Book Title: Gyanarnava Author(s): Padma Killedar Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf View full book textPage 6
________________ आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव पवनस्तंभन हे प्राणायामाचे लक्षण व ते स्तंभन, पूरण, कुंभक व रेचक असे ३ प्रकारचे आहे. ह्यामुळे वायुस्तंभनाबरोबर मन निष्प्रमादी व आत्म्यावर अवरुद्ध होते. व कक्षाय क्षीण होतात. त्या अनुषंगाने पवनमंडल चतुष्टयांचे वर्णन केले. पृथ्वी, आप, पवन व वन्हीमंडल आहेत व त्यांचे कार्यविशेषाने शुभाशुभ भेद सांगितले आहेत. त्यामुळे अनेक लौकिक सिद्धी सांगितल्या पण मन स्ववश होते. त्यामुळे विषयवासना नष्ट होते. निजस्वरूपांत लयप्रवत्ती व परंपरेने मोक्ष हे पारमार्थिक फल आहे. प्रत्याहार-आपल्या इंद्रियाला व मनाला त्यांच्या त्यांच्या इंद्रियापासून परावृत्त करून स्वेच्छेनुसार ते लावतो हा प्रत्याहार. प्राणायामात विक्षेपाला प्राप्त झालेले मन स्वास्थ्याला प्राप्त होण्याकरता समाधिप्राप्तीकरता प्रत्याहाराचे प्रयोजन आहे. संसाररहित परामात्म्याचे वीर्यसहित ध्यान ते सवीर्यध्यान होय. ह्यात आत्मा परमात्म्याचे सूक्ष्म विवेचन आहे. त्यानंतर बहिरात्मा, अंतरात्मा व परमात्म्याचे वर्णन आहे. शरीरादिकांच्या ठिकाणी आत्मत्वाची बुद्धी असणारा बहिरात्मा, आत्म्यात आत्मत्वाची भावना करणारा अंतरात्मा व अत्यंत शुद्ध निर्मळ परमात्मा. (ह्यातील अनेक श्लोकांचे आचार्यांनी पूज्यपादांच्या समाधिशतकाच्या कितीतरी श्लोकांशी साम्य आहे.) बहिरात्मा हेय, अंतरात्मा साधन, व त्या साधनाने परमात्मा साध्य आहे. ५ ते १११९-२०-२२ इत्यादि जवळजवळ बत्तिसावा सर्ग म्हणजे पूज्यपादश्रींच्या समाधिशतकाशी बहुतांश श्लोकांच्या अर्थाशी मिळताजुळता आहे. हे धर्म्यध्यान सातव्या गुणस्थानात परिपूर्ण होते. त्या ठिकाणी उत्कृष्ट धर्मध्यान आहे. ह्या ध्यानाने सातिशय अप्रमत्त गुणस्थानातून श्रेणी चढतो व त्यामुळे शुक्लध्यान प्राप्त करून त्यामुळे कर्मनाश व केवलज्ञानाची प्राप्ती होते. धर्म्य व शुक्ल ह्या दोन्ही ध्यानांचे ध्येय एकच आहे पण धर्मध्यानापेक्षा विशुद्धि शुक्लध्यानाची जास्त व गुणस्थानभेदाने स्वामिभेद आहे. अनादिविभ्रमवासना, मोहोदय, अनभ्यास, तत्त्वसंग्रह अभाव व अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिर करण्याकरता, ध्यानविघ्न दूर करण्याकरता समस्त वस्तूंचा निश्चय करण्याकरता वस्तूच्या धर्मामध्ये स्थिर होण्याकरता धर्म्यध्यान आहे. ह्यात छद्मस्थाच्या क्षायोपशमिक वा दृष्ट ज्ञानाने सर्वज्ञांच्या आगमावरून परमात्म्याचा निश्चय करून परमात्म्याचे ध्यान करावे. आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय व संस्थान विचय हे धर्मध्यानाचे भेद आहेत. आगमात सांगितलेल्या वस्तुतत्त्वाला सर्वज्ञांची आज्ञा म्हणून चितवन आज्ञा विचय, त्यात प्रमाणनय निक्षेपाने उत्पाद व्यय ध्रौव्य रूप चेतन अचेतन रूप तत्त्वसमूहाचे चितवन, शब्दात्मक व अर्थात्मक श्रुतज्ञानाचे चितवन, हा ह्या ध्यानाचा विषय आहे. अनुषंगाने श्रुतज्ञानाचे विस्तृत विवेचन आहे. __अपायामध्ये, मोक्षसाधनेमध्ये अपायभूत असणाऱ्या तत्त्वाचा विचार आहे. व त्यापासून परावृत्त होण्याची व सावधानतेची प्रेरणा आहे. मोक्षपाया व मोक्षाच्या निर्णयाचा विचार आहे. विपाक विचयात कर्म, कर्मोदय, ८ कर्मे त्यांचे भेद, त्यांच्या उदयादिक अवस्थांचे चितवन आहे. २७ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11