________________
* तरुण मुलामुलींना अगदी गळ घालून, खेचून नेले तर त्यांची वेषभूषा, केशभूषा, धार्मिक पाठांतराचा अभाव याब टीका टिप्पणी केल्याने मुलांची मने दुखावतात. खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडण्याच्या शपथा घेणेही मुलांन रुचत नाही. प्रवचनांना यायला तर युवक-युवती नाराजच असतात. त्यांच्या कथा-कहाण्या बोअर होतात, 'नवीन ठोस मुद्दे कोणतेच नसतात' असा मुद्दाही मुले उपस्थित करतात. * पति-पत्नी दोघेही खूप उत्साहाने रोज सामील झाले तर घरातील वडीलधारे व मुलेबाळे यांची खूप आबाळ होते
'गृहिणीधर्म' सोडून मी असे वागू का ? - असा प्रश्न सतावतो. * साधु-साध्वींनी B.A.; M.A. किंवा Ph.D. होण्यास आमची काय हरकत असणार ? परंतु परीक्षेचा फॉर्म भरणे, नोट्स् मिळवून देणे, परीक्षेची तयारी करून घेणे इ. साठी ते एकाच गोष्टीसाठी ३-४ जणांना गळ घालतात. त्यांनासतत
अनेक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी खूप तारांबळ उडते. * 'गणपती उत्सवाचे कार्यक्रम' आणि 'पर्युषणाचे कार्यक्रम यात जवळजवळ काहीच फरक उरलेला नाही. मग 'आमच्या घराशेजारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही का अटेंड करू नये ? - हा प्रश्नही विचारला गेला. धार्मिक
उद्दिष्टांशी संबंधित असलेले निव्वळ मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवू नयेत - असे एकमताने श्रोत्यांनी सांम्मिले. * इतक्या प्रकारची प्रवचनांची पुस्तके, सी.डी., डी.व्ही.डी., स्वत:चे फोटो छापलेल्या वह्या-पेन्स यासंबंधीभनेकांनी नाराजी व्यक्त केली. धार्मिक पुस्तकांच्या लाखोंनी प्रती काढून, जाणत्या-नेणत्यांना सरसकट वाटण्याने सत्रग्रंथांची 'आशातना' च होते असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले.
___ 'आणखी वीस वर्षांनी चातुर्मासाचे स्वरूप कसे असेल ? या प्रश्नावर, 'आत्ता ज्या प्रकारे चालला आहे तसा नक्कीच नसेल' असे सर्वसंमत उत्तर मिहाले. त्याच्या खोलात शिरल्यावर पुढील विचार नोंदविले गेले. * श्रावक जसे बदललेले, नवीन विचारांचे असतील तसेच साधूही नवीन विचारांचे असतील. * प्रवचन अगदी १ तासाचे - ज्ञानवर्धक व माहिती देणारे असेल. त्यानंतर सर्वजण आपापल्या उद्योगाला जातील. * चार महिन्यांच्या जागी एकत्रित पर्वविधी फक्त आठ दिवसांचा असेल. * खाण्यापिण्याचे कडक नियम नवी पिढी बहधा आठ दिवस पाळेल. * हार-तुरे, सत्कार-गौरव व रटाळ भाषणे यांना फाटा मिळेल. * श्वेतांबर-दिगंबर-स्थानकवासी५तेरा पंथी हे भेद बरेच कमी झालेले असतील. जैन' एकतेची भावना वाढेल. * नवी पिढी अधिक सत्यप्रिय, निर्णयक्षम व अवडंबर-रहित आहे. शाकाहार, सचोटी, धर्मप्रेम व कुटुंबप्रेम हे क्यम राखून ती पिढी चातुर्मासाला नवेच रूप प्राप्त करून देईल - या असीम आशावादी विचारांनी चर्चासत्राचा शेवट झाला.