Book Title: Pashu Pakshi Srushti Don Vibhinna Drushtikon Author(s): Anita Bothra Publisher: Anita Bothra View full book textPage 4
________________ पंचकर्माखेरीज इतरत्रही रक्त, मांस, मांसरस, वसा इ. संबंधीची चर्चा दिसते. उदाहरणार्थ : १) लावा, ,तित्तिर, मोर, हंस, डुक्कर, कोंबडा, बोका, मेंढी, मासे यांचे रस स्नेहात मिसळले असता हितकरहोते. ३० २) ससा, हरीण, लावा, तित्तिर, मोर वगैरे जांगल पशु-पक्ष्यांचे रक्त मधातून चाटावे. ३१ ३) रक्तातिस्रावाने प्राणनाशाची स्थिती आली असता ससा, हरीण, कोंबडा, मांजर, म्हैस, मेंढी किंवा बकरा यांच्या ताज्या रक्ताचा बस्ति दिला असता उपयोग होतो. ३२ मांसगुणाची चर्चा : मांसाचे सेव्यत्व व निषिद्धत्व, त्याची श्रेष्ठता - कनिष्ठता इ. प्रकारचे विवेचन हेही चरकसंहितेत आढळते. सूत्रस्थानातील ‘अन्नपानविधि' अध्यायात मांसाचे अनेक दोष सांगून, त्या दोषांनी रहित असलेले मांस हितकर, पौष्टिक व शक्तिवर्धक आहे असे म्हटले आहे. मांसाचे सेव्यत्व वर्णन करताना म्हटले आहे की 'नित्यं मांसरसाहारा नातुराः स्युर्न दुर्बलाः ।। ३३ याचप्रकारे मांसाचे श्रेष्ठत्व सूत्रस्थानातील 'यज्ज : पुरुषीय' अध्यायात वर्णिले आहे. ३४ चरकसंहितेच्या काळी 'अन्नपानविधि' व 'रोगोपचार' यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मांसाहारी चिकित्सेला प्राधान्य होते, असे चरकसंहितेच्या एकंदर प्रतिपादनावरून दिसून येते. - पशु-पक्ष्यांचा औषधासाठी वापर केल्यामुळे अहिंसा शब्दाचा बदलता अर्थ : अन्नासाठी व औषधयोजनेसाठी मांस इ. चा वापर करताना धर्माचरणाचे सर्वोच्च तत्त्व मानलेल्या अहिंसा तत्त्वाकडे चरकसंहिता कोणत्या दृष्टीने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. सूत्रस्थानातील ३० व्या अध्यायात म्हटले आहे की, आयुर्वर्धक साधनात 'अहिंसा म्हणजे प्राणवध न करणे', हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. यापासून धर्म उत्पन्न होऊन त्याच्या पुण्याने आयुष्य वाढते.३५ या उल्लेखात अहिंसा व त्याने प्राप्त होणारे पुण्यफळ याचा विचार केला आहे. परंतु 'प्राणिहिंसा मुळीच न करणे', हा अहिंसेचा अर्थ तर चरकसंहिताकाराला स्वीकारताच येणार नाही. हिंसा-अहिंसेची चर्चा चरकसंहितेत अतिशय अल्प आहे. सूत्रस्थानातील 'सद्वृत्त' वर्णनाचा उपसंहार करताना ज्ञान, दान, मैत्री, दया इ. गुणांचा निर्देश केला आहे. या सद्गुणांमध्ये हिंसेचा समावेश नाही. मैत्रीगुणाचा विचार करताना पूर्वपक्षाने शंका उपस्थित केली आहे की, 'आयुर्वेदाच्या उपदेष्ट्याने प्राण्यांचे हिंसापूर्वक भक्षण सांगितल्याने हिंसेचा दोष लागतो. ' उत्तर पक्षात म्हटले आहे की, 'सर्वत्रात्मानम् गोायित' या वेदवचनानुसार स्वत:चे म्हणजे स्वत:च्या शरीराचे, आरोग्याचे व आयुष्याचे रक्षण करण्यासाठी जी आयुर्वेदविहित हिंसा आहे, ती आरोग्यसाधनेसाठी असल्यामुळे आणि आरोग्यसाधना अंतिमतः धर्मसाधनेसाठी असल्यामुळे, आयुर्वेदकथित हिंसा ही हिंसा नव्हे. शिवाय हे मांसभक्षण मांसलोलुपतेने केलेले नसल्यामुळे हिंसेचा दोष लागत नाही.३६ एकंदरीत वैदिक परंपरेतून व विशेषतः सांख्यविचारातून पशु-पक्ष्यांसंबंधीची जी मान्यता प्रतिबिंबित होते, त्या पार्श्वभूमीशी चरकसंहितेतील विचार मिळतेजुळते ठरतात. महाभारत, सांख्यसप्ततिशास्त्र आणि याज्ञवल्क्यस्मृति या सर्वांमध्ये तिर्यंचगतीची तमोप्रधानता, मूढता, अज्ञान व दुःखबहुलता वारंवार प्रदर्शित केलेली दिसते. ३७ हा दृष्टिकोन एकदा स्वीकारला की, आरोग्यरक्षणार्थ केलेल्या पशु-पक्ष्यांच्या वापराला जणू काही अनुकूल पार्श्वभूमीच मिळते. एक गोष्ट येथे विशेष नमूद केली पाहिजे की चरकसंहितेत निर्दिष्ट सर्व पशु-पक्षी जैनशास्त्रानुसार 'समनस्क तिर्यंच पंचेंद्रिय' आहेत. मानवश्रेष्ठतावाद आणि मानवी जीवनाची दुर्लभता, वैदिक व जैन दोन्ही परंपरांनी अधोरेखित केलेली दिसते. परंतु दुर्लभ नरदेह लाभल्यावर, त्याचे रक्षण करण्यासाठी, पशु-पक्षीसृष्टीला दुय्यम मानून, त्यांच्या केलेल्या व चरकसंहिताकारांना काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. याउलट समनस्क तिर्यंच पंचेंद्रियांचे ज्ञान, बुद्धी, भावभावना,Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9