Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 10
________________ संपादकीय वक्तव्य हा तत्त्वार्थसार नामक ग्रंथ अध्यात्म योगी श्री अमतचंद्र आचार्य यांनी रचला आहे. यामध्ये श्रीमान उमास्वामी आचार्य विरचित तत्त्वार्थ सूत्र किंवा मोक्षशास्त्र या ग्रंथाच्या आधाराने जीव अजीवादिक सात तत्त्वांचे हेय उपादेय रूपाने विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. जीवाला एकांतपणे जीवतत्त्व उपादेय आहे. अजीवतत्त्व हेय आहे. हेयरूप अजीव तत्त्वाला उपादेयरूप जीवतत्त्व समजणे हेच अज्ञान. आस्रव-बध तत्त्व आहे. हेयाला हेयरूप व उपादेयाला उपादेयरूप असे हेय-उपादेय तत्त्वाचे यथार्थ विज्ञान-भेदविज्ञान होणे हेच संवर-निर्जरा मोक्ष तत्त्व आहे. हेयाला उपादेय समजणे विपरीत ज्ञानस्वरूप मिथ्यादर्शन मिथ्याजान मिथ्याचारित्र हाच संसारमार्ग आहेः संसार भ्रमणाचे दुःखाचे कारण आहे. हेयाला हेयरूप व उपादेयाला उपादेय समजणे हे भेदविज्ञानरूप समीचीन तत्त्वज्ञानरूप सम्यग्दर्शन-सम्यग्ज्ञान-सम्यक्चरित्र हाच संसार भ्रमण दुःखातून मुक्त होण्याचा व शाश्वत सुख शांति प्राप्त करण्याचा मोक्ष मार्ग आहे. संसारापासून भयभीत अशा ममुक्षु भव्यजीवाला हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे, हे जाणून आमचे परम गुरुदेव वयोवृद्ध अध्यात्म योगी तपोनिधि श्री १०८ ममन्नभद्र महाराज (वाहुबली) यांच्या प्रेमळ परम हितकारक आदेशावरून या अनपम आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून जिनवाणीची सेवा करण्याचे व माझे जीवन सार्थक करण्याचा योग मला प्राप्त झाला. या बद्दल पूज्य गुरुदेवांचे अनंत उपकार स्मरण करून ही कृति मी त्यांच्या कर कमळी सादर समर्पण करीत आहे. संपादक पं. नरेद्रकुमार भिसीकर शास्त्री Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 ... 356