Book Title: Jain Sahityatil kahi pramukh Acharya va tyanche pramukh granth
Author(s): A S More
Publisher: Z_Anandrushi_Abhinandan_Granth_012013.pdf

View full book text
Previous | Next

Page 3
________________ माहा जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २०६ मागात नय व प्रमाणानुसार मति, श्रुति, अवधि, मनपर्याय व केवल हे प्रकार सांगून ज्ञानाचे कूमति, कुश्रुति, कुअवधि इ वाईट प्रकार सांगितले आहेत. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यकचारित्र या तिन्हींची एकता होणे म्हणजेच मोक्षमार्गाची प्राप्ति होण असे कथन केले आहे । ज्ञयमीमांसेत जगातील जीव अजीव या दोन जगतमूल गोष्टींचे विवेचन कोले आहे तिसत्या अध्यायात अधो, मध्य व ऊर्ध्व लोकाचे विवेचन केले आहे अर्थात येथे भौगोलिक वर्णन अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे चौध्या अध्यायात देवसृष्टीचे वर्णन केले असून पाचव्या अध्यायात द्रव्यविषयक चर्चा केली आहे ।। चारित्र मीमांसेत ६ ते १० अध्यायांचा सामावेश असून कर्मविषयक चर्चा केली आहे वाईट अथवा चांगल्या प्रवृत्तींचे विवेचन करून, शेवटी केवलज्ञानाचा हेतू, मोक्षाचे स्वरुप व मुक्ती इ गोष्टीचे सुन्दर विवेचन केले आहे. मोक्ष हा सर्व प्राण्यानां इष्ट असून सर्व प्राण्यांची त्यासाठी खटपट चाल असते. इतर दर्शनातून देखील मोक्षविषयक बरीचशी चर्चा केली गेली आहे मोक्ष हा सर्वमान्य असून तो प्राप्त करण्याचे प्रकार मात्र विविध सांगितले आहेत तत्वार्थसूत्रातील काही सूत्रे म्हणजे जण रत्नांची खाणच आहे, 'गागर में सागर' या उक्ती प्रमाणे कमी शब्दात अधिक मौल्यवान गोष्टींचे विवेचन केले आहे। आ० उमास्वातिकृत 'तत्वार्थसूत्र' या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथावर अनेक महान विद्वानांनी व आचार्यांनी अनेक टीका लिहिल्या आहेत, त्यापैकी काही प्रमुख टीका पुढीलप्रमाणे आहेत, आ० समंतभद्रकृत गंधहस्तिमहाभाष्य, आ० पूज्यपादरचित सर्वार्थ सिद्धि, आ० अकलंकदेवकृत राजवातिक, आ० विद्यानंदीकृत श्लोकवार्तिक, श्री अभयनंदसूरिकृत तत्वार्थटीका इ० आ० उमास्वातींची लेखनशैली अत्यंत सरल, सुबोध र व संक्षिप्त आहे । त्यांनी आपली ग्रंथरचना संस्कृतभाषेतच केली आहे, आचार्यांच्या सूत्ररूपी शैलीचा पुढच्या अनेक आचार्याच्यावर प्रभाव पडलेला दिसून येतो, त्यांनी जैनागमातील भूगोल, खगोल, तत्वज्ञान, तर्कशास्त्र इ० विविध गोष्टींचा सूत्ररूपाने तत्वार्थसूत्रात उल्लेख केला आहे जैनेतर दर्शनांचे खंडन कल्यासाठी उमास्वातीनी न्याय, वैशेषकि सांख्य योग बौद्ध इ० इतर दर्शनांचा अभ्यास केलेला दिसतो. आ० उमास्वातींची रचना अध्यात्मतत्त्वांनी मुक्त आहे, प्रसन्न, सरल संक्षिप्त व शुद्ध भाषाशैलीवरूनच त्यांचे अगाध पांडित्य आपले मन आकषित करून घेते। खरोखर हतबुद्ध, ज्ञानाची अत्यंतिक तलमल असणान्या लोकांना मार्गदर्शनपर 'तत्वार्थसूत्र' सारखा महान ग्रंथ लिहून जैन धर्मावर अगाध उपकार केले आहेत हे, कदापि विसरता येणार नाहीं। आ० हरिभद्रसूरि व षड्दर्शनसमुच्चय जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे कार्य पहात असताना आ० हरिभद्रांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : आ० हरिभद्र हे श्वेतांबर परंपरेचे मानले असून आठव्या शतकातील ते एक 'युगप्रधान लेखक' म्हणून गणले जातात. हरिभद्रांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शंकरभट्ट व मातेचे नाव गंगा असे होते. त्यांचा जन्म चितौड मधील 'ब्रह्मपुरी' या गावी झाला असावा त्यांचा जीवनकाल साधारणपणे वि० सं०७५७ ते ८२७ इतका मानला जातो. ब्राह्मण 卐 आचार्गप्रशसभागायफ्रतारनाशक श्रीआनन्द श्रीआनन्द Pramommmmmmmmmmmmmmmonommmmmmmmmm Amrenmoosmaroommmmmmmameriwala Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11