात जीवाचे कार्यानुसारी लक्षण देताना ‘परस्परोपग्रहो जीवानाम्' असे दिले जाते. या लक्षणात सर्व प्रकारच्या जीवजातीप्रजातींनी एकमेकांना जगायला परस्पर सहकार्य करण्याचा भाव असल्यामुळे अर्थातच दान, मदत, सेवा इ.ना भक्कम सैद्धांतिक आधार लाभतो. परिणामी सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील जैन व्यक्तींना मनापासून दान देण्याची उर्मी विशेष करून दिसून येते. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ ५) 'पंधरा कर्मादान' अर्थात् निषिद्ध व्यवसाय : जैन श्रावकाचारात, 'कोणते व्यवसाय करावेत व कोणते करू नयेत', याबाबत मार्गदर्शन आढळते. श्रावकाचारातील पंधराही निषिद्ध व्यवसाय आधुनिक परिस्थितीत निषिद्ध ठरवता येत नाहीत. तरीही मद्य, मांस, कातडे, शिंग, केस, रेशीम, हस्तिदंत, मासेमारी इ. प्रत्यक्ष हिंसाधार व्यवसायांमध्ये जैन व्यक्ती सहजी प्रवेश करीत नाही. निषिद्ध व्यवसायांविषयीचे हे संकेत बऱ्याच अंशी पाळल्यामुळे, जैनेतरांना हे प्रांत खुले राहिले. परिणामी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने ते हितकारकच ठरले. ६) तप, उपवास व नियम ग्रहण यांना विशेष स्थान : ____ महाव्रतांचे पूर्ण पालन करणे, श्रावकाला शक्य नसल्याने यथाशक्ती धर्म पालन करणारा प्रत्येक श्रावक, प्राय: विशिष्ट धार्मिक कालावधीत तरी नक्कीच तप, उपवास अथवा विशिष्ट गोष्टींच्या त्यागाचा नियम ग्रहण करतो. असे यथाशक्ती नियम पालन 'जैनत्वा'ची ओळख म्हणूनच गणली पाहिजे. ७) क्षमापना : पर्युषणपर्वानंतर जैन समाजाकडून पाळला जाणारा क्षमापनेचा दिवस हा संवराचे साधन असलेल्या दशविधधर्मापेकी एक सद्गुण जो क्षमा'-त्याच्या आचारात्मक प्रतिबिंबावर आधारलेला आहे. ८) श्राद्ध, पितर, पिंड व इतर तत्सम चालीरीतींचा अभाव : वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत श्राद्ध, पितर, पिंड, व इतर चालीरीती हा हिंदू समाजाचा एक आविभाज्य घटक बनलेला आहे. शहरीकरणामुळे हिंदूसमाजातील या चाली काहीशा कमी दिसत असल्या तरी, मध्यम छोटी गावे, खेडी इ. मध्ये यांचे प्राय: पालन केले जाते. अगदी तुरळक अपवाद वगळता जैन समाजाने हे विधी उचललेले नाहीत. त्याचे कारण त्यांच्या पुनर्जन्मविषयक सिद्धांतात आहे. जीवाने देहत्याग केल्यानंतर काही क्षणातच तो दुसरे शरीर धारण करतो. त्यामुळे पितर, पिंड, श्राद्ध इ.ना मुळीसुद्धा वाव रहात नाही. ह्या स्पष्ट सैद्धांतिक मान्यतेत बदल करण्याची आवश्यकता जैन समाजाला कोणत्याही काळात वाटली नाही. ९) जैन तत्त्वज्ञानाचा विज्ञानानुकूलतेच्या दिशेने अभ्यास : जैन तत्त्वज्ञानाची पर्यावरणरक्षणाला असलेली अनुकूलता, परमाणु-सिद्धांताचा नवा अन्वयार्थ, गोत्र-कर्माचा आनुवंशशास्त्राशी असलेला संबंध, सम्मूर्छिमजीव आणि क्लोनिंग, जैन तत्त्वज्ञानातून मिळणारे उत्क्रांतिवादाला अनुकूल असे संकेत-ह्या आणि अशा अनेक वैज्ञानिक दिशांनी जैनविद्येच्या संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. जैनविद्येच्या अभ्यासाला आधुनिक काळात मिळत चाललेले हे अभिनव वळण, अत्यंत आशादायी आणि तत्त्वज्ञानाची महत्ता अधोरेखित करणारे आहे. ७) काळाच्या ओघात निर्माण झालेले दोष : आत्तापर्यंतच्या वर्णनावरून असे वाटेल की जैनत्व जपण्यासाठी केलेले सर्व बदल सकारात्मकच आहेत की काय ? अर्थातच हे खरे नाही. बदल-परिवर्तन करून घेत असताना स्वाभाविकपणे दोष हे उद्भवणारच. ___ 'गहमयुर' वृत्ती, संप्रदाय-संप्रदायात कापणा-वैमनस्य-तेढ, आर्थिक घोटाळ्यांशी संबंध, दानात दडलेली दिमाख दाखविण्याची वृत्ती, समारंभी बडेजाव-डामडौल, 'अहो रूपं अहो ध्वनिः' -अशा प्रकारे पुरस्कारांची लचेल, सामाजिक प्रतिष्ठेचे दडपण, हाव अथवा अट्टाहास, जैन सोडून जे इतर ते पाखंड'-अशी वृत्ती, आर्थिक भरभरीसाठी साधु-बुवा-ज्योतिषांकडे घेतलेली धाव-हे आणि इतरही अनेक दोष जैन समाजाबाबत दृष्टोत्पत्तीस आणून दिले Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ जातात आणि येतील. ____ परंतु यातील कित्येक दोष असे आहेत की जे काळाच्या ओघात एकंदर समाजातच खतपाणी घालून जोपासलेले आहेत, केवळ जैन' असल्यामुळे आलेले नाहीत. 'भ्रष्टाचार हाच शिष्टाचार' अशा सार्वत्रिक नैतिक अध:पतनाच्या काळात हे जैन-हे जैनेतर' अशी तफावत करून ठोकत रहाणे उचित नव्हे. ___ अत्यंत वरचा मलईदार स्तर (creamy layer) आणि निम्न स्तर हे वगळता सामान्यत: जैन समाज धर्मप्रेमी, कौटुंबिक व अंतर्गत भावनिक संबंध जपणारा, संकटकाळी तत्परतेने मदतीसाठी पुढे होणारा, तडजोडवादी आणि इतरांशी एकरूप होता होता स्वत:चे 'जैनत्व' जपण्याची तारेवरची कसरत करणारा असा आहे. ते बदल आणि परिवर्तने तो सहज स्वीकारतो जे मूलभूत तत्त्वज्ञानाच्या चौकटीशी सुसंगत ठरतात. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामान्यतः समजतात तसे 'जैन' म्हणजे केवळ 'जैन दर्शन' नव्हे. ही एक स्वायत्त, प्राचीन परंपरा आहे. त्या परंपरेला तिचा म्हणून खास इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, आचारप्रणाली आणि कलानिर्मितीची प्रेरणा आहे. या सर्व प्रांतात जैनांनी भारतीय संस्कृतीला दिलेले योगदान, 'संख्याबल' पाहता, खरोखरच लक्षणीय आहे !!! ********** Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ १५. जैन चातुर्मास : काही निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा (स्वानंद महिला संस्था, पुणे, चर्चासत्र, जानेवारी २००८) (जैन साधु आचारात, वर्षभराचा विहार थांबवून, पावसाळ्याचे चार महिने एका ठिकाणी राहण्याचे विधान आहे. भ. महावीरांच्या चरित्रात त्यांच्या साधु जीवनातील ३० चातुर्मासांचे वर्णन अर्धमागधी व जैन महाराष्ट्री यात येते. प्रस्तुत लेख हा पुणे परिसरातील श्वेतांबर स्थानक वासींच्या चातुर्मासावर प्रामुख्याने आधारित आहे. यातील निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा सुमारे १०० जैन गृहिणींच्या चर्चेतून पुढे आल्या आहेत. वाचकांना काही मते न पटल्याप्त त्यावरून वादंग निर्माण करू नये ; ही अपेक्षा.) आज प्रचलित असलेला वैदिक हिंदू (पौराणिक, देवताप्रधान व भक्तिप्रधान) धर्म आणि जैन धर्म यांच्यात एरवी फारसे उठून न दिसणारे भेद चातुर्मासाच्या वेळी अगदी स्पष्ट दिसून येऊ लागतात. हिंदू स्त्रियांमध्ये व्रन पूजांची लाट उसळते. श्रावण-भाद्रपदात तर प्रत्येक दिवशी हिंदू स्त्री सणवारांसाठी धावपळ करताना दिसते. मोठ्या शहरात धावपळीच्या आयुष्यातही सामान्यत: स्त्रिया, नवविवाहित मुली शिवामूठ, मंगळागौर, सत्यनारायण, हरितालिका, गणेशस्थापना-विसर्जन, अनंतव्रत इत्यादि व्रते करताना दिसतात. छोट्या शहरात आणि गावात तर ही व्रते व पूजा अधिक उत्साहाने व मनापासून साजऱ्या होतात. ठराविक दिवशी खिचडी, भगर, रताळी इ. खाऊन उपवास, सणावाराल स्नान वगैरे करून भरपूर स्वयंपाक, नैवेद्य, फळे-फुले-पत्री गोळा करून देवाला वहाणे इत्यादि गोष्टी सुरूहोतात. दूरदर्शनच्या मालिकांमध्ये बघून-बघून, तरुण-तरुणीही सणावाराला गणपती, साईबाबा अशा ठिकाणी लांबलचक रांगा लावून दर्शन घेताना दिसतात. जैन गृहिणी मात्र घरातले व्याप, स्वयंपाक कमी करून स्थानक-मंदिरातील कार्यक्रमांना. प्रवचनांना हजेरी लावू लागतात. पर्युषणात तर शक्यतो कंदमुळे, पालेभाज्या, मोडाची कडधान्ये वर्ण्य मानतात. एरवी शांत असणाया स्थानक व मंदिरात उत्साहाचा महापूर येतो. निमंत्रित साधु-साध्वी ठरलेल्या ठिकाणी विराजमान होतात. कमिट्या स्थापन केल्या जातात. सुप्त पुरुषवर्गामध्येही चैतन्य सळसळू लागते. वर्गण्या काढल्या जातात. त्या अनेकदा लाखातीह असू शकतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्पॉन्सरर्सचा शोध घेतला जातो. विधिपूर्वक उपवास अथवा नियम घेतले जातात. मोठमोठे मंडप पडतात. शेकडो बॅनर्स लागतात. धार्मिक साहित्याचे स्टॉल्स सजतात. अनेकांच्यानावानिशी पाट्या झळकू लागतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कामांना, करमणूकीच्या कार्यक्रमांना व शिबिांनाही उधाण येते. अशा प्रकारचे चातुर्मास वर्षानुवर्ष चालू आहेत.आपण प्रथम याचे काही फायदे पाहू - १) जैन समूहाला एकत्रित येण्याचे एक ठिकाण मिळते. एकीभावना टिकून रहाते. २) पावसाळ्यामुळे इतरत्र फारसे हिंडता फिरता येत नाही. त्यामुळे स्थानक-मंदिरात नटून-थटून जाण्याचा उत्साह वाढतो. ३) युवक-युवती, लहान मुले इ. ना धार्मिक प्रथांची माहिती होते. त्यांच्यावर जैन धर्माचे व सामाजिकतेचे संस्का होतात. संयमाचे शिक्षण मिळते. ४) वेगवेगळ्या स्पर्धांमुळे सर्वांच्या कलागुणांना वाव मिळतो. पारितोषिके भरपूर असल्याने प्रोत्साहन मिळते. ५) सामाजिक प्रतिष्ठा वाढते. ६) दान देण्याची भावना निर्माण होते. ७) नेतृत्वगुणाला वाव मिळतो. एकंदरीत, जरा धावपळ झाली तरी चातुर्मास हवाहवासा वाटतो. चर्चेतून पुढे आलेली काही स्पष्ट मते व निरीक्षणे : १) 'कोणाचा चातुर्मास अधिक यशस्वी झाला ?' - अशा चर्चा सुरू होतात. मोठमोठे मांडव, मोठे बजेट, थाटमाट, Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ गर्दी, जेवणावळी इ. निकष त्यासाठी वापरले जातात. २) गेल्या काही वर्षात याच कारणाने साधु-साध्वींची ओढ शहरी भागाकडे वाढली आहे. छोट्या गावांना, खेड्यांना साधु-साध्वींच्या सत्संगाचा लाभ होत नाही. (अर्थात् त्यामुळे स्वाध्यायी श्रावक-श्राविकांना भरपूर वाव मिळता) ३) ठराविक ठिकाणी ठराविक लोकांचे वर्चस्व वर्षानुवर्षे रहाते. वाव न मिळालेले लोक असंतुष्ट रहातात, ___ आपोआपच दूर जातात. ४) साधु-साध्वींच्या पुढे पुढे करण्याची अहमहमिका सुरू होते. ५) प्रभावना म्हणून खाद्यवस्तू, पुस्तके व भोजनांचे आयोजन केले जाते. नव्या पिढीला या गोष्टी निरर्थक वाटतत. ६) बालक, गृहिणी, युवक-युवती, सुना, जोडपी अशा वेगवेगळ्या गटांसाठी शिबिरे आयोजित केली जातात. __ अनेकदा वेगवेगळ्या मंडळांची स्थापना होते. चातुर्मासानंतर त्यात कोणतेच सातत्य रहात नाही. ७) स्टेजवर राजकीय पुढाऱ्यांना व स्पॉन्सरर्सच्या () बसवून त्यांची स्तुति-स्तोत्रे गायली जातात. शाली, माळा व मोमेंटो देऊन सत्कारांचे कार्यक्रम इतके रटाळ केले जातात की अतिशय कंटाळवाणे वाटू लागते.स्टेजवर भरमसाठ सत्कार आणि श्रोत्यांमध्ये आपसात गप्पा व चर्चा सुरू रहातात. ८) स्थानिक लोकांमध्ये आधीच काही स्वाध्याय मंडळे, धार्मिक-शैक्षणिक कार्य चालू असते. त्यांची मुळीच दखल घेतली नाही अथवा त्यांच्याविषयी तुच्छतावाद व्यक्त केला तर आधीचे चांगले उपक्रम बंद पडतात. नवीन तर टिकू शकतच नाहीत. अनेक वर्षे चालू असलेले सन्मति-तीर्थ चे प्राकृत व जेनॉलॉजीचे क्लासेस ४-५ गावालरी अशा प्रकारे बंद झाले आहेत. ९) काही ठिकाणी जैन समाज जास्त असतो. काही ठिकाणी मोजकी घरे असतात. गृहिणी अधिक व्यस्त झाल्या आहेत. गोचरीचे नियमही अनेकांना माहीत नसतात. त्यातूनच मग साधु-साध्वींना गोचरीचे टइम-टेबल देणे, टिफिन पोहोचता करणे - अशा प्रथा सुरू होतात. त्या अनेकदा सोयीस्कर ठरतात. अनेक महिलांचे असेही मत पडले की साधु-साध्वींना योग्य असा साधा, प्रासक आहार एके ठिकाणी बनवून द्यावा. 'भिक्षाचर्या' च्या नियमात बसत नसल्याने असे करता येत नाही - या मताचा पुरस्कार इतरांनी केला. साधुंना भिक्षा देण्याचा विधी नवीन पिढीला माहीत होण्यासाठी गोचरीची आवश्यकता आहे - असेही मत काहींनी सांगितले १०) आपापली पीठे अथवा संस्था स्थापन करणे, त्यासाठी आवाहन करून पैसा उभा करणे, त्यातून सामाजिक, धार्मिक कामे करणे - अशी लाटही काही वर्षांमध्ये साधु-साध्वींमध्ये पसरत आहे. काही श्रोत्यांनी या स्वांना, 'संन्यासधर्माला अयोग्य असा परिग्रह असे नाव दिले. काहींनी त्या निधीतून शाळा-कॉलेज, हॉस्पिटलस, अनाथालये, अंध-पंगु-आश्रम, ग्रंथालये इ. उभे रहात असल्यास, ती नव्या काळाची गरज मानून पाठिंबा दिला. त्यातूनच साधुधर्माचे ध्येय 'आत्मकल्याण' की 'समाजसेवा' असा प्रश्न उपस्थित झाला. 'साधूंनी धार्मिक व आध्यात्मिक प्रांतात कार्य करावे, समाजोन्नतीचा विषय समाजसेवकांवर सोपवावा - असाही एक विचार पुढे आला. 'एक घरसंसार सोडून या मोठ्या प्रपंचाची उलाढाल कशासाठी करायची ? हा प्रश्नही विचारला गेला. 'दीन-दु:खी व गरजूंची सेवा हा काय जैन-धर्म-पालनाचा एक मार्ग नाही का ? असा प्रतिवाद केला गेला. त्यानंतर चर्चा पुढच्या मुद्याकडे वळली. ११) काही महिलांनी त्यांच्या मनातील शल्ये मोकळेपणाने बोलून दाखविली. * आपले नेतृत्वगुण जरा उाखविले की साधु-साध्वी आग्रह करून अशा काही अवघड जबाबदाऱ्या अंगावर टाकतात की ते 'अवघड जागेचं दुखणं' बनते. मग त्यांना टाळण्याकडे कल होऊ लागतो. * अनेकांची अपेक्षा असते कीआपण त्यांचा जेथे जेथे चातुर्मास असेल तेथे तेथे जाऊन त्यांच्या संपर्कात रहावेहे तर अशक्यच असते. * प्राकृत भाषा किंवा काही तत्वज्ञानविषयक शंका घेऊन आपण गेलो तर त्याविषयी चर्चा करायला पुरेसा वेळ तेदेऊ शकत नाहीत. त्यावेळी जनसंपर्क खूपच असतो. Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ * तरुण मुलामुलींना अगदी गळ घालून, खेचून नेले तर त्यांची वेषभूषा, केशभूषा, धार्मिक पाठांतराचा अभाव याब टीका टिप्पणी केल्याने मुलांची मने दुखावतात. खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडण्याच्या शपथा घेणेही मुलांन रुचत नाही. प्रवचनांना यायला तर युवक-युवती नाराजच असतात. त्यांच्या कथा-कहाण्या बोअर होतात, 'नवीन ठोस मुद्दे कोणतेच नसतात' असा मुद्दाही मुले उपस्थित करतात. * पति-पत्नी दोघेही खूप उत्साहाने रोज सामील झाले तर घरातील वडीलधारे व मुलेबाळे यांची खूप आबाळ होते 'गृहिणीधर्म' सोडून मी असे वागू का ? - असा प्रश्न सतावतो. * साधु-साध्वींनी B.A.; M.A. किंवा Ph.D. होण्यास आमची काय हरकत असणार ? परंतु परीक्षेचा फॉर्म भरणे, नोट्स् मिळवून देणे, परीक्षेची तयारी करून घेणे इ. साठी ते एकाच गोष्टीसाठी ३-४ जणांना गळ घालतात. त्यांनासतत अनेक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी खूप तारांबळ उडते. * 'गणपती उत्सवाचे कार्यक्रम' आणि 'पर्युषणाचे कार्यक्रम यात जवळजवळ काहीच फरक उरलेला नाही. मग 'आमच्या घराशेजारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही का अटेंड करू नये ? - हा प्रश्नही विचारला गेला. धार्मिक उद्दिष्टांशी संबंधित असलेले निव्वळ मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवू नयेत - असे एकमताने श्रोत्यांनी सांम्मिले. * इतक्या प्रकारची प्रवचनांची पुस्तके, सी.डी., डी.व्ही.डी., स्वत:चे फोटो छापलेल्या वह्या-पेन्स यासंबंधीभनेकांनी नाराजी व्यक्त केली. धार्मिक पुस्तकांच्या लाखोंनी प्रती काढून, जाणत्या-नेणत्यांना सरसकट वाटण्याने सत्रग्रंथांची 'आशातना' च होते असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले. ___ 'आणखी वीस वर्षांनी चातुर्मासाचे स्वरूप कसे असेल ? या प्रश्नावर, 'आत्ता ज्या प्रकारे चालला आहे तसा नक्कीच नसेल' असे सर्वसंमत उत्तर मिहाले. त्याच्या खोलात शिरल्यावर पुढील विचार नोंदविले गेले. * श्रावक जसे बदललेले, नवीन विचारांचे असतील तसेच साधूही नवीन विचारांचे असतील. * प्रवचन अगदी १ तासाचे - ज्ञानवर्धक व माहिती देणारे असेल. त्यानंतर सर्वजण आपापल्या उद्योगाला जातील. * चार महिन्यांच्या जागी एकत्रित पर्वविधी फक्त आठ दिवसांचा असेल. * खाण्यापिण्याचे कडक नियम नवी पिढी बहधा आठ दिवस पाळेल. * हार-तुरे, सत्कार-गौरव व रटाळ भाषणे यांना फाटा मिळेल. * श्वेतांबर-दिगंबर-स्थानकवासी५तेरा पंथी हे भेद बरेच कमी झालेले असतील. जैन' एकतेची भावना वाढेल. * नवी पिढी अधिक सत्यप्रिय, निर्णयक्षम व अवडंबर-रहित आहे. शाकाहार, सचोटी, धर्मप्रेम व कुटुंबप्रेम हे क्यम राखून ती पिढी चातुर्मासाला नवेच रूप प्राप्त करून देईल - या असीम आशावादी विचारांनी चर्चासत्राचा शेवट झाला. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ १६. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे स्थान (दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, कोपरगाव, सप्टेंबर २००८) गेली ५० वर्षे संपूर्ण जगात आणि गेली १० वर्षे भारतात, स्त्रीमुक्तीच्या चळवळीने फारच जोर धरलेला दिसतो. गेल्या काही दशकात विचारवंतांनी या विषयावर इतके काही लिखाण केले आहे की, स्त्रीमुक्तीसंबंधीच्या साहियाचे एक स्वतंत्र ग्रंथालय होऊ शकते. पुण्यासारख्या शहरात अशी स्वतंत्र ग्रंथालये आहेत. अलिकडे समाजातील प्रत्येक घटक कधी नव्हे एवढा जागृत झाला आहे, अशा परिस्थितीत महिला सुद्धा आपापल्या संघटना मजबूत करू लागल्या आहेत. मुंबईत-महागाई प्रतिकार समिती, भारतीय महिला फेडरेशन, पुण्यात-समाजवादी महिला सभा, महिला संपर्क समिती, नारी समता मंच, दिल्लीत-महिला सभा, महिला दक्षता समिती, जनवादी महिला सभा, इंडियन कौन्सिल फॉर फॅमिली वेल्फेअर, तसेच विविध छोट्या मोठ्या राज्यात ग्रामीण पातळीवरही महिला संस्था कार्यरत आहेत. आपल्या परीने या संस्था हुंडा-बेकारी-बलात्कार इत्यादि अनेक अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहेत. समाजातील पुरुषप्रधानता हे काही केवळ भारतीयांचे वैशिष्ट्य नाही. इतिहासात डोकावले तर एखादा अपवाद वगळता, संपूर्ण जगभरातच अशी पुरुषप्रधानता दिसते. स्त्रीमुक्तीचा लढा पुरुषांच्या विरुद्ध उभारलेले बंड आहे का ? पुरुषांपासून मुक्ती मिळविण्याच्या नादात भरकटलेले, एकाकी जीवन आपण जगू इच्छितो का ? सर्व देशांच्या हासात असे दिसते की, स्त्री-जागृतीच्या कार्याला आरंभ पुरुषांच्या पुढाकाराने झाला आहे. गुलामगिरीविरुद्धचा लढा गुलाम नसलेल्यांनीच आरंभिला. कामगार लढ्याबाबतही हेच झाले. स्त्रीमुक्ती ही पुरुषांपासून पळ काढण्यासाठी नसून त्यांच्या सहकार्याने व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची एक संथगतीची क्रिया आहे. असे सतत जाणवते. स्त्रीमुक्तीच्या चळवळीला योग्य ते अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी भारताच्या गत इतिहासात स्त्रीचे कोणते स्थान होते ते प्रथम पाहू. वैदिक व बौद्ध परंपरेतील स्थान संक्षेपाने पाहू व त्यानंतर जैन धर्मग्रंथांत विशेषत: ११ आग्रंथांत प्रतिबिंबित झालेले स्थान पाहू. वैदिक धर्मात स्त्री : वेदकाळात आरंभी, धर्माचे स्वरूप कर्मकांडात्मक व गुंतागुंतीचे नव्हते. वैदिक सूक्ते रचणे, उपनयन, यज्ञ अश प्रसंगी स्त्रियांचा बरोबरीचा सहभाग असावा असे दिसते. काही मोजक्या उल्लेखांवरून स्त्रियांच्या उच्चस्थानाविषयी निर्विवाद विधाने करणे शक्य नाही. वेद व ब्राह्मणकाळात संन्यासाची व मोक्षाची चर्चा आढळत नाही. उपनिषदात आत्मविद्येची चर्चा येते. परंतु स्त्रियांच्या संदर्भात मोक्षाची चर्चा आढळत नाही. स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक स्थानात यानंतर झपाट्याने न्हास सुरू झालेला दिसतो. बहुपत्नीत्वाची चाल, स्त्रियांचे विवाहाचे वय घटणे, उपनयन इ. संस्कारांचा व मंत्रोच्चारणाचा हळूहळू नष्ट झालेला हक्क या सर्वांचा परिणाम म्हणून, इ.स.पू.५०० च्या सुमारस धर्माची द्वारे स्त्रियांसाठी बंद झाल्याचे आपणास दिसते. विविध स्मृतींमध्ये याचे पडसाद उमटलेले दिसतात. जैन व बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार होऊ लागल्यावर व इतरही काही सामाजिक कारणांनी विविध पौराणिक पंथ व भक्मिार्गाचा उदय होऊ लागला. या व्रत-उपासना-भक्तीवर आधारित धर्मात आता हिंदू स्त्रीला पुन्हा स्थान प्राप्त होऊ लागले. स्त्रियांचा संन्यास व स्त्रियांना मोक्षप्राप्ती या संकल्पना हिंदू धर्माने संपूर्णपणे दुर्लक्षिलेल्या दिसतात. आताची धर्मिक हिंदू स्त्री रामायण-महाभारत व पुराणे वाचते, विशिष्ट व्रतवैकल्ये करते, पूजा, नैवेद्य इ. करून विविध सण-वासाजरे करते. गीता, अथर्वशीर्ष, रामरक्षा इ. म्हणते व राम, कृष्ण, शंकर, गणपती अशा अनेकविध देवतांची उपासना करते आजही तिच्या मनात निवृत्ती, संन्यासधर्माचा स्वीकार अथवा मोक्षप्राप्ती हे विचारही येत नाहीत. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ बौद्ध धर्मात स्त्री : महावीरांच्या जवळ जवळ समकालीन असलेले गौतमबुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. आत्यंतिक कर्मकांड अथवा आत्यंतिक वैराग्य याच्या मधला मार्ग म्हणून ते स्वत:च्या धर्माला 'मध्यम-मार्ग' म्हणतात. १४ निदाने व ५ शील यावर आधारलेला हा 'अष्टांगमार्ग' आहे. बौद्ध भिक्षुणींचा एकंदर आचार-विचार, नियम, भिक्षूंच्या तुलनेत स्थान, त्यांच्यातील वाद-विवाद, कलह या सर्वांचे दर्शन आपल्याला 'विनयपिटक' व 'जातककथा'तून होते. जैन संघाप्रमाणेच बौद्ध संघही भिक्षु–भिक्षुणी, उपासक उपासिका असा चतुर्विध असतो. स्त्रियांना संघात प्रवेश देण्यास गौतमबुद्ध आरंभी फारसे उत्सुक नव्हते. भिक्षू 'आनंदा'ची कळकळीची विनंती व 'महाप्रजापति गौतमी'ची (गौतमुद्धांची सावत्र माता) एक प्रकारची धार्मिक चळवळ, यामुळे बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिलेला दिसतो. भिक्षुणींसाठी विनयपिटकात दिलेल्या ‘अट्ठ- गुरु- धम्म' या नियमातून गौतमबुद्धांचा स्त्रियांकडे बघण्याचा सहानुभूतिशून्य व उपेक्षा करणारा दृष्टिकोण दिसतो, असे निरीक्षण बौद्ध धर्माच्या अभ्यासक श्रीमती दुर्गा भागवत यांनी नोंदविले आहे. बौद्ध दीक्षाविधी जैन दीक्षाविधींपेक्षा साधेपणाने झालेले दिसतात. बुद्धांच्या मते स्त्रिया अरहंतपद प्राप्त करू शकतात परंतु 'बुद्ध' होऊ शकत नाहीत. बौद्ध धर्मग्रंथात उपासिकांना एक खास स्थान दिसते. बुद्धघोषाच्या मते बुद्ध, धम्म व संघाला जो शरण गेला, तो उपासक होय. गौतमबुद्ध स्वत: उपासिकांशी चर्चा करून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास मदत करीत. सुजाता, विसाखा, खुज्जुत्तरा, सुप्पवाता, कातियानी या स्त्रियांचा स्वत: गौतमबुद्ध 'आदर्श उपासिका' અસા ગૌરવ તાત. બૌદ્ધ આામાતૂન પાતિવિષયી વરીવ માહિતી મિ∞તે. અર્ધમા ધી ગ્રંથાંત ત્યા માનાને નૈન श्राविकांविषयी माहिती फारशी मिळत नाही. गौतमबुद्धांच्या आचारविषयक उदारमतवादी धोरणामुळे जैन धर्मापेक्षा बौद्धधर्माचा प्रसार सर्व जगभर आज झालेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धधर्म स्वीकारानंतर भारतात तरी त्या धर्माची धुरा दलित बर्गाकडे आहे, असे चित्र दिसते. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे कौटुंबिक स्थान : जैन धर्मग्रंथाच्या अभ्यासाने पुढील निरीक्षणे दिसून येतात. कन्या ही कुटुंबात मोठे स्नेहभाजन आहे. औपाचारिक शिक्षण हा केंद्रबिंदू नसून थोड्याबहुत ललितकला व मुख्य म्हणजे विवाह हीच तिच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना आहे. मातापित्यांकडून तिला संस्कार, भरणपोषण व पित्याच्या इच्छेने विवाहातील प्रीतिदानाचे हक्क आहेत. सियाच्या संपत्तीत वारसा हक्क नाहीत. अविवाहित कन्या व अनेकदा विधवाही, पित्याकडेच राहतात. विवाहानंतर ती पतीच्या एकत्र कुटुंबाचा घटक बनते. सहपत्नी नसलेल्या कुटुंबात ती अधिक सुखी व स्वतंत्र आहे. खर्च ती पतीच्या अनुमतीनेच करते. समाजातील कष्टकरी वर्गातील स्त्रिया पतीबरोबर व्यवसायात सहभागी होतात. राजघराण्यातील व धनिक वर्गातील पत्नींना सपत्नींशी व्यवहार करावे लागतात. मोठमोठी अंत:पुरे ही मत्सर, द्वेष, कारस्थाने व राजकीय संबंधांनी युक्त दिसतात. संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य नसले तरी पूर्ण पारतंत्र्यही नाही, मर्यादित स्वातंत्र्य आहे. माहेरून आणलेल्या संपत्तीवर स्त्रीचा पूर्ण हक्क आहे. सासरच्या संपत्तीत वाटा नाही. पतीच्या मृमूनंतर जीवन संपूर्ण परावलंबी आहे. घरात विनयशील रहावे लागले तरी घुंघट, पडदा हा घरात अगर समाजात घ्यावा लाग नाही. सण, उत्सव, जत्रा, मेजवान्या, धर्मप्रवचन, दीक्षोत्सव, उद्यानयात्रा, प्रेक्षणक (नाटक) ही करमणुकीची साधने आहेत. एकपत्नी पद्धतीतील स्त्रियांचे कामजीवन बहुतांशी सुखासमाधानाचे आहे. अनैतिक संबंधाची कारणे बरीचशी बहुपत्नीत्वामुळे येणाऱ्या अतृप्त कामजीवनात आहेत. सर्व प्रकारच्या कुटुंबियांशी संबंध प्राय: चांगलेच आहेत. दीक्षेसाठी पती त्याच्या मातापित्यांची अनुमती घेतो, पत्नीची घेताना दिसत नाही. बहुतांशी कुटुंबात कष्टप्रकामासाठी नोकर, दास-दासी आहेत. पति-पत्नीत गैरसमज, कलह बरेचदा किरकोळ आहेत. संबंधविच्छेद, पुनर्विवाह, विधवाविवाह, सती या प्रथा अगदी नगण्य स्वरूपात आहेत. धार्मिक स्वातंत्र्य आहे. माता बनणे, बालकांचे संगोपन हे मोठे आनंदाचे विषय आहेत. पुत्र अगर कन्या यापैकी कोणीही जन्मले तरी Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ अपत्याचे स्वागत करतात. अपत्यप्राप्तीसाठी नवस करतात. दत्तकाची पद्धत तुरळक आढळते. डोहाळे कोणत्याही प्रकारचे असले तरी, पती व कुटुंबीय ते पुरविण्यात तत्पर आहेत. मातेचे संबंध पुत्राशी, तर पित्याचे कन्येशी,अधिक जवळकीचे आहेत. अपत्यांविषयीच्या जबाबदाऱ्या पति-पत्नी दोघे मिळून पार पाडतात. दास-दासी ठेवण्याची पद्धत आहे. धात्रींचा दर्जा बराच चांगला आहे. दास्यत्वातून क्वचितच सुटका होते. दासींची आर्थिक, सामाजिक, धार्मिक व कामजीवनविषयक स्थिती अत्यंत अनुकंपनीय आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातील ते अंधकारमय पर्व आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे सामाजिक स्थान : व्यक्ती कुटुंबात जन्मलेली असली तरी वावरत असते ती समाजात ! व्यक्तीच्या जडणघडणीत समाजाचा मोठाच वाटा असतो. कर्मपरिणाम व पुरुषार्थवादाला प्राधान्य देणाऱ्या जैन धर्मात, रूढीनुसार केलेल्या जन्मापसून मृत्युसंस्कारापर्यंतच्या संस्कारांना, खरे तर खास स्थान नाही. संस्कृत मंत्र व विविध विधानांनी भरलेले कर्मकहप्रधान संस्कार आगमांत दिसत नसले तरी, समाजाच्या रेट्याने या संस्कारांना पूर्णविराम मिळू शकलेला दिसत नाही. मग्न नियम-अपवादांनी भरलेले क्लिष्ट संस्कार काहीसे सुलभ झालेले दिसतात. आगमकालीन स्त्री खऱ्याखुऱ्या अर्थाने समृद्ध व कलात्मक आयुष्य जगते ती विविध सामाजिक उत्सवात भाग घेऊनच ! स्त्री-पुरुष, कुमार-कुमारी, बालक-बालिका या उत्सवप्रसंगी समाजात मोकळेपणाने वावरताना दिसतात. त्यातील काही उत्सव धार्मिक स्वरूपाचे तर काही निव्वळ आमोद-प्रमोदासाठी दिसून येतात. खाद्य-पेय, नृत्य-गीतनाटक, माल्य-पुष्पे यांची रेलचेल असलेल्या या उत्सवांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरातील स्त्रिया सहभागी होताना दिसतात. 'संखडी' या आधुनिक काळातील 'फूड फेस्टिव्हल'सारख्या आहेत. फक्त तेथे अन्नाचा क्रयविक्रय होत नाही. रूढी, अंधविश्वास, अपसमज, शकुन-अपशकुन यांच्या जोखडातून, कोणताही समाज कोणत्याही काळी सुटू शकत नाही. आगमकालीन जैन समाज देखील वैदिक देवता व स्थानिक देवतांच्या पगड्याखालून सुटलेला दिसत नाही. डोहाळे, नवस, अपत्यप्राप्ती या संदर्भात स्त्रिया यक्ष, भूत, पिशाच, तंत्र-मंत्र, जादूटोणा यांना आश्रय देतान दिसतात. काम, वासना, विषय-भोग, स्त्रीपुरुष-आकर्षण यांचा विचार आगमांत वारंवार केलेला दिसतो. अर्थात् तो वर्जनाच्या, निषेधाच्या स्वरूपात व निंदेच्या सुरातच केलेला दिसतो. विविध गुन्ह्यांचा व विशेषत: अनैतिक संबंधया उगम, अनेक ठिकाणी स्त्रियांच्या अतृप्त कामजीवनात दिसतो. बहुपत्नीत्वपद्धतीमुळे अंतर्गत हेवेदावे, मत्सर व वधापर्यंतही मजल गेलेली दिसते. वेश्या व गणिका या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या संस्था, आगमकाळी चांगल्याच स्थिरावलेल्या व प्रतिष्ठाप्राप्त दिसतात. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व समृद्ध, अद्वितीय सौंदर्याच्या सम्राज्ञी, विविध विद्या व कलांत प्रवीण व शृंगाररसाचे आगर असलेल्या कामध्वजा व आम्रपालीसारख्या गणिकांचे, जैन व बौद्ध आगमात वर्णिलेले स्थान, हे आगमकालीन सुदृढ कामजीवनाचे प्रतीक आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे धार्मिक स्थान : जैन धर्मग्रंथांत, साध्वीधर्म स्वतंत्रपणे प्रतिपादन केलेला दिसत नाही. साधुधर्माच्या आधारेच तो समजून घ्यावा लागतो. साध्वींच्या दीक्षेची कारणे, दीक्षेस अनुमती, दीक्षामहोत्सव यांचा विचार विस्ताराने केलेला दिसतो. सांछ्या दीक्षाविधीइतक्याच गौरवपूर्ण रितीने साध्वींचे दीक्षाविधी झालेले दिसतात. आचारात साधू व साध्वी यांच्याबाबत जो फरक केलेला दिसतो, जे अपवाद केलेले दिसतात, ते साध्वींना गौण लेखण्यासाठी केलेले नसून, त्यांची सुचतिता व शीलरक्षण केले असावेत, असा तर्कसंगत निष्कर्ष काढावा लागतो. संघाचे सर्वोच्च पद देताना मात्र, पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. उपाध्यायिनी अगर स्त्री गणधर आपणास आगमकालीन जैन संघात आढळत नाहीत. साधुवंदनेबाबतही स्त्रियांचे स्थान गौण दिसते. साध्वींच्या संकटमय जीवनाचे चित्र आगमात दृष्टोत्पत्तीस यो. Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ खडतर अशा सामाजिक, भौगोलिक, राजकीय परिस्थितीत साध्वींनी ज्या दृढश्रद्धेने आध्यात्मिक प्रगती साधली, त्यामुळे तर आगमकालीन स्त्रियांच्या उत्कृष्ट मनोबलाचे ऊर्जस्वल दर्शन घडून आले. चतुर्विध संघाला दृढप्रतिष्ठ करण्यात ज्यांचा फार मोठा सहभाग आहे, अशा जैन श्राविकांचा अथवा उपासिकांचा विचार आपण यानंतर केला. श्वेतांबर जैन आगमांत 'श्रावकाचार' स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. आगमात उल्लेखित अशा श्राविकांचा विचार केल्यावर, गृहस्थाश्रमातील धार्मिक जीवनाचे एक प्रगल्भ चित्र आपल्यासमोर उभे राहते. पतीच्या सांगण्यानुसार श्राविका बनलेल्या, स्वतंत्रपणे धर्मोपदेश ऐकून श्रद्धावान बनलेल्या, स्वत: बरोबर कुटुंबियांनाही निष्ठ बनवणाऱ्या, पतीला श्रावकव्रतात स्थिर करणाऱ्या, स्वधर्मीय व इतर धर्मीयांशी मोकळी, तर्कसंगत चर्चा करणाऱ्या, साधर्मिकांचे स्वागत करणाऱ्या, साधुप्रायोग्य आहार-वसतिदान करणाऱ्या, तत्त्वांपासून विचलित न होणाऱ्या, अंतिमः संलेखनेने देहत्याग करणाऱ्या, मोक्षमार्गी झालेल्या, अशा स्त्रियांच्या धार्मिक जीवनाचा प्रत्यय आपणास आगमातून येतो. अपवादादाखल पतीला धार्मिकतेपासून परावृत्त करणाऱ्या, मद्यपी, क्रूर अशा रेवतीसारखे एखादे उदाहरणही क्वचित आढळते. साध्वी व उपासिका या दोन्ही रूपात आगमकालीन जैनधर्मी स्त्रीचे आदरणीय स्थान आपल्याला दिसून येते. जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचे सांस्कृतिक जीवन : भरभराटीस आलेली समृद्ध नगरे, त्यातील आखीव मार्गरचना, मालाने ओथंबून वाहणाऱ्या बाजारपेठा, अनेक मजली भव्य राजप्रासाद, धनिकांच्या हवेच्या रूपसंपन्न गणिकांचे वैभव, नंदा - पुष्करिणीसारखी आरामोद्याने, राण्यांची शयनगृहे, ग्रामांमधील हिरवीगार शेते, पशुशाळा, धान्य, वस्त्रे, उपभोगाच्या सामग्रीची रेलचेल, विविध क्रीडा, लयनाट्य इत्यादि मनोरंजनाची साधने, ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात साजरे केलेले मनमोकळे सामाजिक उत्सव, अश तऱ्हेच्या अनेक उच्च अभिरूचींनी नटलेल्या सांस्कृतिक जीवनाचा ठसा, आगमांच्या अभ्यासकाच्या अंत:करणावर, प्रथमदर्शनी उमटतो. सुखसाधनांची कोणतीही उणीव नसलेल्या राजपुत्र व राजकन्यांच्या दीक्षा, अनेक कारणांनी समाजातील विविध स्त्रियांनी अंगीकारलेला श्रावकधर्म व साध्वीधर्म, विविध धर्मोपदेशसभा, अंतकृद्दशेत स्त्रियांनी आचरलेली कठोर तपे, प्रौषधशाळा, जैन व जैनेतर पारिव्राजिकांचे संवाद - वादविवाद, श्रद्धाळू श्राविकांनी साधुसाध्वींना दिलेले आहारदान, असे एक धर्मप्रवण जीवनाचे चित्रही त्याचवेळी डोळ्यासमोर उभारते. विविध रोग, दुष्काळ, , रोगाच्या साथी, युद्धे, राजकीय कारस्थाने, अंतःपुरातील कलह, छोटे-छोटे व्यवसाय करणारी गीब दांपत्ये, बलात्कार, अपहरण, अनैतिक संबंध असे अनेक गुन्हे व सामाजिक अपप्रवृत्ती, भूत-प्रेत-विभूती, मंत्र-तंत्र, नवससायास, यक्षावेश याच्या मागे लागलेल्या अंधश्रद्धाळू व्यक्ती व विशेषतः स्त्रिया, राजगृहात, धनिकांकडे व सामान्यजनांच्या घरात अन्न-वस्त्रापायी आयुष्याच्या आयुष्य खाली मान घालून काम करीत राहणाऱ्या दासी, धात्री, दासचेटी, कर्मकरी, दासीपुत्र व त्यांचे कलह, थट्टामस्करी असे निम्न स्तरातील व्यक्तींचे संपूर्ण वेगळेच विश्व आ दिसून येते. या तीन प्रकारच्या धाग्यांना बेमालूम सरमिसळ करून करून एकत्र विणून तयार होते ते आगमकालीन संस्कृतीचे वस्त्र ! जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचा संदेश : आर्या चंदना, तीर्थंकर मल्ली, साध्वी राजमती, श्राविका जयंती, आदर्श गृहिणी रोहिणी या स्त्रिया, सर्व स्त्रीजातीला व आधुनिक स्त्रीमुक्ती चळवळीच्या धुरीणींना असा उर्जस्वल संदेश देत आहेत की - 'उच्च दर्जा व स्थान मिळविण्यासाठ आपण स्वत: झगडले पाहिजे. आपली सर्व सामर्थ्ये पणाला लावून व ज्ञानाची कास धरून कर्तृत्व केले पाहिजे. द्वेष, असूया करून अगर हक्कांची भीक मागून कोणतेच स्थान मिळत नाही. कर्तृत्वसंपन्न स्त्रीकडे श्रेष्ठ स्थान आपोआप चालत येते. भारतीय संस्कृतीत हे स्थान मिळवायचे असेल तर कर्तृत्वसंपन्नतेला शुद्ध आचरण व आत्मोन्नतीच्या तळमळीची जोड असणेही आवश्यक आहे. अन्यथा हजारो वर्षे लोटल्यावरही आगमकालातील तेजस्विनींचे हे स्थान Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ अक्षुण्ण राहिलेच नसते !!!' **********