Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ या ११ व्या शतकात आ. देवेद्रगणि यांनी लिहिलेल्या ग्रंथात या कथा आलेल्या आहेत. बौद्धांच्या कुम्मकारजातक या पालिसाहित्यात या चार राजांना प्रत्येकबुद्ध मानून यांच्यावर कथा दिलेल्या आहेत (जातककथा क्र.४०८). बौद्ध लोक या चारही राजांना महात्मा बुद्धांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानतात. यातील करकंडु राजा पार्श्वनाथ संपरेतला जैन असण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे चारही राजे समकालीन होते. या प्रत्येकबुद्धांचा काळ भ. पार्श्वनाथ व भ. महावीर यांच्या मधला काळ मानला जातो जो २५० वर्षांचा आहे. या प्रत्येकबुद्धांवर प्राकृतमध्ये प्रत्येकबुद्धचरित' हा इ.स. १३ व्या शतकात लिहिलेला श्री तिलकसूरिरचित ग्रंथ आढळतो. संस्कृतमध्ये प्रत्येकबुद्ध महाराजर्षि चतुष्कचरित्र' हा जिनलक्ष्मीकृत ग्रंथ आढळतो. कनकामर मुमी यांनी अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ' हा ग्रंथ इ.स.च्या ११ व्या शतकात लिहिला आहे. ___या चौघांच्या पैकी, दिगंबर साहित्यात मात्र फक्त करकंडूचेच चरित्र आढळते. परंतु दिगंबरांनी करकंडूला प्रत्येकबुद्ध असे संबोधलेले आढळत नाही. ___ या चार राजांव्यतिरिक्त इतरही अनेक बुद्ध होऊन गेल्याचे आढळते. ऋषिभाषित या ग्रंथात या प्रत्येकबुद्धांची एकूण संख्या ४५ दिली आहे. त्यातले २०० नेमिनाथांच्या, १५ पार्श्वनाथांच्या तर १० प्रत्येकबुद्ध महावीरांच्या तीर्थकाळात झालेले दाखविले आहेत. वरील चार राजांव्यतिरिक्त अंबड, कूर्मापुत्र, धन्ना, शालिभद्र आदींची नावे यात आढळतात. राजपदावर राहून जैन धर्माचा प्रसार करणारे प्राचीन राजे : कलिंग देशाचा राजा सम्राट खारवेल हा इ.स.पू. पहिल्या शतकात होऊन गेला. तो चेदि महामेघवाहन वंशाचा होता. तो अतिशय शूर व पराक्रमी होता. त्याने कलिंग देशाला एक सुदृढ व शक्तिशाली राज्य बनविले. हे राज्य गंगापासून ते गोदावरीपर्यंत विस्तृत होते. खारवेल राजाचा जन्म जैन परिवारातच झाला होता. त्यामुळे तो जन्मत:च जैन होता. परंतु जैनधर्मी असूनही त्याचा इतर धर्मांप्रती उदार दृष्टिकोन होता. बौद्ध धर्मावरही त्याचे प्रेम होते. किंबहुना समसामायिक कलिंगावरबौद्ध धर्माचा प्रभाव वाढण्याचे तेही एक कारण मानता येईल. कलिंग देशाला जैन धर्माची परंपरा इ.स.पू. ५ व्या शतकात होऊन गेलेल्या करकंडु राजाकडून मिळाली होती. करकंडच्या काळी पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म प्रचलित होता. भुवनेश्वर जवळील उदयगिरी पर्वतात हाथी गुफा आहे. त्या गुफेत छतावर राजा खारवेल याने ब्राह्मी लिपीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावरून खारवेल राजाची माहिती मिळते. या शिलालेखात खारवेल राजाच्या १३ वर्षांच्या राज्यकारकीर्दीचा आढावा घेतलेला दिसतो. शिलालेखावरून राजा खारवेलने जैन धर्माच्या संस्थापनेचे व प्रसाराचे प्रमुख कार्य केल्याचे दिसते. राज्यपदावर आल्यावर त्याने जैन तीर्थ मथुरेला यवनाच्या तावडीतून मुक्त कले असे लिहिलेले आहे. शिलालेखावरून त्याकाळच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनावर प्रकाश पडतो. राज्यामध्ये संगीत, नृत्य, उत्सव आदींचे आयोजन केले जात होते. खारवेल स्वत: क्रीडा व संगीतप्रेमी असल्याचे त्यात म्हटले आहे. स्त्री, पुरुष दोघेही अलंकारप्रिय होते. धनिक लोक आपल्या पगड्यांनाही अलंकार घालीत. स्त्रियांना राज्यात मान होता. त्या पतीबरोबर उत्सवात सहभागी होत. एकट्या स्त्रिया राजपथावर अश्वारूढ व गजारूढ होत. त्या नृत्य, संगीत, वादन आदींमध्येही प्रवीण होत्या. कलिंग देशात शस्त्रास्त्रे निर्माण केली जात होती. शेतीबरोबरच पशुपालन हाही एक प्रगत व्यवसाय होता. त्याकाळच्या चित्रांवरून रोम देशाबरोबर कलिंग देशाचा व्यापार चालू होता व रोममधील भांडी कलिंगामध्ये आयात केलेली होती असे दिसते. दुसरा राजा कुमारपाल हा गुजराथेतील अणहिल्ल नगराचा राजा होता. तो चालुक्यवंशीय होता. व इ.स. १२

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26