Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 20
________________ गर्दी, जेवणावळी इ. निकष त्यासाठी वापरले जातात. २) गेल्या काही वर्षात याच कारणाने साधु-साध्वींची ओढ शहरी भागाकडे वाढली आहे. छोट्या गावांना, खेड्यांना साधु-साध्वींच्या सत्संगाचा लाभ होत नाही. (अर्थात् त्यामुळे स्वाध्यायी श्रावक-श्राविकांना भरपूर वाव मिळता) ३) ठराविक ठिकाणी ठराविक लोकांचे वर्चस्व वर्षानुवर्षे रहाते. वाव न मिळालेले लोक असंतुष्ट रहातात, ___ आपोआपच दूर जातात. ४) साधु-साध्वींच्या पुढे पुढे करण्याची अहमहमिका सुरू होते. ५) प्रभावना म्हणून खाद्यवस्तू, पुस्तके व भोजनांचे आयोजन केले जाते. नव्या पिढीला या गोष्टी निरर्थक वाटतत. ६) बालक, गृहिणी, युवक-युवती, सुना, जोडपी अशा वेगवेगळ्या गटांसाठी शिबिरे आयोजित केली जातात. __ अनेकदा वेगवेगळ्या मंडळांची स्थापना होते. चातुर्मासानंतर त्यात कोणतेच सातत्य रहात नाही. ७) स्टेजवर राजकीय पुढाऱ्यांना व स्पॉन्सरर्सच्या () बसवून त्यांची स्तुति-स्तोत्रे गायली जातात. शाली, माळा व मोमेंटो देऊन सत्कारांचे कार्यक्रम इतके रटाळ केले जातात की अतिशय कंटाळवाणे वाटू लागते.स्टेजवर भरमसाठ सत्कार आणि श्रोत्यांमध्ये आपसात गप्पा व चर्चा सुरू रहातात. ८) स्थानिक लोकांमध्ये आधीच काही स्वाध्याय मंडळे, धार्मिक-शैक्षणिक कार्य चालू असते. त्यांची मुळीच दखल घेतली नाही अथवा त्यांच्याविषयी तुच्छतावाद व्यक्त केला तर आधीचे चांगले उपक्रम बंद पडतात. नवीन तर टिकू शकतच नाहीत. अनेक वर्षे चालू असलेले सन्मति-तीर्थ चे प्राकृत व जेनॉलॉजीचे क्लासेस ४-५ गावालरी अशा प्रकारे बंद झाले आहेत. ९) काही ठिकाणी जैन समाज जास्त असतो. काही ठिकाणी मोजकी घरे असतात. गृहिणी अधिक व्यस्त झाल्या आहेत. गोचरीचे नियमही अनेकांना माहीत नसतात. त्यातूनच मग साधु-साध्वींना गोचरीचे टइम-टेबल देणे, टिफिन पोहोचता करणे - अशा प्रथा सुरू होतात. त्या अनेकदा सोयीस्कर ठरतात. अनेक महिलांचे असेही मत पडले की साधु-साध्वींना योग्य असा साधा, प्रासक आहार एके ठिकाणी बनवून द्यावा. 'भिक्षाचर्या' च्या नियमात बसत नसल्याने असे करता येत नाही - या मताचा पुरस्कार इतरांनी केला. साधुंना भिक्षा देण्याचा विधी नवीन पिढीला माहीत होण्यासाठी गोचरीची आवश्यकता आहे - असेही मत काहींनी सांगितले १०) आपापली पीठे अथवा संस्था स्थापन करणे, त्यासाठी आवाहन करून पैसा उभा करणे, त्यातून सामाजिक, धार्मिक कामे करणे - अशी लाटही काही वर्षांमध्ये साधु-साध्वींमध्ये पसरत आहे. काही श्रोत्यांनी या स्वांना, 'संन्यासधर्माला अयोग्य असा परिग्रह असे नाव दिले. काहींनी त्या निधीतून शाळा-कॉलेज, हॉस्पिटलस, अनाथालये, अंध-पंगु-आश्रम, ग्रंथालये इ. उभे रहात असल्यास, ती नव्या काळाची गरज मानून पाठिंबा दिला. त्यातूनच साधुधर्माचे ध्येय 'आत्मकल्याण' की 'समाजसेवा' असा प्रश्न उपस्थित झाला. 'साधूंनी धार्मिक व आध्यात्मिक प्रांतात कार्य करावे, समाजोन्नतीचा विषय समाजसेवकांवर सोपवावा - असाही एक विचार पुढे आला. 'एक घरसंसार सोडून या मोठ्या प्रपंचाची उलाढाल कशासाठी करायची ? हा प्रश्नही विचारला गेला. 'दीन-दु:खी व गरजूंची सेवा हा काय जैन-धर्म-पालनाचा एक मार्ग नाही का ? असा प्रतिवाद केला गेला. त्यानंतर चर्चा पुढच्या मुद्याकडे वळली. ११) काही महिलांनी त्यांच्या मनातील शल्ये मोकळेपणाने बोलून दाखविली. * आपले नेतृत्वगुण जरा उाखविले की साधु-साध्वी आग्रह करून अशा काही अवघड जबाबदाऱ्या अंगावर टाकतात की ते 'अवघड जागेचं दुखणं' बनते. मग त्यांना टाळण्याकडे कल होऊ लागतो. * अनेकांची अपेक्षा असते कीआपण त्यांचा जेथे जेथे चातुर्मास असेल तेथे तेथे जाऊन त्यांच्या संपर्कात रहावेहे तर अशक्यच असते. * प्राकृत भाषा किंवा काही तत्वज्ञानविषयक शंका घेऊन आपण गेलो तर त्याविषयी चर्चा करायला पुरेसा वेळ तेदेऊ शकत नाहीत. त्यावेळी जनसंपर्क खूपच असतो.

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26