________________
आचार्य प्र० ग्रन्थ
漫
डॉ.
漫
आआनन्दा ग्रन्थ
२१२
इतिहास और संस्कृति
दोघा भावांनी परदेशगमन केल्याची व खूप कष्ट सोसल्याची माहिती कथाकोशात व इतर काही ग्रंथातून मिलते |
आ० भट्टाकलंकांचे स्मरण अनेक ग्रंथकारांनी त्यांच्या ग्रंथातून केलेले दिसते. महाकवि वादिराजसूरीने पार्श्वनाथचरितात, त्यांचा उल्लेख केला असून, पांडवपुराण व महापुराण या ग्रंथातूनही त्यांचा उल्लेख आढलतो. त्यांना अनेक विद्वानांनी विविध विशेषणांनी देखील विभूषित केले. आहे महाकवि वादिराजाने 'तार्किकलोक मस्तकर्माणि,' प्रभाचंद्राने 'इतरमतावलम्बीवादिरूप', लघुसमंतभद्रांनी 'सकलता - किकचूडामणिमारीचिमेचकितचरणनखकिरणो भगवान भट्टाकलंकदेवः' देवसुरिनी 'प्रकटिततीर्थान्तरीम कलङ्कोऽकलङ्गः' मर पध्नप्रभमलधारिदेवाने 'तर्काब्जार्क' (तर्करूपी कमलांना विकसित करणारे सूर्य) या विविध विशेषणांनी भूषविले आहे. या त्यांच्या विविध उल्लेखावरूनचते किती गाढे विद्वान असतील याची आपणाल सहज कल्पना येते. अर्थात त्यांनी आपल्या सर्व न्यायग्रंथातून स्वमताचे प्रतिपादन व परमताचे व्यवस्थितरीत्या खंडन केलेले दिसून येते.
आ० भट्टाकलंक यांची अगाध विद्वत्ता, तार्किकता, तथा लेखन शैली इत्यादि विषयी माहिती करुन घ्यावयाची असेलतर त्यांच्चा साहित्यरूपी गंगोत्रीत स्नान करणे तथा निमग्न होणे अत्यावश्यक आहे. त्यांचे लेखन गद्य असो वा पद्य असो ते सूत्रांच्यामाणे अतिसंक्षिप्त असून गहन व अर्थबहुलतेने युक्त आहे. स्वतःहाच्या ग्रंथावर त्योनी स्वत:च भाष्य लिहिले आहे. आ० भट्टाकलंक यांच्या साहित्यावर टीका लिहिणारे स्याद्वादपति विद्यानन्दी व अनंतवीर्य हे दोन महान आचार्य होऊन गेले ।
आ० भट्टाकलंक यानी भाष्य आणि स्वतन्त्र ग्रंथरचना अशा दोन प्रकारे आपले साहित्य लिहिले आहे. भाष्या मध्ये तत्त्वार्थराजवार्तिक व अष्टशती हे दोन प्रमुख ग्रंथ होत त्याशिवाय लघीयस्त्रय, न्यायविनिश्चय, सिद्धिविनिश्चय, प्रमाणसंग्रह, स्वरूपसंबोधन, वृहतत्रय, न्यायचूलिका, अकलंकस्त्रोत्र, अकलंक प्रायश्चित, व अकलंकप्रतिष्ठापाठ इत्यादी त्यांची स्वतन्त्र ग्रंथरचना आहे अर्थात यातील काही ग्रंथ अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मात्र त्यांचीही महानग्रंथरचना इतर साहित्यकाराना अत्यंत उपयोगी पडली याची प्रचीती वरचेवर येतें प्रस्तुत ठिकाणी आ० भट्टाकलक यांच्या 'तत्त्वार्थराजवार्तिक' या महान व प्रसिद्ध ग्रंथांचा थोडक्यान परिचय करुन देण्याचा प्रयत्न केला आहे ।
'तत्वार्थ राजवार्तिक' ही उमास्वातींनी लिहिलेल्या तत्वार्थसूत्रावरील टीका आहे या ग्रंथातील महानता व गंभीरता या दोन गुणामुले या ग्रंथाला 'तत्वार्थराज' या आदरणीय नावाने संबोधिले आहे उमास्वातींचा 'तत्वार्थ सूत्र' हा ग्रन्थ १० अध्यायात विभागला असून राजवर्तिकात देखील तो दहा अध्यायात विभागला आहे या ग्रन्थाची शैली अतिप्रौढ़ आणि गहन अशी आहे या ग्रंथाद्वारे आ० अकलंक दार्शनिक, सैद्धातिक, व महाव्याकरणकार या तीन स्वरूपात प्रकट झालेले आहेत त्यांचे सर्वांगीण पांडित्य मात्र ग्रंथावरून प्रकट झालेले दिसते या ग्रंथाची विशेषता म्हणजे जैनदर्शनाचा प्राण असलेल्या अनेकांतवादाला या ग्रंथात अधिक व्यापक स्वरूप दिले आहे जैनेतर सर्व वादांचे निराकरण प्रस्तुत ग्रंथात कोले आहे त्यांच्या प्रत्येक सूत्राच्या कारकानशैलीतून दार्शनिक दृष्टिकोन प्रकट झालेला दिसतो मा ग्रंथातील प्रथम अध्यायात सांख्य, वैशेषिक आणि बौद्ध यांच्या मोक्षाचे विवेचन केले असून, दुसऱ्या अध्यायाच्या दरम्यान
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org