________________
१२. जैन ऐतिहासिक साहित्य
(शिवाजी विद्यापीठ आयोजित द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील विशेष व्याख्यान
आयोजक : भ. महावीर जैन अध्यासन, मार्च २००८)
'जैनविद्या' हे अभ्यासाचे एक विस्तृत क्षेत्र आहे. जैन इतिहास आणि परंपरा, जैन साहित्य, जैन तत्त्वज्ञान आणि जैन कला हे जैनविद्येचे चार प्रमुख स्तंभ आहेत. त्याखेरीज सर्व इतर विद्याशाखांशी केलेला तौलनिक अभ्यास हे त्याचे एक नवे अंग झपाट्याने पुढे येत आहे. त्यातील ऐतिहासिकता या आयामाविषयी आपण साहित्यिक दृष्टने विचार करणार आहोत.
तसे पाहिले तर साहित्य हे ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने सर्वात कमी महत्त्वाचे अंग आहे. पुरातत्त्वविषयक प्रमाणे ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जातात. शिलालेख, स्तंभलेख, मंदिरे, स्तूप, चैत्य, चित्रकला, मूर्तिकला, ताम्रपट, दानपत्रे इत्यादींच्या माध्यमातून कोणत्याही परंपरेचे दृष्टिगोचर होणारे रूप निखळ सत्य म्हणून स्वीकाले जाते. जैन परंपरेतील वरील पुरावे भारतभर पसरले आहेत. ऐतिहासिकतेच्या दृष्टीने जैन साहित्यातील सर्वात महमाच्या आहेत त्या पटवली ! अर्धमागधी भाषेतील पर्युषणाकल्प अथवा कल्पसूत्रातील स्थविरावली हा भाग त्या दृष्टीने सर्वात प्राचीन आहे. १२ व्या शतकात होऊन गेलेल्या हेमचंद्रांनी संस्कृतमध्ये परिशिष्टपर्व' लिहून त्याची बऱ्याच प्रमाणात पूर्ती केली. गण व गच्छ परंपरा सुरू झाल्यावर विविध गुर्वावलि, पट्टावलि लिहिल्या जाऊ लागल्या. आंचलगच्छ, खरतरगच्छ, तपागच्छ इ. च्या पट्टावली जैन इतिहासावर चांगला प्रकाश टाकतात. या पट्टावलींचे संग्रह जामनगर, भावनगर आदि संस्थांनी प्रकाशित केले आहेत. अद्यापही काही पट्टावली प्रकाशनाची वाट पहात आहेत.
पट्टवलींव्यतिरिक्त जैन ग्रंथांच्या प्रशस्तींमधूनही विविध प्रकारची ऐतिहासिक माहिती मिळते. त्यानंतर महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे प्रबंध होत.
आज आपल्याला प्रथम जैन साहित्यातील 'प्रबंध या विषयाची अधिक माहिती करून घ्यावयाची आहे. सिंघी जैन ग्रंथमालेने ते अत्यंत चिकित्सापूर्वक प्रकाशित केले आहेत. ते बहुतांशी संस्कृतमध्ये आहेत. पुढ्याची हिंदी भाषांतरे फोटो इत्यादींसह प्रकाशित करण्याचा त्यांचा मनोदय होता. आत्तापर्यंत तरी माझ्या पहाण्यात अशी भाषंतरे आलेली नाहीत. ब्राह्मण किंवा बौद्ध परंपरेत अशा प्रबंधरचना अगदी तुरळक दिसतात. जैन आचार्यांनी याबाबत आघाडी मारलेली दिसते.
कालानुक्रमे पहिला प्रबंधग्रंथ आहे धनेश्वरसूरिविरचिर्तशत्रुञ्जयमाहात्म्य'. नावावरूनच स्पष्ट होते की शत्रुञ्जय तीर्थाची, त्याच्या निर्मितीची आणि दंतकथांची समग्र माहिती धनेश्वरसूरींनी संकलित केली आहे. १३ व्या शतकक्लि प्रभाचन्द्रकृत 'प्रभावकचरित' हा ग्रंथ या मालिकेतील दुसरी महत्त्वपूर्ण प्रबंधरचना आहे. वज्रस्वामींपासून आरंभ करून आर्यरक्षित, आर्यनन्दिल, कालकसूरि अशा क्रमाने हेमचन्द्रसूरींपर्यंतची चरित्रे यात नोंदवली आहेत. या सर्वांची गणना त्या त्या काळातील प्रभावसंपन्नं व्यक्ती अशी केली आहे. चरितांच्या ओघात प्राकृत व अपभ्रंश काव्ये, प्राकृत म्हणी व देशी शब्दांचा वापर केलेला दिसतो.
१४ व्या शतकात होऊन गेलेल्या श्री मेरुतुङ्ग यांनी रचलेला प्रबन्धचिन्तामणि' हा ग्रंथही संस्कृतमध्येच असून त्याची रचना अधिक सुघट आहे. विक्रमादित्य, सातवाहन, वनराज, मूलराज, मुञ्जराज, भोजराज, सिद्धराज, कुमारफा, वस्तुपाल, तेजपाल यांच्याविषयीची कथानके एकेका प्रकाशात' समाविष्ट केलेली असून अनेक महत्त्वाचे आचार्य, श्रावक व अन्यधर्मीय प्रभावी व्यक्तींचा वटच्या प्रकरणात दिला आहे. शैलीची वैशिष्ट्ये प्रभावकचरिताप्रमोप्य आहेत.
१४ व्या शतकातील श्री राजशेखरकृत 'प्रबन्धकोश या मालिकेतील पुढचा ग्रंथ आहे. यातील बहुतांशी विषय प्रभावकचरिताप्रमाणेच आहेत. भद्रबाहु-वराह-प्रबन्धाने आरंभ होतो. वस्तुपाल-तेजपाल प्रबंध शेवटचा आहे.