________________
जातात आणि येतील. ____ परंतु यातील कित्येक दोष असे आहेत की जे काळाच्या ओघात एकंदर समाजातच खतपाणी घालून जोपासलेले आहेत, केवळ जैन' असल्यामुळे आलेले नाहीत. 'भ्रष्टाचार हाच शिष्टाचार' अशा सार्वत्रिक नैतिक अध:पतनाच्या काळात हे जैन-हे जैनेतर' अशी तफावत करून ठोकत रहाणे उचित नव्हे.
___ अत्यंत वरचा मलईदार स्तर (creamy layer) आणि निम्न स्तर हे वगळता सामान्यत: जैन समाज धर्मप्रेमी, कौटुंबिक व अंतर्गत भावनिक संबंध जपणारा, संकटकाळी तत्परतेने मदतीसाठी पुढे होणारा, तडजोडवादी आणि इतरांशी एकरूप होता होता स्वत:चे 'जैनत्व' जपण्याची तारेवरची कसरत करणारा असा आहे. ते बदल आणि परिवर्तने तो सहज स्वीकारतो जे मूलभूत तत्त्वज्ञानाच्या चौकटीशी सुसंगत ठरतात.
तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामान्यतः समजतात तसे 'जैन' म्हणजे केवळ 'जैन दर्शन' नव्हे. ही एक स्वायत्त, प्राचीन परंपरा आहे. त्या परंपरेला तिचा म्हणून खास इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, आचारप्रणाली आणि कलानिर्मितीची प्रेरणा आहे. या सर्व प्रांतात जैनांनी भारतीय संस्कृतीला दिलेले योगदान, 'संख्याबल' पाहता, खरोखरच लक्षणीय आहे !!!
**********