Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 19
________________ १५. जैन चातुर्मास : काही निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा (स्वानंद महिला संस्था, पुणे, चर्चासत्र, जानेवारी २००८) (जैन साधु आचारात, वर्षभराचा विहार थांबवून, पावसाळ्याचे चार महिने एका ठिकाणी राहण्याचे विधान आहे. भ. महावीरांच्या चरित्रात त्यांच्या साधु जीवनातील ३० चातुर्मासांचे वर्णन अर्धमागधी व जैन महाराष्ट्री यात येते. प्रस्तुत लेख हा पुणे परिसरातील श्वेतांबर स्थानक वासींच्या चातुर्मासावर प्रामुख्याने आधारित आहे. यातील निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा सुमारे १०० जैन गृहिणींच्या चर्चेतून पुढे आल्या आहेत. वाचकांना काही मते न पटल्याप्त त्यावरून वादंग निर्माण करू नये ; ही अपेक्षा.) आज प्रचलित असलेला वैदिक हिंदू (पौराणिक, देवताप्रधान व भक्तिप्रधान) धर्म आणि जैन धर्म यांच्यात एरवी फारसे उठून न दिसणारे भेद चातुर्मासाच्या वेळी अगदी स्पष्ट दिसून येऊ लागतात. हिंदू स्त्रियांमध्ये व्रन पूजांची लाट उसळते. श्रावण-भाद्रपदात तर प्रत्येक दिवशी हिंदू स्त्री सणवारांसाठी धावपळ करताना दिसते. मोठ्या शहरात धावपळीच्या आयुष्यातही सामान्यत: स्त्रिया, नवविवाहित मुली शिवामूठ, मंगळागौर, सत्यनारायण, हरितालिका, गणेशस्थापना-विसर्जन, अनंतव्रत इत्यादि व्रते करताना दिसतात. छोट्या शहरात आणि गावात तर ही व्रते व पूजा अधिक उत्साहाने व मनापासून साजऱ्या होतात. ठराविक दिवशी खिचडी, भगर, रताळी इ. खाऊन उपवास, सणावाराल स्नान वगैरे करून भरपूर स्वयंपाक, नैवेद्य, फळे-फुले-पत्री गोळा करून देवाला वहाणे इत्यादि गोष्टी सुरूहोतात. दूरदर्शनच्या मालिकांमध्ये बघून-बघून, तरुण-तरुणीही सणावाराला गणपती, साईबाबा अशा ठिकाणी लांबलचक रांगा लावून दर्शन घेताना दिसतात. जैन गृहिणी मात्र घरातले व्याप, स्वयंपाक कमी करून स्थानक-मंदिरातील कार्यक्रमांना. प्रवचनांना हजेरी लावू लागतात. पर्युषणात तर शक्यतो कंदमुळे, पालेभाज्या, मोडाची कडधान्ये वर्ण्य मानतात. एरवी शांत असणाया स्थानक व मंदिरात उत्साहाचा महापूर येतो. निमंत्रित साधु-साध्वी ठरलेल्या ठिकाणी विराजमान होतात. कमिट्या स्थापन केल्या जातात. सुप्त पुरुषवर्गामध्येही चैतन्य सळसळू लागते. वर्गण्या काढल्या जातात. त्या अनेकदा लाखातीह असू शकतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्पॉन्सरर्सचा शोध घेतला जातो. विधिपूर्वक उपवास अथवा नियम घेतले जातात. मोठमोठे मंडप पडतात. शेकडो बॅनर्स लागतात. धार्मिक साहित्याचे स्टॉल्स सजतात. अनेकांच्यानावानिशी पाट्या झळकू लागतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कामांना, करमणूकीच्या कार्यक्रमांना व शिबिांनाही उधाण येते. अशा प्रकारचे चातुर्मास वर्षानुवर्ष चालू आहेत.आपण प्रथम याचे काही फायदे पाहू - १) जैन समूहाला एकत्रित येण्याचे एक ठिकाण मिळते. एकीभावना टिकून रहाते. २) पावसाळ्यामुळे इतरत्र फारसे हिंडता फिरता येत नाही. त्यामुळे स्थानक-मंदिरात नटून-थटून जाण्याचा उत्साह वाढतो. ३) युवक-युवती, लहान मुले इ. ना धार्मिक प्रथांची माहिती होते. त्यांच्यावर जैन धर्माचे व सामाजिकतेचे संस्का होतात. संयमाचे शिक्षण मिळते. ४) वेगवेगळ्या स्पर्धांमुळे सर्वांच्या कलागुणांना वाव मिळतो. पारितोषिके भरपूर असल्याने प्रोत्साहन मिळते. ५) सामाजिक प्रतिष्ठा वाढते. ६) दान देण्याची भावना निर्माण होते. ७) नेतृत्वगुणाला वाव मिळतो. एकंदरीत, जरा धावपळ झाली तरी चातुर्मास हवाहवासा वाटतो. चर्चेतून पुढे आलेली काही स्पष्ट मते व निरीक्षणे : १) 'कोणाचा चातुर्मास अधिक यशस्वी झाला ?' - अशा चर्चा सुरू होतात. मोठमोठे मांडव, मोठे बजेट, थाटमाट,

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26