Book Title: Ishtopadesha
Author(s): Devnandi Maharaj, Shitalprasad, Champat Rai Jain
Publisher: Paramshrut Prabhavak Mandal

View full book text
Previous | Next

Page 77
________________ ५४ श्रीमद्रराजचन्द्रजैनशास्त्रमालायाम् मराठी पद्यानुवाद स्वानुभवें तो प्रगटे प्राप्त देह सम जया असे माने । अत्यंत सुखी आत्मा लोकालोकावलोकिं बघ जाण ॥ २१ एकाग्रमनें इंद्रिय-विषयातें त्यजुनि संयमें जगतीं । आत्मज्ञानी आत्मा आत्म्यामाजीं बसे तया चिती ॥ २२ अज्ञभक्ति अज्ञाना जन्मा ज्ञानभक्ति दे दान । जें ज्या जवळी तो तें जगि दे प्रख्यात हे असे वचन ॥ २३ अध्यात्म्याच्या योगें परीषहादिक न तेच अनुभवतां । आस्रव निरोधिकर्मा येइ निर्जरा सुशीघ्र की १"सुगतां ॥२४ कर्ता चटईचा मी यांतचि संबंध भिन्न दोघांचा । ध्यान ध्येयचि आत्मा केवी संबंध भिन्न वद त्यांचा ॥ २५ मोही कर्मा बांधी निर्मोही तो तयांतुनी सुटत । म्हणनी सगळया यत्ने निर्मम भावास भावण सतत ॥ २६ निर्मोहि एकटा मी विशुद्ध योगींद्रगोचर१५ ज्ञानी । बाह्यभाव संयोगज ते मजहन बाह्य उर्व नुं जाणी ॥ २७ प्राण्या दुःखसमूहा संयोगें भोगणे पडे भुवनों । म्हणुनी त्यजितो त्या सगळ्या मन वचन काय-कर्मांनी ॥ २८ मातें न मरण केवीं भय ना, व्याधी कशी व्यथा होय । मी वृद्ध न बाल न मी तरुण न हे भेद पुद्गली पाय ॥ २९ मोहें संतत सगळे म्या पुद्गल भोग भोगुनी त्यजिरें। वद मज तत्त्वज्ञान्या त्या उच्छिष्टांत ६ राग केवि गळे ? ॥ ३० कर्मचि हितकर कर्मा आत्मा आत्म्यास हो हितावह तो । स्वस्वप्रभाव जाणनि, स्वार्था वद कोण ना जगी बहतो ।।३१ परोपकृति ती त्यजुनी सुज्ञासम हो स्वतास उपकारी । दृश्यमानशा अज्ञा करि उपकार न असे परा भारी ॥३२ अभ्यासें उपदेशे गुरुच्या तो अनुभवन आत्म्यातें । निजपर भेदा जाणुनि, भोगी चिरकाल मोक्ष सौख्यातें ।। ३३ त्या ती सद् अभिलाषा इष्ट वस्तुचें तया असें ज्ञान । आत्माच गरू आत्म्या प्रेरक निजहित असें स्वतां जाण ॥ ३४ अज्ञ न असतो ज्ञाता विज्ञाता मूर्ख तो कधी नसतो । दुसरें निमित्त केवळ गति धर्मास्तिकाय जै होतो ॥ ३५ विक्षेप न मनि वरुनी तत्वों संस्थित बनून एकांतो । अभियोगें त्या स्वात्मिक तत्त्वा अभ्यासणे मुने जगती ।। ३६ हे आत्मतत्त्व उत्तम स्वानुभवातें जसे जसे येतें । विषय सुलभ ते असुनी कदां न जीवा तसे तसें रुचते ॥ ३७ इंद्रिय-विषय न जेवीं सुलभ असोनी न रुचति पुरुषातें । तेवीं उत्तम तत्त्वचि, रुचतें निज अनभवास येतां तें ॥३८ आत्मलाभ तो इच्छी इन्द्रजालसम जगास निःशेष । बघुनी, विषयांत दुज्या रमतां, मनि खेद होइ बहु त्यास ॥३९ इच्छनि अतिप्रयत्ने निर्जन एकांतवासि तो रमतो । निजकार्यवशे किंचित बोलुन विसरून त्यास तो जातो ।। ४० बोलत असुनि न बोले चालत असतां कदां न तो चाले । पाहत असुनि न पाही आत्मिक तत्त्वीं स्थिरत्व मेळविलें।४१ कोण कुणाचे कैसें कवणे कोठे असेच हा राम । त्यागनि विकल्प देहा, जाणि न निजयोगि योग विश्राम ।। ४२ जो जेथे वसति करी, तेथें तो जीव करितसे प्रीति । रममाण जिथे होतो तथुन कोठे न जात तो जगतीं ॥ ४३ सोडून कुठे न जाती राहि, विशेषा तदीय अनभिज्ञ । तद्विशेष अज्ञत्वे हो बद्ध न मुक्त होय परि सुज्ञ ॥ ४४ पर तें पर दुःखद हो आत्म्या आत्म्येच सौख्य मानवतें । तद प्राप्तिस्तव उद्यम करिती म्हणुनी महान मानव ते ॥ ४५ करि पुद्गल वस्तू चे अभिनंदन जो जगों अविद्वान । सहवास जंतूचा त्या सोंडी चारी गतींत ते कधिं न ॥ ४६ व्यवहार-बाह्य होउन आत्मध्यानांत होइ लव-लीन । योगाच्या योगबळे त्या परमानंद एक घे जनन ॥ ४७ अधिकचि जाळितसे हा, अनंत कमधनास आनंद । बहिरंग दुःख योगी मुळि अनुभवतां न पावतो खेद ॥ ४८ दूर अविद्येहन ती ज्ञानमयी श्रेष्ठ परमशी ज्योति । प्रश्न करी अनुभव घे विचार त्याचा करीच मोक्षार्थी ।। ४९ हा संग्रह तत्त्वांचा बघ पदगल जीव दोन ते भिन्न । जे अन्य जाइ कथिले त्याचा विस्तार तो ठरे जाण ॥ ५० इष्टोपदेश बुध वाचुन चितवून । मानापमानि समता स्वमतें वरून ॥ मुक्ताग्रहीं जनि वनों विधिनें बसून । मुक्तिश्रिया निरुपमा करि प्राप्त जाण ॥ ५१ १३ प्रमाण १४ सद्बुद्धिशाली, केवलज्ञानी १५ गोचर-जाणले जातें-तें ज्ञानांत जातें तें १६ ओकून टाकलेल्या १७ मुक्तीच्या आग्रहांत १८ विधिपूर्वक. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org.

Loading...

Page Navigation
1 ... 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124