Book Title: Jain Sahityatil kahi pramukh Acharya va tyanche pramukh granth Author(s): A S More Publisher: Z_Anandrushi_Abhinandan_Granth_012013.pdf View full book textPage 7
________________ जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २१३ CIAN शरीराचे तुलनात्मक विवेचन केले आहे । तिस-या अध्यायात अधोलोक, मध्यलोक यांचे विस्तृत विवेचन केले असून च्यौथ्या अध्यायाच्या दरम्यान स्वर्गलोकाचे पूर्ण विवेचन केले आहे पाचव्या अध्यायात षद्व्यांचे विवेचन केले असून, सहाव्या अध्यायात विविध कर्माच आश्रव व त्यांचा परिणाम सांगितला आहे सातव्या अध्यायात जैनगृहस्थीचा आचार कथन केला असून, आठव्या अध्यायात कर्मसिद्धांत मांडला आहे ६ व्या अध्यायात जैनमुनिआचार कथन केला असून १० का अध्यायात मोक्षाचे विवेचना केले आहे। अन्य मतांच्या विवेचनासाठी पतंजलीचे महाभाष्य, वैशेषिक सूत्र, न्यायसूत्र, वसुबंधूचा अभिधर्मकोश इत्यादि ग्रंथातील उद्धरणे उधृत केली आहेत। खरोखर आ० अकलंकांच्या महान साहित्य कृतींचे अंतरंग डोकावून पाहिलेतर त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाची छाप आपल्या मनावर सहज पडते ते तर्कप्रधान व विचारप्रधान असे महान विद्वान असून स्वतः अल्पभाषी व सतत विचार जागृती बालगणारे महान आचार्य होऊन गेले । __ आचार्य नेमिचंद्र व गोम्मटसार आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती हे वि० संवत ११ व्या शातकात होऊन गेले, जैन सिद्धांत साहित्याचे ते एक महान पंडित होते । त्यांना 'सिद्धांत चक्रवर्ती' ही महान पदवी प्राप्त झाली होती । ते नंदिसंघ देशीय गाणचे आचार्य असून राजा श्री राजमल्लदेव, चामुडराय, श्री राजाभोज यांचे गुरु होते । यावरूनच ते गंगवंशीम राजा मारसिंह व चामुडराय यांच्चा कालात होऊन गेले असावेत । गंगवंशीयांचा राज्यकाल म्हणजे जैनधर्माच्या दृष्टीने तो एक सुवर्णकाल मानला जातो । कारण जैन धर्माला या गंगवंशीय बराच राजाश्रम दिन होता । नेमिचंद्रांच्चा विद्वत्तेला अशा राजांची साथ मिलाली असेल हे सहजशक्य आहे । ते एक चतुर विद्वान व सिद्धांत साहित्यातील प्रकांड पंडित होऊन गले। ते स्वतःहविषयी लिहितात जइ चक्केण य चक्की छह खंड साहियं अविग्घेण।। तह मइचक्केण मया छह खंडं साहियं सम्मं ॥ ३६७ (गो० क०) अर्थात 'ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट आपल्या चक्ररूपी अस्त्राने भरताच्या सहा खंडांना स्ववश करतो, त्याप्रमाणे मी (नेमिचंद्राने) आपल्या बुद्धिरूपी चक्राने आद्य सिद्धांत साहित्याचे सहा खंड म्हणजे षट-खंड-आगमाची साधना केली।' आनेमिचंद्राच्चा गुरु-शिष्य परंपरेविषयी आपणाला त्यांच्या 'त्रिलोकसार' ग्रंथातुन माहिती मिलते। नेमिचंद्रांनी अभयनंदीलाच आपले परमगुरु मानले असून वीरनंदि, इंद्रनंदि यांना ज्येष्ठबंधवत् नमस्कार केला आहे । कनकनंदीला देखील त्यांनी आपले गुरु मानले आहे । ही गोष्ट त्यांच्चा कालनिर्णयावरून देखील स्पष्ट होते । आ० नेमिचंद्राचा काल साधारणपणे ११ व्या शतकाच्या पूर्वार्धातच मानला आहे। आ० नेमिचंद्रांनी राजा मारसिंह व चामुंडराय या महान भक्तांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच ग्रंथरचना केली आहे । एवढेच नव्हे तर चामुंडराय राजाच्या निमित्तानेच त्यांनी 'गोम्मटसार' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली आहे। AUR प AMRAAAAAAAANI.AAIABAD श्रीआनन्द अन्य श्रीआनन्द अन्य mywar Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11