Book Title: Gyanarnava Author(s): Padma Killedar Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf View full book textPage 1
________________ आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव प्रा. सौ. पद्मा किल्लेदार, नागपूर [संस्कृतमध्ये एक सुभाषित प्रसिद्ध आहे. चिता-चिन्ता-समा नास्ति बिंदुमात्र विशेषता। सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता॥ अशा सजीवाला जाळणाऱ्या चिन्तेला कसे जाळायचे हाच ध्यानाचा प्रमुख उद्देश्य आहे. संसारी माणस उठतो ती चिंता घेऊनच. मग ती लाकडाची की मिठाची असो, की तेलाची. तो झोपतोही चिन्ता घेऊनच, त्याचा भूत भविष्य वर्तमान चिन्ताग्रस्त असतो. अशा ह्या जन्मापासून मरेपर्यंत ग्रस्त करणाऱ्या चिन्तेला कायमचे ग्रस्त करते ते ध्यान होय. ह्याच ध्यानाचा जैनागमात फार काळजीपूर्वक विचार केलेला आहे. कुन्दकुन्दामध्ये नामोल्लेख असणारे ध्यान उमास्वामीच्या तत्त्वार्थसूत्रात सूत्रबद्ध झाले. पूज्यपादांनी सर्वार्थसिद्धीत त्याला स्पष्ट अर्थ प्राप्त करून दिला. भट्टाकलंकाने राजवार्तिकात त्यावर साधकबाधक चर्चा केली. शुभचंद्रांनी ज्ञानार्णवात त्याचा सर्व बाजंनी व सर्व अंगोपागांचा विचार करून अतिशय सखोल विवरण प्रस्तुत केले. अशा दुःखदायक व सुखहारक ग्रंथाचा हा अल्प परिचय मुमुक्षु लोकांसाठी करून देण्याचा हा स्वल्प प्रयत्न आहे. ] आचार्य शुभचंद्र हे आपणा सर्व धर्मबांधवांना त्यांच्या महान् कृतीमुळे व त्यांच्या ग्रंथाच्या अध्ययन परंपरेमुळे सुपरिचित आहेत. निरिच्छ वृत्तीने व साध प्रवत्तीने प्रसिद्धिपराङ्मुख अशी आपल्या मुमुक्ष आचार्यांची परंपराच आहे. त्यात शुभचंद्राचार्यांनी त्यांच्या कृतीत कोठेही नामोल्लेख देखील केला नाही तर जीवनविषयक माहिती दरच राहो. पण त्यांच्या ग्रंथात त्यांनी ज्या महान आचार्यांचा उल्लेख केला आहे त्यांत योगशुद्धि करणारे पूज्यपाद, कवीन्द्रसूर्य समन्तभद्र व स्याद्वाद विद्याधारी भट्टाकलंकदेव आचार्य जिनसेन ह्यांचे प्रामुख्याने स्मरण केले आहे. ह्या चारही आचार्यांत आचार्य जिनसेन हे इ. स. ८९८ च्या काही वर्ष आधीचे. व शुभचंद्र निश्चित त्यांच्या नंतरचे आहेत. त्यामुळे इ. स. ९ व्या शतकापूर्वी त्यांचा काळ मानू शकत नाही. पण त्यानंतरवा मर्यादाकाळ ऐतिहासिक पुराव्या अभावी सिद्ध करता येत नाही. प्रत्यक्ष ग्रंथकारांनी प्रथम सर्गाच्या अकराव्या श्लोकात व ग्रंथ समाप्तीच्या शेवटच्या दोन श्लोकांत ह्या ग्रंथाचा नामोल्लेख केलेला आहे. प्रथम सर्ग :अविद्या प्रसरोद्भूतग्रहनिग्रहकोविदम् । ज्ञानार्णवमिमं वक्ष्ये सतामानन्दमन्दिरम् ॥ २०४ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11