Book Title: Gyanarnava Author(s): Padma Killedar Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf View full book textPage 5
________________ २०८ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ विषयी माध्यस्थ भाव ठेवावा. ह्यामुळे कषाय आटोक्यात राहतात. ह्या भावना व मोक्षमार्गाचा प्रकाश दाखविण्याकरिता दीपिकेप्रमाणे आहेत. त्यानंतर ध्यान करण्यायोग्य व अयोग्य स्थानाचा निर्देश आहे. म्लेंच्छ पापी दुष्ट राज्याच्या अधिकारातील स्थान, पाखंडी ऋषी, रुद्रादिक देवतास्थान, गर्विष्ठ सावकाराचे क्षेत्र, व्यसनी अड्डयाचे स्थान, शिकारी हिंसक, समरांगण हे ध्यानाकरिता अस्थान आहेत. एकंदर क्षोभज, मोहज, विकारज स्थान नको. सिद्ध क्षेत्र, महा क्षेत्र, कल्याणक स्थान, समुद्रकिनारा, वन, पर्वत, संगमस्थान, द्वीप, वन, गुंफा, जुने वन वा स्मशान, कृत्रिम वा अकृत्रिम चैत्यालय, शून्य घर, गांव, उपचन, संक्षेपाने ध्यान अविक्षेपक स्थाने असावीत. ___ पर्यंक, अर्धपर्यंक, वज्रासन, वीरासन, सुखासन, कमलासन, कायोत्सर्ग ही ध्यान योग्य आसने आहेत. ध्यानसिद्धीकरता, स्थिरतेकरता स्थान व आसन वर्णन आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ध्यान करावे. पण रत्नत्रयसहित मुनींसाठी हा नियम नाही. ह्या धर्मध्यानाचे स्वामी मुख्य व उपचार ह्या भेदाने प्रमत्तगुणस्थानी व अप्रमत्तगुणस्थानी आहेत. त्यात अप्रमत्तगुणस्थानी पूर्वधारी सातिशय अप्रमत्त होऊन श्रेणीला आरंभ करतो. म्हणून धर्मध्यानी होय. विकलश्रुत देखील धर्मध्यानाचे स्वामी आहेत. चवथ्या गुणस्थानापासून सातव्या गुणस्थानापर्यंत धर्मध्यानाचे स्वामी आहेत. जघन्य मध्यम उत्कृष्ट भेदाने ध्यान तीन प्रकारचे आहेत. त्यानंतर ध्यानमुद्रेचे वर्णन आहे. आसन विजयी, विकसित कमलसदृश दोन हात, निर्विकार चेहरा, शरीर सरळ व ताठ, निश्चल व अविभ्रमी मुद्रा असावी. बाकीच्या सांख्यादिकांनी आसनप्राणायामादि आठ ध्यानांग मानलेत. पण त्यांच्या मानण्यात लौकिक व शारीरिक निर्दोषता हे प्रयोजन आहे. त्यापाठीमागे तत्त्वज्ञानाची बैठक असायला पाहिजे. ती नाही. आचार्य शुभचंद्राच्या आधी ध्यानाचा प्रसंगोपात्त उल्लेख आहे. पण एवढा सविस्तर दिगंबरमान्य ध्यानग्रंथ आज उपलब्ध ग्रंथसंग्रहात नाही. त्यांच्या आधीच्या कोणत्याही आगमग्रंथात वा पूज्यपादांच्या ग्रंथात ह्या ध्यानांगाचा विचार आढळत नाही. पण ह्या ज्ञानार्णवात तत्वज्ञानाच्या बैठकीच्या सुंदर कोंदणात ही ध्यानपरिकर बसविली असल्यामुळे ध्यानसाधना सुंदर नि तेजस्वी झाली आहे. त्या काळात जनमनावर हा बाकीच्या मान्यतेचा इतका प्रभाव असावा की तो न डावलता, सम्यक्त्वात व शुद्धीत बाधा न आणता त्यांचा प्रयोजनभूत तेवढा स्वीकार त्यांनी केला आहे. साधारण ध्यानीकरता, मनाच्या अविक्षिप्त वा स्थिर अवस्थेकरिता ही ध्यानांग प्रयोजनभूत आहे. पण आत्मध्यानींना कसलाही आसनस्थानादिकांचा निर्बंध नाही. व ह्याच नव्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या अंगाचा विचार केला. त्याचप्रमाणे प्राणायामाचा देखील आगम व स्याद्वादाने निर्णय करून सिद्धी. मनाच्या एकाग्रतेपूर्वक आत्मस्वरूपात स्थैर्य ह्या दोन प्रयोजनाकरता प्राणायाम उपयुक्त होय. ह्यामुळे दृष्ट वा लौकिक प्रयोजन गौण करून सम्यक्त्वपूर्वक मुक्तीसाठी प्रयोजनभूत सांगितले आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11