Book Title: Gyanarnava
Author(s): Padma Killedar
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 2
________________ २०५ आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव २०५ पं. स. १) ज्ञानार्णवस्य माहात्म्यं चित्ते को वेत्ति तत्त्वतः । यज्ज्ञानात्तीर्यते भव्यैर्दुस्तरोऽपि भवार्णवः ॥ इति जिनपतिसूत्रात्सारमुद्धत्य किंचित् । स्वमतिविभवयोग्यं ध्यानशास्त्रं प्रणीतम् ॥ विबुधमुनिमनीषाम्बोधिचन्द्रायमाणं । चरतु भुवि विभूत्यै यावदद्रीन्द्रचन्द्रः ॥ ग्रंथकारांनी स्वतःच ज्ञानार्णव व ध्यानशास्त्र ह्या दोन नावांनी ग्रंथाचा उल्लेख केलाच आहे. याशिवाय योगीजनांना आचरणीय व ज्ञेय सिद्धांताचे रहस्य ह्यात असल्यामुळे योगार्णव ह्या नावाने देखील लोकात प्रसिद्ध आहे. मन, वचन, काय ह्यांना शुद्ध करण्याची प्रक्रिया ह्यात सांगितली असल्यामुळे अथवा युज्ज म्हणजे जोडणे. मोक्षासाठी जो जोडतो तो योग व अशा मनवचनकायेचा परिशुद्ध धर्मव्यापार म्हणजे योग व त्याचे विस्तृत विवेचन ह्यात असल्यामुळे योगार्णव हे नाव प्रचलित झाले असावे. ह्या नावावरून ज्ञानसाधना, योगसाधना वा ध्यानसाधना हा ह्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. प्रथम सर्गाच्या ९ व्या श्लोकात : तत् श्रुतं तच्च विज्ञानं तद्व्यानं तत्परं तपः । अयमात्मा यदासाध्यस्वस्वरूपे लयं व्रजेत् ।। प्रथम नान्दीरूपात ध्यानव्याख्या केलेली आहे. व ज्ञानसाधनेद्वारा ध्यानसाधना साध्य करायला प्रेरणा दिली आहे. संक्षिप्तरुचि शिष्याकरता प्रथम बारा अनुप्रेक्षेच्या रूपात पूर्व तयारी करून संक्षेपात ध्याता ध्यानव्याख्या व भेद सांगितले आहेत, १२ अनुप्रेक्षेचे वर्णन करताना वाचक क्षणभर भान विसरून आपला मूर्खपणा समजू शकतो. ह्या वर्णनात आपदास्पद संबंधी, रोगाक्रांत शरीर, विनाशान्त ऐश्वर्य, मरणान्त जीवितामुळे क्षणिकत्वाची प्रतीति आहे. आपत्ति व मृत्यूपासून वाचविण्यासाठी कोणी शरण नसल्याची जाणीव आहे. संसाराचे विडंबन व पंचपरिवर्तनामुळे भय आहे. भिन्नत्वाचे प्रतिपादन आहे. एकत्वाचे सूचन आहे. अनर्थ अपवित्र मंदिर असणाऱ्या शरीराचे चित्रण आहे. आगमाप्रमाणे आस्रव, संवर, निर्जरा भेदासह स्पष्ट केले आहे. विविध प्रकारचा धर्म त्रिलोक वर्णन व दुर्लभ असणाऱ्या धर्माचा उल्लेख आहे. कामभोगशरीरेच्छेचा त्याग, संवेगी-निवेगी अप्रमादी व इन्द्रियविषयपराङ्मुख अशी प्रथम भूमिका तयार झाल्यावर, अशुभ, शुभ व शुद्ध असे त्रिविध आशय, लेश्येचे अवलंबन व ध्येयविषय ह्यामुळे ध्यान देखील अप्रशस्त, प्रशस्त व शुद्ध असे तीन प्रकारचे सांगितले आहे. जिताक्ष, स्ववश, संवृत्त, धीर, मुमुक्षु मुनी ध्याते आहेत. गृहस्थावस्थेत मनाचे दोष, कामवासना, आतरौद्र परिणाम व प्रमाद ह्यामुळे ध्यानसिद्धि होत नाही असे स्पष्ट प्रतिपादन आहे. ध्यान अपात्रांच्या यादीत तत्कालीन अन्य मत नित्यवादी, सांख्य, नैय्यायिक, वेदांती मीमांसक, अनित्यवादी बौद्ध, क्रियावादी १८०, अक्रियावादी ८४, ज्ञानवादी ६७, विनयवादी ३२, अशा ३६७ मतांचा उल्लेख करून दोषदिग्दर्शन करून मिथ्यादृष्टीत त्यांचा समावेश केला आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11