Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 23
________________ बौद्ध धर्मात स्त्री : महावीरांच्या जवळ जवळ समकालीन असलेले गौतमबुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. आत्यंतिक कर्मकांड अथवा आत्यंतिक वैराग्य याच्या मधला मार्ग म्हणून ते स्वत:च्या धर्माला 'मध्यम-मार्ग' म्हणतात. १४ निदाने व ५ शील यावर आधारलेला हा 'अष्टांगमार्ग' आहे. बौद्ध भिक्षुणींचा एकंदर आचार-विचार, नियम, भिक्षूंच्या तुलनेत स्थान, त्यांच्यातील वाद-विवाद, कलह या सर्वांचे दर्शन आपल्याला 'विनयपिटक' व 'जातककथा'तून होते. जैन संघाप्रमाणेच बौद्ध संघही भिक्षु–भिक्षुणी, उपासक उपासिका असा चतुर्विध असतो. स्त्रियांना संघात प्रवेश देण्यास गौतमबुद्ध आरंभी फारसे उत्सुक नव्हते. भिक्षू 'आनंदा'ची कळकळीची विनंती व 'महाप्रजापति गौतमी'ची (गौतमुद्धांची सावत्र माता) एक प्रकारची धार्मिक चळवळ, यामुळे बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिलेला दिसतो. भिक्षुणींसाठी विनयपिटकात दिलेल्या ‘अट्ठ- गुरु- धम्म' या नियमातून गौतमबुद्धांचा स्त्रियांकडे बघण्याचा सहानुभूतिशून्य व उपेक्षा करणारा दृष्टिकोण दिसतो, असे निरीक्षण बौद्ध धर्माच्या अभ्यासक श्रीमती दुर्गा भागवत यांनी नोंदविले आहे. बौद्ध दीक्षाविधी जैन दीक्षाविधींपेक्षा साधेपणाने झालेले दिसतात. बुद्धांच्या मते स्त्रिया अरहंतपद प्राप्त करू शकतात परंतु 'बुद्ध' होऊ शकत नाहीत. बौद्ध धर्मग्रंथात उपासिकांना एक खास स्थान दिसते. बुद्धघोषाच्या मते बुद्ध, धम्म व संघाला जो शरण गेला, तो उपासक होय. गौतमबुद्ध स्वत: उपासिकांशी चर्चा करून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास मदत करीत. सुजाता, विसाखा, खुज्जुत्तरा, सुप्पवाता, कातियानी या स्त्रियांचा स्वत: गौतमबुद्ध 'आदर्श उपासिका' અસા ગૌરવ તાત. બૌદ્ધ આામાતૂન પાતિવિષયી વરીવ માહિતી મિ∞તે. અર્ધમા ધી ગ્રંથાંત ત્યા માનાને નૈન श्राविकांविषयी माहिती फारशी मिळत नाही. गौतमबुद्धांच्या आचारविषयक उदारमतवादी धोरणामुळे जैन धर्मापेक्षा बौद्धधर्माचा प्रसार सर्व जगभर आज झालेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धधर्म स्वीकारानंतर भारतात तरी त्या धर्माची धुरा दलित बर्गाकडे आहे, असे चित्र दिसते. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे कौटुंबिक स्थान : जैन धर्मग्रंथाच्या अभ्यासाने पुढील निरीक्षणे दिसून येतात. कन्या ही कुटुंबात मोठे स्नेहभाजन आहे. औपाचारिक शिक्षण हा केंद्रबिंदू नसून थोड्याबहुत ललितकला व मुख्य म्हणजे विवाह हीच तिच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना आहे. मातापित्यांकडून तिला संस्कार, भरणपोषण व पित्याच्या इच्छेने विवाहातील प्रीतिदानाचे हक्क आहेत. सियाच्या संपत्तीत वारसा हक्क नाहीत. अविवाहित कन्या व अनेकदा विधवाही, पित्याकडेच राहतात. विवाहानंतर ती पतीच्या एकत्र कुटुंबाचा घटक बनते. सहपत्नी नसलेल्या कुटुंबात ती अधिक सुखी व स्वतंत्र आहे. खर्च ती पतीच्या अनुमतीनेच करते. समाजातील कष्टकरी वर्गातील स्त्रिया पतीबरोबर व्यवसायात सहभागी होतात. राजघराण्यातील व धनिक वर्गातील पत्नींना सपत्नींशी व्यवहार करावे लागतात. मोठमोठी अंत:पुरे ही मत्सर, द्वेष, कारस्थाने व राजकीय संबंधांनी युक्त दिसतात. संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य नसले तरी पूर्ण पारतंत्र्यही नाही, मर्यादित स्वातंत्र्य आहे. माहेरून आणलेल्या संपत्तीवर स्त्रीचा पूर्ण हक्क आहे. सासरच्या संपत्तीत वाटा नाही. पतीच्या मृमूनंतर जीवन संपूर्ण परावलंबी आहे. घरात विनयशील रहावे लागले तरी घुंघट, पडदा हा घरात अगर समाजात घ्यावा लाग नाही. सण, उत्सव, जत्रा, मेजवान्या, धर्मप्रवचन, दीक्षोत्सव, उद्यानयात्रा, प्रेक्षणक (नाटक) ही करमणुकीची साधने आहेत. एकपत्नी पद्धतीतील स्त्रियांचे कामजीवन बहुतांशी सुखासमाधानाचे आहे. अनैतिक संबंधाची कारणे बरीचशी बहुपत्नीत्वामुळे येणाऱ्या अतृप्त कामजीवनात आहेत. सर्व प्रकारच्या कुटुंबियांशी संबंध प्राय: चांगलेच आहेत. दीक्षेसाठी पती त्याच्या मातापित्यांची अनुमती घेतो, पत्नीची घेताना दिसत नाही. बहुतांशी कुटुंबात कष्टप्रकामासाठी नोकर, दास-दासी आहेत. पति-पत्नीत गैरसमज, कलह बरेचदा किरकोळ आहेत. संबंधविच्छेद, पुनर्विवाह, विधवाविवाह, सती या प्रथा अगदी नगण्य स्वरूपात आहेत. धार्मिक स्वातंत्र्य आहे. माता बनणे, बालकांचे संगोपन हे मोठे आनंदाचे विषय आहेत. पुत्र अगर कन्या यापैकी कोणीही जन्मले तरी

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26