Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
- प्रा० अ० अस० मोरे, एम० ए० [प्राकृत विभाग प्रमुख, दयानन्द महाविद्यालय, सोलापुर]
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य
त्यांचे प्रमुख ग्रन्थ
% 3
Ala
जैन साहित्य अती विशाल आणि महान आहे । भारतीय साहित्यात त्याचे एक विशिष्ट स्थान असून, भारतीय साहित्याचे ते एक अविभाज्य अंग मानले जाते । जैन आचार्यांनी व साहित्यकारांनी विविध भाषांमधन ग्रंथरचना करून भारतीय साहित्याला विविधता प्राप्त करून दिली आहे व भारतीय साहित्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले आहेत । जैन धर्माच्या इतिहासाचे अवलोकन केले तर, जैन धर्माने भारतीय समाज जीवन विकसित व सुदृढ़ करण्यास किती मदत केली आहे हे सहजपणे लक्षात येईल । शिवाय या धर्माने समाज जीवनाचा विचार संकुचित दृष्टिकोन ठेवून केलेला नाही । जैन धर्माचे कार्य एका राष्ट्रीय भमिकेतून झाल्यामुले त्यात सदैव उदार व उच्च विचारसरणीचा अवलंब केला गेला आहे । जैनाचार्या नी आपले बरेचसे जीवन साहित्य रचण्यातच व्यतीत केले आहे। त्यांनी आपल्या जैन दर्शन व तर्क शास्त्र, जैन तत्त्वविद्या आणि पौराणिक कथा, जैन सिद्धांत व नीतिशास्त्र तसेच अन्य साहित्यिक रचनांनी जैनधर्माचे यथार्थ दर्शन घडविले आहे। जैनधर्मात अनेक प्रकांड पंडित व विद्वान आचार्य झाले । त्यातील काही महान तार्किक, व्याकरणकार, तत्त्ववेत्ते व न्यायाचार्य होऊन गेले काही आचार्यांनी काव्य, नाटक, कथा, टीका, शिल्प, मंत्रतंत्र, वास्तु, वैद्यक इत्यादी विषयांवर देखील पुष्कल साहित्य लिहिलेले आहे।
जर्मन विद्वान डॉ० विंटरनिटज यांच्या मते 'जैन साहित्य हे भारतीय भाषांच्या इतिहासाच्या दृष्टीने अती महत्वपूर्ण आहे।' धर्म प्रचारासाठी म्हणून जैनधर्माने तत्कालीन लोकभाषांचाच स्वीकार केला आहे । आज जे जैन साहित्य उपलब्ध आहे, ते भ० महावीरांच्या परंपरेशी संबंधित आहे । भ० महावीरांचे प्रथम गणधर गौतम इंद्रभूती होते । भ० महावीरांचा उपदेश लक्षात ठेऊन तो बारा अंग व चौदा पूर्वाच्या रूपाने विभागला । अंग व पूर्वांग ज्ञानात ते निपुण होते त्यांना श्रुतकेवली म्हटले जात असे । जैन परंपरेत 'केवलज्ञानी' व 'श्रुतकेवली' ही दोन पदे अत्यत महत्त्वाची मानली जात । 'केवलज्ञानी' समस्त चराचर
-AAAAAJAL
na
n danRJAJALAnnanAANAS
आचार्यप्रवर अभिआचार्यप्रवभिनी श्रीआनन्दग्रन्थ श्रीआनन्दन्थ
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
aouadarasinawwantarAJAJMEASABoaawanSADARADARMAdewasiaNASANNADASE
wwwmarwareneurs
आचार्यप्रवभिनयआचार्यप्रवरात्री
Minocommmmmmm mmmmmmmmmms
२०८
इतिहास और संस्कृति
जगाला प्रत्यक्ष जाणतात व पाहतात । त्याचप्रमाण श्रुतकेवलीही शास्त्रात कथन केलेला प्रत्येक विषय श्र तज्ञानाने स्पष्टपणे जाणत ।
भ० महावीरांच्या निर्वाणानंतर तीन केवलज्ञानी व पाच श्रुतकेवली झाले । त्यातील भद्रबाह हे शेवटचे श्रुतकेवली होते । पुढे दुष्काल व इतर काही आपत्तीमुले साधूचारात बरीचशी शिथिलता आली । भद्रबाहूच्या गैरहजेरीत जे साहित्य लिहिले गेले ते एकपक्षी होते । त्यांना इतरांनी मान्यता दिली नाही व यामुलेच जैनधर्माचे श्वेतांबर व दिगंबर हे दोन संप्रदाय निर्माण झाले ।
प्रस्तुत लेखामध्ये श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायातील अगदी प्रमुख पाच आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ यांचा आढाबा घेण्यात आला आहे । यातील बहुतेक आचार्यांना दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे । ते आचार्य पुढील प्रमाणे १. आ० उमास्वाति, २. आ० हरिभद्रसुरि, ३. भट्टाकलंक, ४. आ० नेमिचंद्र, ५. आ० हेमचंद्र । आचार्य उमास्वाति व तत्वार्थसूत्र
आ० उमास्वाति हे विक्रम सं तिसरया शतकात होऊन गेले । ते कूदकुंदाचे पट्टशिष्य असून त्यांनी जैन सिद्धांत संस्कृत साहित्यात निबद्ध करून 'तत्वार्थसूत्र' नामक महान ग्रंथाची रचना केली। श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची या आचार्यांना मान्यता आहे । दिगंबर परंपरेत त्यांना 'उमास्वामी' म्हटले असून, श्वेताबर परंपरेत त्यांना 'उमास्वाती' असे म्हटले आहे । या आचार्यांनी कमीत कमी लिहन जास्तीजास्त प्रसिद्धि मिलविली आहे।
आ० उमास्वातीचा परिचय आपणाला श्वेतांबरी तत्त्वार्थाधिगम' या ग्रंथात मिलतो। त्यांचा जन्म न्यग्रोधिका नामक नगरीत झाला असून त्यांच्या पित्याचे नाव स्वाति आणि मातेचे नाव वात्सी असे होते । गोत्राने ते कौभिषिणी होते । त्यांना गृध्रपिच्छाचार्य या नावाने देखील संबोधिले जाते।
गावोगाव विहार करीत असताना ते एकदा कुसुमपूर नगरात आले । तेथे तुच्छ शास्त्रामुले हतबुद्धि झालेल्या लोकांच्या विषयी अनकंपा निर्माण होऊन व त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता तत्वार्थसूत्राची रचना केली असावी, अशी एक कथा दिली जाते । तर सिद्धय नावाच्या विद्वानाला मोक्षाचे स्वरूप समजावून देण्यासाठी तत्वार्थसूत्र या ग्रंथाची रचना केली असावी, अशी दुसरी कथा सांगितली जाते अर्थात संस्कृतमध्ये सूत्ररचना करणारे हे प्रथम जैन आचार्य मानले जातात । शेकडो ग्रंथांचा सार काढून आ० उमास्वातीनी 'तत्वार्थसूत्र' या महान ग्रंथाची रचना केली। या ग्रंथाला दूसरे नाव 'मोक्षशास्त्र' असेही दिले आहे । वैदिक दर्शनात जे महत्व गीतेस, मुस्लिम धर्मात जे महत्व कुराणास, ख्रिस्ती लोकांत जे महत्व बायबल या ग्रंथास आहे, तच महत्व जैन परंपरेत 'तत्वार्थसूत्र' या ग्रंथास दिले गेले आहे ।
'तत्वार्थसूत्र' द्रव्यानयोगातील एक प्रमुख ग्रंथ म्हणून गणला जातो।हा ग्रन्थ एकण दहा अध्यायात विभागला आहे । त्याचे प्रामुख्याने ज्ञानमीमांसा, ज्ञयमीमांसा व चारित्रमीमांसा या तीन भागात विभाजन केले असून, या ग्रंथात जवल जवल एकूण ३५७ इतकी सूत्रसंख्या आहे । 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः' या अतिशय महत्वपूर्ण सूत्राने या ग्रंथाची सरूवात झाली आहे। ज्ञानमीमांसेच्या पहिल्या
-
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
माहा
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २०६ मागात नय व प्रमाणानुसार मति, श्रुति, अवधि, मनपर्याय व केवल हे प्रकार सांगून ज्ञानाचे कूमति, कुश्रुति, कुअवधि इ वाईट प्रकार सांगितले आहेत. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यकचारित्र या तिन्हींची एकता होणे म्हणजेच मोक्षमार्गाची प्राप्ति होण असे कथन केले आहे । ज्ञयमीमांसेत जगातील जीव अजीव या दोन जगतमूल गोष्टींचे विवेचन कोले आहे तिसत्या अध्यायात अधो, मध्य व ऊर्ध्व लोकाचे विवेचन केले आहे अर्थात येथे भौगोलिक वर्णन अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे चौध्या अध्यायात देवसृष्टीचे वर्णन केले असून पाचव्या अध्यायात द्रव्यविषयक चर्चा केली आहे ।।
चारित्र मीमांसेत ६ ते १० अध्यायांचा सामावेश असून कर्मविषयक चर्चा केली आहे वाईट अथवा चांगल्या प्रवृत्तींचे विवेचन करून, शेवटी केवलज्ञानाचा हेतू, मोक्षाचे स्वरुप व मुक्ती इ गोष्टीचे सुन्दर विवेचन केले आहे. मोक्ष हा सर्व प्राण्यानां इष्ट असून सर्व प्राण्यांची त्यासाठी खटपट चाल असते. इतर दर्शनातून देखील मोक्षविषयक बरीचशी चर्चा केली गेली आहे मोक्ष हा सर्वमान्य असून तो प्राप्त करण्याचे प्रकार मात्र विविध सांगितले आहेत तत्वार्थसूत्रातील काही सूत्रे म्हणजे जण रत्नांची खाणच आहे, 'गागर में सागर' या उक्ती प्रमाणे कमी शब्दात अधिक मौल्यवान गोष्टींचे विवेचन केले आहे।
आ० उमास्वातिकृत 'तत्वार्थसूत्र' या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथावर अनेक महान विद्वानांनी व आचार्यांनी अनेक टीका लिहिल्या आहेत, त्यापैकी काही प्रमुख टीका पुढीलप्रमाणे आहेत, आ० समंतभद्रकृत गंधहस्तिमहाभाष्य, आ० पूज्यपादरचित सर्वार्थ सिद्धि, आ० अकलंकदेवकृत राजवातिक, आ० विद्यानंदीकृत श्लोकवार्तिक, श्री अभयनंदसूरिकृत तत्वार्थटीका इ०
आ० उमास्वातींची लेखनशैली अत्यंत सरल, सुबोध र व संक्षिप्त आहे । त्यांनी आपली ग्रंथरचना संस्कृतभाषेतच केली आहे, आचार्यांच्या सूत्ररूपी शैलीचा पुढच्या अनेक आचार्याच्यावर प्रभाव पडलेला दिसून येतो, त्यांनी जैनागमातील भूगोल, खगोल, तत्वज्ञान, तर्कशास्त्र इ० विविध गोष्टींचा सूत्ररूपाने तत्वार्थसूत्रात उल्लेख केला आहे जैनेतर दर्शनांचे खंडन कल्यासाठी उमास्वातीनी न्याय, वैशेषकि सांख्य योग बौद्ध इ० इतर दर्शनांचा अभ्यास केलेला दिसतो. आ० उमास्वातींची रचना अध्यात्मतत्त्वांनी मुक्त आहे, प्रसन्न, सरल संक्षिप्त व शुद्ध भाषाशैलीवरूनच त्यांचे अगाध पांडित्य आपले मन आकषित करून घेते।
खरोखर हतबुद्ध, ज्ञानाची अत्यंतिक तलमल असणान्या लोकांना मार्गदर्शनपर 'तत्वार्थसूत्र' सारखा महान ग्रंथ लिहून जैन धर्मावर अगाध उपकार केले आहेत हे, कदापि विसरता येणार नाहीं।
आ० हरिभद्रसूरि व षड्दर्शनसमुच्चय जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे कार्य पहात असताना आ० हरिभद्रांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : आ० हरिभद्र हे श्वेतांबर परंपरेचे मानले असून आठव्या शतकातील ते एक 'युगप्रधान लेखक' म्हणून गणले जातात. हरिभद्रांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शंकरभट्ट व मातेचे नाव गंगा असे होते. त्यांचा जन्म चितौड मधील 'ब्रह्मपुरी' या गावी झाला असावा त्यांचा जीवनकाल साधारणपणे वि० सं०७५७ ते ८२७ इतका मानला जातो. ब्राह्मण
卐
आचार्गप्रशसभागायफ्रतारनाशक श्रीआनन्द श्रीआनन्द
Pramommmmmmmmmmmmmmmonommmmmmmmmm
Amrenmoosmaroommmmmmmameriwala
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
Aainamw-JANKRABAIKALAJAJARAJAMANAVSSASAJANAMANABAJAJAAMAAMAALAAAAAAAAADuos
आचार्यप्रवभिआार्यप्रवभि आनन्न्श्राआनन्दान्थर
२१०
इतिहास और संस्कृति
परंपरेनुसार त्यांनी प्रथम संस्कृतचा गाढा आभ्यास करून संस्कृतमध्येच ग्रंथरचना केली, प्राकृत तथा जैनशास्त्राचा अभ्यास करावयाचा असलेतर, जिनदीक्षा घ्यावी लागेल ही अट असल्यामुले त्यानी जैनदीक्षा स्वीकारली, आपल्या ज्ञानाच्या गर्वामुले 'ज्याचे वचन मला कलणार नाही त्याचे भी शिष्यत्व पत्करेन' असे शब्द कोरलेला एक सुवर्णपट गलयात अडकबून त बिहार करीत होते पण पुढे त्यांचा 'चक्किदुगं हरिपणग'... या श्लोकामुले पराजय झाला अर्थात तो पराजय याकिनी महत्तरेने केला होता, म्हणूनच पुटे ते स्वत:ल 'या किनीसुत' अथवा 'धर्मतो याकिनीमहत्तरासूनु' या विशेषणात स्वतःला धन्य मानीत ।
आ० हरिभद्रसूरि जैनधर्मातीलच नव्हे तर भारतातील एक महान आचार्य होऊन गेले त्यांच्या ज्ञान विषयक ग्रंथांना दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे प्रो किल्हॉर्न हयुलार, हयुलर पिटर्सन, जेकोबी इ० पाश्च्यात्य विद्वानांनी त्यांच्या ग्रंथभांडाराचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला तर विंटरनिट्स, जेकोबी, लायमन, सुवाली व शब्रिग इ० विद्वानांनी त्यांच्या ग्रंथाविषयी व जीवनविषयक पुष्कल चर्चा केली आहे, पाश्चात्य विद्वानांच्या विद्वत्तेवा एक विषय होऊन बसणे, यावरूनच हरिभद्र सूरोची प्रतिभा किती महान असेल हे स्पष्ट होते।
हरिभद्रसूरीना 'भव विरह' या दुस-या विशेषणाने संबोधिले जाते अर्थात हे विशेषण त्यांच्या प्रत्येक ग्रंथकृतीच्या शेवटी दिलेल आढ़लत हे विशेषण त्यांना पुढीत तीन कारणावरून मिलाले असावे धर्मस्वीकार प्रसंगी, शिष्यांच्या वियोगाप्रसंगी, याचकांच्या आशिर्वाद प्रसंगी, आ० हरिभद्रसूरी उद्योत्तनाचे गुरु असून जिनभद्राचे शिष्य होते, त्यांनी १४०० प्रकरण ग्रंथ रचले होते, असे म्हटले जाते, त्याचे षड्दर्शन समुच्चय, शास्त्रवार्तासमुच्चय, अनेकान्तवाद प्रवेश-अनेकान्त जयपताका इ. ग्रन्थ प्रसिद्ध, आहेत, संस्कृत प्राकृत दोन्ही भाषेवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व होते, योगाविषयक योगाबिंदू व योगशास्त्र हे दोन ग्रंथ लिहिले तर, समराइच्चकहा व धूर्ताख्यान हे दोन अतिप्रसिद्ध कथा ग्रंथ लिहिले, अर्थात साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यानी संचार, केलेला दिसतो प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या 'षड्दर्शन समुच्चय' या महत्वाच्या ग्रंथाची थोडीफार माहिती देण्यात आली आहे ।
भारतीय दर्श चे प्रतिपादन करणारी सर्व प्रथम जैन ग्रंथरचना आ० सिद्धसेन दिवाकर यानी केलेली दिसते, त्यांच्या नंतरच आ० हरिभद्रसूरींचे नाव घेतले जाते, हरिभद्राने षड् दर्शनसमुच्चय या ग्रंथात सहा दर्शनांचे विवेचन केले आहे, हे सर्व विवेचन पद्यबद्ध आहे, सिद्धसेन दिवाकर आचार्यांच्या मानाने हरिभद्रसूरिने अगदी साध्या व सरल रीतिने दर्शनांचे विवेचन केले आहे, षड्दर्शन समुच्चय हा ग्रंथ इतका महत्वपूर्ण मानला जातो की, हरिभद्रसूरिनंतर या ग्रंथाचा उल्लेख मर्वसिद्धांत प्रवेशक, सर्वसिद्धांत संग्रह, सर्वदर्शन संग्रह, जैनाचार्य राजशेखरकृत षड्दर्शन समुच्चय व माधवसरस्वतीकृत सर्वदर्शनकौमुदी या पाच ग्रन्थामध्ये केला गेला आहे।।
'षड्दर्शन समुच्चय' हया ग्रंथातील ८७ श्लोक अनुष्टुप छंदात आहेत, हरिभद्रसूरींनी देवता आणि तत्व या मूल भेदावरून बौद्ध, नैयायिक, सांख्य, जैन, वैशेषिक व जैमिनीय या सहा दर्शनाचा विचार केल आहे, या सहा दर्शनानुसार या सहा ग्रंथतील प्रथमच्या११ श्लोकामध्ये बौद्ध दर्शनाची चर्चा केली असून
IAAD
ANNEL
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २११
१२- ३२ मध्ये नैयायिक दर्शनाची, ३३ ते ४३ सांख्य दर्शनाची ४४ ते ५८ मध्ये जैन दर्शनाची ५६ ते ६७ वैशेषिक दर्शनाची व ६८ ते ७७ श्लोकां मध्ये जैमिनीय दर्शनाची माहिती दिली आहे । वैशेषिक दर्शनाचा खुलासा करताना, सुखातीलाच महले आहे की, देवतांच्या अपेक्षेने नैयायिक दर्शन व वैशेषिक दर्शन यांत विशेष भेद नाहीं, दोन्ही दर्शनात महेश्वराला सृष्टिकर्ता व संहारक म्हटले आहे । तत्वविषयक जो भेद आहे तो त्यांनी स्पष्ट केला आहे ।
बरीच दर्शने नैयायिक दर्शन व वैशेषिक दर्शन यात विशेष भेद मानीत नाहीत. दोन्ही दर्शनांना एकाच दर्शनांर्तगत मानले आहे । अशप्रकारे पूर्व उल्लेख केलेली ५ अस्तिक दर्शनात एक नास्तिक दर्शन अर्थात चार्वाक दर्शनाची वाद करून एकूण सहा संख्या पुरी केली आहे । शेवटी ८० ते ८७ श्लोकात लोकायत दर्शनाची देखील माहिती दिली आहे ।
येथे विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आ० हरिभद्रसूरीनी कोणत्याही दर्शनाची टीका केली नाही । केवल कोणत्या दर्शनाची कोणती मान्यता आह याची चर्चा केती आहे ।
'षट्दर्शन समुच्चय' ग्रंथावर गुणरत्नसूरि ( वि० सं० १४००-७५) रचित एक 'तर्क रहस्यदीपिका' नावाची टीका आहे । अर्थात् दर्शनाविषयक माहिती देणारा 'षट्दर्शन समुच्चय ७ हा आ० हरिभद्रचा एक महान ग्रन्थ आहे । त्यांच्या लेखन शैलीचा प्रभाव नंतरच्या अनेक विद्वानांच्यावर पडलेला दिसतो ।
आचार्य भट्टाकलंक व तत्वार्थराजवार्तिक
आ० भट्टाकलंक है, व्या शतकातील एक प्रकांड पंडित होऊन गेले. जैन वाङमयात त्यांचे स्थान अनुपमेय असे आहे. त्यांना श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता असून, त्यांनी जैन न्यायास यथार्थ स्वरूप दिले होते, जैन न्यायास त्यांनी जे यथार्थ रूप दिले त्यावरच पुढच्या जैन ग्रंथकारांनी आपनी न्यायविषयक ग्रंथरचना केली. ते एक महान विद्वान, धुरंधर शास्त्रार्थी व उत्कष्ट विचारक होऊन गेले. त्यांची ग्रंथरचना विद्वान दार्शनिक पंडितांना देखील समजण्यास कठीण अशी आहे. त्यांना जैन न्यायाचे 'सर्जन' असे म्हटले आहे. त्यांच्चा नावावरूनच जैन न्यायास श्लेषात्मकरित्या 'अकलंक न्याय' असे म्हटले आहे. स्वामी समतभद्र व पुज्यपाद यांच्यानंतर त्यांनीच जैन वाङमय समृद्ध बनविलेले दिसते आणि म्हणनच भट्टाकलक यांचे नाव ऐकताच जैन धीमयांचे मस्तक श्रद्धेने नत होते ।
बौद्ध धर्माचा प्रसार अति जोरात चालला असता व इतर सर्व दर्शनांच्या प्रसाराला आला बसत चालला असतानाच, आ० भट्टाकलंकाचा जन्म झाला बौद्ध दार्शनिकांच्या बरोबर त्यांनी बऱ्याच वेला चर्चा करुन शेवटी अनेकांत विजय ची पताका फडकविलेली दिसते याविषयीची माहिती आपणाला कथाकोश ग्रंथात व राजवलीकथेनुसार मिलते एवढेच नव्हेतर, त्यांच्या विद्वत्तची प्रशंसा अनेक शिलालेखातून व विविध ग्रंथकारांच्या ग्रंथातून मिलते ।
आ० भट्टाकलंकांच्या जीवनाविषयीची निश्चित माहिती आपणाला मिलू शकत नाही जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार ते 'लघुहब्व' राजाचे पुत्र असून, आजन्म ब्रह्मचारी असलेला दिसतात त्यांच्या एका भावाचे नाव निकलंक असल्याचे सांगितले आहे. ज्ञानप्राप्तीसाठी अकलक व निकलंक या
श्री आनन्द जन्
श्री आनन्द
फ्र
ग्रन्थ
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य प्र० ग्रन्थ
漫
डॉ.
漫
आआनन्दा ग्रन्थ
२१२
इतिहास और संस्कृति
दोघा भावांनी परदेशगमन केल्याची व खूप कष्ट सोसल्याची माहिती कथाकोशात व इतर काही ग्रंथातून मिलते |
आ० भट्टाकलंकांचे स्मरण अनेक ग्रंथकारांनी त्यांच्या ग्रंथातून केलेले दिसते. महाकवि वादिराजसूरीने पार्श्वनाथचरितात, त्यांचा उल्लेख केला असून, पांडवपुराण व महापुराण या ग्रंथातूनही त्यांचा उल्लेख आढलतो. त्यांना अनेक विद्वानांनी विविध विशेषणांनी देखील विभूषित केले. आहे महाकवि वादिराजाने 'तार्किकलोक मस्तकर्माणि,' प्रभाचंद्राने 'इतरमतावलम्बीवादिरूप', लघुसमंतभद्रांनी 'सकलता - किकचूडामणिमारीचिमेचकितचरणनखकिरणो भगवान भट्टाकलंकदेवः' देवसुरिनी 'प्रकटिततीर्थान्तरीम कलङ्कोऽकलङ्गः' मर पध्नप्रभमलधारिदेवाने 'तर्काब्जार्क' (तर्करूपी कमलांना विकसित करणारे सूर्य) या विविध विशेषणांनी भूषविले आहे. या त्यांच्या विविध उल्लेखावरूनचते किती गाढे विद्वान असतील याची आपणाल सहज कल्पना येते. अर्थात त्यांनी आपल्या सर्व न्यायग्रंथातून स्वमताचे प्रतिपादन व परमताचे व्यवस्थितरीत्या खंडन केलेले दिसून येते.
आ० भट्टाकलंक यांची अगाध विद्वत्ता, तार्किकता, तथा लेखन शैली इत्यादि विषयी माहिती करुन घ्यावयाची असेलतर त्यांच्चा साहित्यरूपी गंगोत्रीत स्नान करणे तथा निमग्न होणे अत्यावश्यक आहे. त्यांचे लेखन गद्य असो वा पद्य असो ते सूत्रांच्यामाणे अतिसंक्षिप्त असून गहन व अर्थबहुलतेने युक्त आहे. स्वतःहाच्या ग्रंथावर त्योनी स्वत:च भाष्य लिहिले आहे. आ० भट्टाकलंक यांच्या साहित्यावर टीका लिहिणारे स्याद्वादपति विद्यानन्दी व अनंतवीर्य हे दोन महान आचार्य होऊन गेले ।
आ० भट्टाकलंक यानी भाष्य आणि स्वतन्त्र ग्रंथरचना अशा दोन प्रकारे आपले साहित्य लिहिले आहे. भाष्या मध्ये तत्त्वार्थराजवार्तिक व अष्टशती हे दोन प्रमुख ग्रंथ होत त्याशिवाय लघीयस्त्रय, न्यायविनिश्चय, सिद्धिविनिश्चय, प्रमाणसंग्रह, स्वरूपसंबोधन, वृहतत्रय, न्यायचूलिका, अकलंकस्त्रोत्र, अकलंक प्रायश्चित, व अकलंकप्रतिष्ठापाठ इत्यादी त्यांची स्वतन्त्र ग्रंथरचना आहे अर्थात यातील काही ग्रंथ अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मात्र त्यांचीही महानग्रंथरचना इतर साहित्यकाराना अत्यंत उपयोगी पडली याची प्रचीती वरचेवर येतें प्रस्तुत ठिकाणी आ० भट्टाकलक यांच्या 'तत्त्वार्थराजवार्तिक' या महान व प्रसिद्ध ग्रंथांचा थोडक्यान परिचय करुन देण्याचा प्रयत्न केला आहे ।
'तत्वार्थ राजवार्तिक' ही उमास्वातींनी लिहिलेल्या तत्वार्थसूत्रावरील टीका आहे या ग्रंथातील महानता व गंभीरता या दोन गुणामुले या ग्रंथाला 'तत्वार्थराज' या आदरणीय नावाने संबोधिले आहे उमास्वातींचा 'तत्वार्थ सूत्र' हा ग्रन्थ १० अध्यायात विभागला असून राजवर्तिकात देखील तो दहा अध्यायात विभागला आहे या ग्रन्थाची शैली अतिप्रौढ़ आणि गहन अशी आहे या ग्रंथाद्वारे आ० अकलंक दार्शनिक, सैद्धातिक, व महाव्याकरणकार या तीन स्वरूपात प्रकट झालेले आहेत त्यांचे सर्वांगीण पांडित्य मात्र ग्रंथावरून प्रकट झालेले दिसते या ग्रंथाची विशेषता म्हणजे जैनदर्शनाचा प्राण असलेल्या अनेकांतवादाला या ग्रंथात अधिक व्यापक स्वरूप दिले आहे जैनेतर सर्व वादांचे निराकरण प्रस्तुत ग्रंथात कोले आहे त्यांच्या प्रत्येक सूत्राच्या कारकानशैलीतून दार्शनिक दृष्टिकोन प्रकट झालेला दिसतो मा ग्रंथातील प्रथम अध्यायात सांख्य, वैशेषिक आणि बौद्ध यांच्या मोक्षाचे विवेचन केले असून, दुसऱ्या अध्यायाच्या दरम्यान
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ
२१३
CIAN
शरीराचे तुलनात्मक विवेचन केले आहे । तिस-या अध्यायात अधोलोक, मध्यलोक यांचे विस्तृत विवेचन केले असून च्यौथ्या अध्यायाच्या दरम्यान स्वर्गलोकाचे पूर्ण विवेचन केले आहे पाचव्या अध्यायात षद्व्यांचे विवेचन केले असून, सहाव्या अध्यायात विविध कर्माच आश्रव व त्यांचा परिणाम सांगितला आहे सातव्या अध्यायात जैनगृहस्थीचा आचार कथन केला असून, आठव्या अध्यायात कर्मसिद्धांत मांडला आहे ६ व्या अध्यायात जैनमुनिआचार कथन केला असून १० का अध्यायात मोक्षाचे विवेचना केले आहे।
अन्य मतांच्या विवेचनासाठी पतंजलीचे महाभाष्य, वैशेषिक सूत्र, न्यायसूत्र, वसुबंधूचा अभिधर्मकोश इत्यादि ग्रंथातील उद्धरणे उधृत केली आहेत।
खरोखर आ० अकलंकांच्या महान साहित्य कृतींचे अंतरंग डोकावून पाहिलेतर त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाची छाप आपल्या मनावर सहज पडते ते तर्कप्रधान व विचारप्रधान असे महान विद्वान असून स्वतः अल्पभाषी व सतत विचार जागृती बालगणारे महान आचार्य होऊन गेले ।
__ आचार्य नेमिचंद्र व गोम्मटसार आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती हे वि० संवत ११ व्या शातकात होऊन गेले, जैन सिद्धांत साहित्याचे ते एक महान पंडित होते । त्यांना 'सिद्धांत चक्रवर्ती' ही महान पदवी प्राप्त झाली होती । ते नंदिसंघ देशीय गाणचे आचार्य असून राजा श्री राजमल्लदेव, चामुडराय, श्री राजाभोज यांचे गुरु होते । यावरूनच ते गंगवंशीम राजा मारसिंह व चामुडराय यांच्चा कालात होऊन गेले असावेत । गंगवंशीयांचा राज्यकाल म्हणजे जैनधर्माच्या दृष्टीने तो एक सुवर्णकाल मानला जातो । कारण जैन धर्माला या गंगवंशीय
बराच राजाश्रम दिन होता । नेमिचंद्रांच्चा विद्वत्तेला अशा राजांची साथ मिलाली असेल हे सहजशक्य आहे । ते एक चतुर विद्वान व सिद्धांत साहित्यातील प्रकांड पंडित होऊन गले। ते स्वतःहविषयी लिहितात
जइ चक्केण य चक्की छह खंड साहियं अविग्घेण।।
तह मइचक्केण मया छह खंडं साहियं सम्मं ॥ ३६७ (गो० क०) अर्थात 'ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट आपल्या चक्ररूपी अस्त्राने भरताच्या सहा खंडांना स्ववश करतो, त्याप्रमाणे मी (नेमिचंद्राने) आपल्या बुद्धिरूपी चक्राने आद्य सिद्धांत साहित्याचे सहा खंड म्हणजे षट-खंड-आगमाची साधना केली।'
आनेमिचंद्राच्चा गुरु-शिष्य परंपरेविषयी आपणाला त्यांच्या 'त्रिलोकसार' ग्रंथातुन माहिती मिलते। नेमिचंद्रांनी अभयनंदीलाच आपले परमगुरु मानले असून वीरनंदि, इंद्रनंदि यांना ज्येष्ठबंधवत् नमस्कार केला आहे । कनकनंदीला देखील त्यांनी आपले गुरु मानले आहे । ही गोष्ट त्यांच्चा कालनिर्णयावरून देखील स्पष्ट होते । आ० नेमिचंद्राचा काल साधारणपणे ११ व्या शतकाच्या पूर्वार्धातच मानला आहे। आ० नेमिचंद्रांनी राजा मारसिंह व चामुंडराय या महान भक्तांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच ग्रंथरचना केली आहे । एवढेच नव्हे तर चामुंडराय राजाच्या निमित्तानेच त्यांनी 'गोम्मटसार' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली आहे।
AUR
प
AMRAAAAAAAANI.AAIABAD
श्रीआनन्द अन्य श्रीआनन्द अन्य
mywar
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
وعقعقعة
مع مرمت ورد ورود به معترفع وتمتعهعهعهعععاع عقد من معه مو مریمرغيفقعوا دردی کے مرهقرعید معرفیع عرقعا
२१४
इतिहास और संस्कृति
आ० नेमिचंद्र सिद्धांतिदेव व आ० नेमिचंद्र सिद्धांत चक्रवती हे दोन्ही आचार्य भिन्न भिन्न असावेत की एकच असावेत याविषयी विद्वानांच्यात अजन मतभेद आहेत .आ० नेमिचंद्र सिद्धांतिदेव यांनी 'बहद द्रव्यसंग्रह' या ग्रंथाची रचना केल्याचे मानले जाते तर, आ० सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्रांनी 'गोम्मटसार' ग्रंथाची रचना केल्याचे मानले आहे । या दोन्ही आचार्याची माहिती आपणाला पं० जुगलकिशोर मुख्तार यांच्या पुरातन वाक्य सूची मध्ये, बृहदद्रव्यसंग्रह लेखक अजितकुमार जैन यांच्या प्रस्तावनेत, सन्मतिज्ञानप्रसारक मंडल सोलापूर संपादित द्रव्यसंग्रह, व भारतीय ज्ञानपीठ द्वारा प्रकाशित 'जैनेन्द्र सिद्धान्त कोश' इत्यादि ग्रंथातून पाहावयास मिलते । आगदी आलिकडे प्रसिद्ध झालेतया जैनेन्द्र सिद्धान्त कोश ग्रंथात हे दोन्ही ग्रंथ एकाच नेमिचंद्र आचार्याचे मानले आहेत (प्र० खंड पृ० नं०६२३) । या दोन ग्रंथकर्त्या विषयी विशेष सखोल विचार करणे येथे शक्य नाही।
आ० नेमिचद्रांनी विपुल ग्रंथरचना केली नसलीतरी, जी ग्रंथरचना केली आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे । त्यांच्या ग्रंथाच्या शैलीविरुनच त्यांची अगाध विद्वत्ता सहजपणे आपणाला दिसून येते। जैन सिद्धांतशास्त्रावर गाढ प्रभुत्व असलेते नेमिचंद्राचार्यासारखे आचार्य अगदी अल्पच दिसून येतात । सिद्धांतशास्त्रावर त्यांनी आपली रचना अगदी अधिकार वाणीने केली आहे । त्यांची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे मानण्यात आली आहे । १. गोम्मटसार २. लब्धिसार ३. क्षपणसार ४. त्रिलोकसार इ।
प्रस्तुत ठिकाणी आ० नेमिचंद्रांच्या 'गोम्मटसार' या प्रसिद्ध ग्रंथाविषयी संक्षिप्त व महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे।
गोम्मटसार' या ग्रंथनिर्मितीविषयी एक कथा सांगितली जाते। आचार्य श्री सिद्धांत चक्रवर्ती एकदा सिद्धांत ग्रंथाचा स्वाध्याय करीत असताना, चामुडराय यांनी पाहिले । व त्यांच्या दर्शनास गेले तेव्हा आचार्यश्रीनी चटकन शास्त्रवाचन बंद केले । चामुंडरायांनी कारण विचारताय ते म्हणाले, 'श्रावकांनी सिद्धांत ग्रंथ वाचू नयेत । असे शास्त्र आहे । त्यातील गूढाशयाचे नीट आकलन न झाल्यास काही विपरीत घटना घडण्याची शक्यता असते ।' पण तत्वजिज्ञासू चामुंडरायाने पुनःपुनः विनवणी केल्यावर, त्यांनी श्रावकांच्या स्वाध्यायाला योग्य होईल अशा त-हेने 'पंचसंग्रह' या ग्रंथाची रचना केली । नेमिचंद्रांनी आपल्या या तत्त्वजिज्ञासू व महान धर्मप्रभावक शिषयाच्या गौरवार्थ या ग्रंथाला 'गोम्मटसार' असे नाव दिले ।' शिवाय ग्रंथकर्ता गोम्मटदेवतेचे भक्त होते आणि गोम्मट राजा आचार्या चा भक्त होता ।
'गोम्मटसार' ग्रंथाचे जीवकांड व कर्मकांड असे दोन विभाग आहेत । सिद्धांतशास्त्रातील विस्तृत विषयांचे विवेचन या ग्रंथात संक्षिप्त रूपाने घेतले आहे । महाकर्मप्राभूत सिद्धांतातील जीवट्ठाण, खुद्दाबध, बंधस्वामी, वेदनाखंड, वर्गणाखंड, या पाच महान सिद्धांत शास्त्रातील विषयांचे संक्षिप्त संकलन या 'गोम्मटसार' ग्रंथात केले आहे । यामुलेच या ग्रंथाचे दुसरे नाव 'पचसंग्रह' असेही दिले आहे।
'गोम्मटसार' ग्रंथातील जीवकांडात संसारी जीवांच्या कर्माच्या कमी अधिक आवरणाप्रमाणे होणा-या विविध अवस्थांचे वर्णन केले आहे । गति, जाति, पर्याप्ति, कषाय, लेश्या, वेद इत्यादि चौदा मार्गणाद्वारे कर्माधीन जीवांच्या विविध उच्च नीच अवस्थांचे वर्णन या भागात केले आहे ।
'कर्मकांड' विभागात अष्ट प्रकारची कर्म, कर्माचे स्वरूप, कर्माचा स्थितिकाल, कर्माची फलदायक
GION
MPA
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २१५
शक्ती, कर्मपरमाणूची संख्या इ० जडकर्माच्या अवस्थांचे वर्णन केले आहे । थोडक्यात या ग्रंथात जीवा - त्म्याचे मूलस्वरूप, या जीवात्म्याच्या कर्मजन्य विविध संसारी अवस्था, जीवात्म्याचे अंतिम ध्येय, त्या ध्येयमार्गात येणारे भावकर्मरूपी अनेक अडथले, ते कसे टालावेत यांचे मार्गदर्शन अत्यंत व्यवस्थितरीत्या केले आहे । हा ग्रंथ अत्यंत उपयोगी असून नित्य स्वाध्याय करण्यास योग्य आहे । या ग्रंथावर चार टीका लिहिल्या गेल्या आहेत । १. चामुंडरायकृत पंजिकास्वरूप कन्नड भाषेतील टीका । २. अभयचद्र सैद्धांतीकृत टीका ३. केशववर्णीकृत कन्नड टीका ४. ज्ञानभूषण नेमिचंद्राचार्याकृत जीवतत्त्वप्रदीपिका ।
सिद्धातशास्त्राचे निरूपण करणारे आ० नेमिचंद्र सिद्धांतचक्रवर्ती एक महान आचार्य होऊन गेले । त्यांनी 'गोम्मटसार' सारख्या ग्रंथाची रचना करून मुमुर लोकावर महान उपकार केले आहेत । आ० हेमचंद्र व सिद्धहेमशब्दानुशासन
आ० हेमचंद्र ११ व्या शतकातील एक महान विद्वान होऊन गेले । ते श्वेतांबर परंपरेतील एक अनन्यसाधारण विद्वान मानले जातात । त्यांना तत्कालीन 'ज्ञानदीप' असे मानले जाते । भारतीय जैनसाहित्याच्या प्रांगणात सर्वश्रेष्ठ विभूतींच्या मध्ये आ० हेमचंद्र ही एक दिव्य, अलौकिक व महान विभूती होऊन गेली । त्यांची महान बुद्धी, अलौकिक प्रतिभा, गंभीर ज्ञान या गोष्टींच्याविषयी अनुमान करणे, सर्वसाधारण माणसाला अत्यंत कठीण आहे । त्यांनी आपल्या महान मंगलमय ग्रंथरचनेने विद्वानांन मोहवून टाकले आहे । भ० महावीर स्वामींच्या गूढ सिद्धांताचे स्पष्टीकरण सर्वसामान्यासाठी सुलभ करुन देण्याचे महान कार्य त्यांनी केले |
आ० हेमचंद्रांचा जन्म गुजराथमधील धुंधका गावी सन १०८८ मध्ये झाला । त्यांच्या पित्याचे नाव चाचादेव व मातेचे नाव पाहिनीदेवी होते । ते जातीने मोढ महाजन असून त्यांचे जन्मनाव चंगदेव असे होते । बालवयातच त्यांची चाणाक्ष बुद्धि पाहून देवेंद्रसूरिंनी त्यांना जैनधर्माची दीक्षा दिले | देवेंद्रमूरच्या सानिध्यात असतानाच त्यांनी तत्त्वज्ञान, न्याय, काव्य, तर्क, लक्षण व आगम साहित्य याचे सखोल ज्ञान मिलविले ।
सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदू शकत नाहीत असे म्हणतात, परंतु हेमचंद्राच्या बाबतीत हे विपरीत घडल्याचे दिसते । त्यांच्या जिव्हेवर तर सरस्वती जणू नाचत होती; आणि शिवाय तिल लक्ष्मीची साथ म्हणून की काय त्यांना चालुक्यवंशी सिद्धराज जयसिंहाचा राजाश्रय मिलाला होता राजा जयसिंहाला व्याकरणाची फार आवड होती । राजाने हेमचंद्रांना व्याकरण लिहित्याविशयी विनती केली । हेमचंद्रांनी एका महान व्याकरण ग्रंथाची रचना केली । ती पाहून राजाला अत्यानंद झाला । हेमचंद्राच्या उपदेशावरून राजाच्या मनात जैनधर्माविषयी प्रीती उत्पन्न झाली व त्याने त्याच नगरात विशाल जिनमंदिरे उभारली । त्याने आ० हेमचंद्रांना आपले राजगुरु, धर्म-गुरु व दीक्षागुरु मानले । व जैनधर्मतत्त्वांच्या प्रसाराला सुरुवात केले ।
आ० हेमचंद्रांची ग्रंथरचना विशाल आणि समृद्ध आहे । त्यांनी आपल्या प्रतिमेचे वैभव दाखविले नाही असा साहित्याचा एकही विभाग आपणाला दाखविता येणार नाही । न्याय, व्याकरण, काव्य, कोश, छंद, रस, अलंकार नीती, योग, मंत्र, कथा, चरित्र इ० लौककि, अध्यात्मिक दार्शनिक इ० विविध विष
आर्य श्री आनन्द
आचार्य प्रव26
ग्रन्थ
JO
LUNDLE
ग्रन्थ
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
K
देव आनन्द अन्थ
अभिनन्दन
STGS
२१६
इतिहास और संस्कृति
यांवर हेमचंद्रांचे ज्ञानाने परिपूर्ण असे महान ग्रंथ आहेत । त्यांनी आपल्या बहुमोल जीवनात साढ़े तीन कोटी श्लोकांची रचना केली असल्याचे मानले जाते । त्यांची विविध ग्रंथरचना पुढीलप्रमाणे आहे ।
AAAAAAAA
१. सिद्धहेमशब्दानुशासन । २• द्वयाश्रय महाकाव्य । ३. अभिधान चिंतामणि, अनेकार्थसंग्रह, देशीनाममाला, निघंटुशेष (कोष साहित्य), ४. काव्यानुशासन, ५. छंदोनुशासन ६. प्रमाणमीमांसा, अन्ययोगव्यवच्छेदिका, अयोगव्यवच्छेदिका (न्यायाविषयक) ७. योगशास्त्र ( शास्त्रविययक ), 5. वीतरागस्त्रोत्र ६. त्रिषष्टिशलाका पुरुषचरित्र ( चरित्र साहित्य) इ । आ० हेमचंद्राच्या सर्व ग्रंथांची माहिती देणे शक्य नाहीं । येथे फक्त त्यांच्या 'सिद्ध हेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देण्यात येत आहे
आ० हेमचंद्र एकदा विहार करीत असताना, अणहिल्लपुर पाटण नगरात येऊन पोहचले । तेथे चालुक्यवंशी सिद्धराज जयसिंह राजाचा त्यांना राजाश्रम मिलाला । या राजाला व्याकरणाची फार आवड होती । व या राजाच्या विनंतीनुसारच आ० हेमचंद्र यांनी 'सिद्ध हेमशब्दानुशासन' या महान व्याकरण ग्रंथाची रचना केली ती पाहून राजाला अत्यानंद झाला मा व्यावरण ग्रंथाची हत्तीवरून मिखणूक काढली व पुढे त्याच राजाच्या मनात जैनधर्माविषयी श्रद्धा उत्पन्न झाले ।
'सिद्ध हेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथात एकूण ८ अध्याय असून त्यातील पहिले ७ अध्याय संस्कृत भाषेच्या व्याकरणाविषयी आहेत । शेवटचा अध्याय प्राकृत भाषेच्या व्याकरणाबाबत आहे । या अध्यायात हेमचंद्रांनी महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, चूलिका पेंशाची, अपभ्रंश या भाषाच्या व्याकरणाची माहिती दिली आहे । त्यांचे व्याकरण विस्तृत व प्रमाणभूत आहे । आठव्या अध्यायाचे त्यांनी चार पाद केले असून 'चौल पादात अपभ्रंश भाषेची लक्षणे सांगितली आहेत । खरोखरच 'सिद्ध हेमशब्दानुशासन' हा व्याकरण ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण असून, हेमचंद्रांच्या उत्तरावर्ती व्याकरणकारांना तो अत्यंत उपयोगी पडला अनेक ग्रंथातुन प्रस्तुत ग्रंथाचा उल्लेख कलेला आपणाला दिसून येतो ।
आ० हेमचंद्रांची लेखणी जैनसाहित्याच्या प्रत्येक साहित्याशी निगडति आहे । त्यांचे दूरदर्शिता व व्यवहारदक्षता इ० गुण पाहूनच विद्वानांनी त्यांना 'कलिकालसर्वज्ञ' या उपाधीने विभूषित केले आहे । तर पीटर्सन सारख्या पाश्चात्य विद्वानांनी त्यांना "Ocean of knowledge'' अर्थात 'ज्ञानमहासागर' या सार्थ उपाधीने भूषविले आहे । आ । हेमचंद्रांची विषय वर्णन शैली सुस्पष्ट, प्रसादगुणांनी युक्त व हृदयस्पर्शी आहे | वाचकांना आपल्या ग्रंथरचनेतील शैलीने मंत्रमुग्ध करून टाकण्याची एक वेगलीच कला आहे । त्यांच्या प्रकांड पांडित्यामुलेच त्यांचे तत्कालीन विद्वानात अत्यंत मानाचे स्थान होते । साधारणपणे महान प्रतापी राजा विक्रमादित्याच्या राजदरबारात महाकवी कालिदासाचे, गुणज्ञ राजा हर्षाच्या शासन कालात जे स्थान लेखक पंडित प्रवर बाणभट्टाचे, स्थान होते तसेच राजा सिद्धराज जयसिंहाच्या राजदरबारात आ० हेमचंद्राचे स्थान होते । अर्थात यावरूनच आ० हेमचंद्र हे सर्व कलागुणसंपन्न एक महान आचार्य होऊन गेले हे स्पष्ट होते ।
'जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रंथ' या नावाखाली लिहिलेल्या या लेखामध्ये उल्लेखिलेले, आ० उमास्वाति, आ । हरिभद्रसूरि आ० भट्टाकजंक, आ० नेमिचंद्र व आ हेमचंद्र या पाचही आचार्यांचे जैनधर्मात अतिशय महत्त्वपूर्ण व उच्च असे स्थान आहे ।
या महान आचार्यांनी
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________ / जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ 217 अत्यंत प्रभावशाली अशी ग्रंथरचना करून जैनसाहित्याला समृद्ध केले आहे / या आचार्यांच्या ग्रंथरचनेला विशेष म्हणजे दिगबर-श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे। थोड़ा फार फरक असेल तर तो दुर्लक्ष करण्यासारखा आहे / जैन साहित्यातील आचार्य परंपरा महान आहे। अनेक आचार्यांनी जैन धर्म वृद्धीसाठी आपले सर्वस्व जीवन झिजविले आहे। आणि त्यांचेच अनंत उपकार म्हणूनच की काय आजचा जैनधर्म विषयाचा अभ्यास करणारा अभ्यासू त्यांच्या ग्रंथरूपी गंगोत्री मध्ये स्वछंदपणे डुबत अस ना दिसतो आहे। संक्षिप्त स्वरूपात माहिती दिलेल्या बरील पाच जैनाचार्या पैकी आ०. उमास्वाती हे जैनसिद्धांत शास्त्रात, आ० हरिभद्रसूरि जैन दार्शनिक शास्त्रात, आ० भट्टाकलंक जैन न्यायशास्त्रात, आ० नेमिचंद्र जैनभूगोल व सिद्धांतशास्त्रात, तर आ० हेमचंद्र व्याकरण, न्याय इ० साहित्यातील सर्व क्षेत्रात निपुण होते / या सर्व आचार्यांची ग्रंथरचना म्हणजे जैनसाहित्यातील महान संपत्तीच होय / या ग्रंथ आजच्या विद्वानांनी चिकित्सक रसिकतेने अवलोकन करून, त्यांचे विचार पारखून व समजाऊन घेऊन ते नव्या तुलनात्मक दृष्टिने पुनः समाजपुढे ठेवणे अत्यावश्यक आहे। त्यामुले जैन समाजाच्या सांस्कृतिक व धार्मिक उन्नतीचा मुख्य हेतू सफल होण्यास बरीचशी मदत होईल, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही। संदर्भ ग्रंथाची यादी 1. जैन साहित्य और इतिहास पर विशद प्रकाश-पं० जुगलकिशोर मुख्तार। . .. 2. प्राकृत साहित्य का इतिहास-जगदीशचंद्र जैन / 3. जैन लक्षणावली-सं० बालचद्र सिद्धांतशास्त्री (प्रथमभाग) 4. जैनेन्द्र सिद्धान्त कोश-भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन प्रथम भाग। 5. जैनधर्म-जीवराज जैन ग्रंथमाला सोलपूर / 6. जैन साहित्य और इतिहास-नाथूराम प्रेमी। 7. तत्वार्थसूत्र-पं सुखलालजी। 8. समदशी आचार्य हरिभद्र-प्र० राजस्थानी पुरातन ग्रंथमाला। 6. न्यायकुमुदचंद्र-पं० महेद्रकुमार न्यायशास्त्री / 10. गोम्मटसार-प्र० श्रीमद् राजचंद्र जैन शास्त्रमाला / 11. द्रव्यसंग्रह-जीवराज जैन ग्रंथमाला सोलापूर / 12. अपभ्रंश साहित्य-पं० गुलेरी शर्मा / 13. सिद्धहेमानुशासन-प्यारचदंजी / ADMAASALAAAA A AAAAAAAAAAAAADAmrawasana w AGARMASALAIJAanarasRNAMANABAJARAJEmadarsaiduowwe आचार्यप्रवास श्रीआनन्थ भिआपाप्रता श्राआनन्द-न्य womenimammmmamyanmmmnanimarinawimmamimmeoneinwimmirmwine