________________
K
देव आनन्द अन्थ
अभिनन्दन
STGS
२१६
इतिहास और संस्कृति
यांवर हेमचंद्रांचे ज्ञानाने परिपूर्ण असे महान ग्रंथ आहेत । त्यांनी आपल्या बहुमोल जीवनात साढ़े तीन कोटी श्लोकांची रचना केली असल्याचे मानले जाते । त्यांची विविध ग्रंथरचना पुढीलप्रमाणे आहे ।
AAAAAAAA
१. सिद्धहेमशब्दानुशासन । २• द्वयाश्रय महाकाव्य । ३. अभिधान चिंतामणि, अनेकार्थसंग्रह, देशीनाममाला, निघंटुशेष (कोष साहित्य), ४. काव्यानुशासन, ५. छंदोनुशासन ६. प्रमाणमीमांसा, अन्ययोगव्यवच्छेदिका, अयोगव्यवच्छेदिका (न्यायाविषयक) ७. योगशास्त्र ( शास्त्रविययक ), 5. वीतरागस्त्रोत्र ६. त्रिषष्टिशलाका पुरुषचरित्र ( चरित्र साहित्य) इ । आ० हेमचंद्राच्या सर्व ग्रंथांची माहिती देणे शक्य नाहीं । येथे फक्त त्यांच्या 'सिद्ध हेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देण्यात येत आहे
आ० हेमचंद्र एकदा विहार करीत असताना, अणहिल्लपुर पाटण नगरात येऊन पोहचले । तेथे चालुक्यवंशी सिद्धराज जयसिंह राजाचा त्यांना राजाश्रम मिलाला । या राजाला व्याकरणाची फार आवड होती । व या राजाच्या विनंतीनुसारच आ० हेमचंद्र यांनी 'सिद्ध हेमशब्दानुशासन' या महान व्याकरण ग्रंथाची रचना केली ती पाहून राजाला अत्यानंद झाला मा व्यावरण ग्रंथाची हत्तीवरून मिखणूक काढली व पुढे त्याच राजाच्या मनात जैनधर्माविषयी श्रद्धा उत्पन्न झाले ।
'सिद्ध हेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथात एकूण ८ अध्याय असून त्यातील पहिले ७ अध्याय संस्कृत भाषेच्या व्याकरणाविषयी आहेत । शेवटचा अध्याय प्राकृत भाषेच्या व्याकरणाबाबत आहे । या अध्यायात हेमचंद्रांनी महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, चूलिका पेंशाची, अपभ्रंश या भाषाच्या व्याकरणाची माहिती दिली आहे । त्यांचे व्याकरण विस्तृत व प्रमाणभूत आहे । आठव्या अध्यायाचे त्यांनी चार पाद केले असून 'चौल पादात अपभ्रंश भाषेची लक्षणे सांगितली आहेत । खरोखरच 'सिद्ध हेमशब्दानुशासन' हा व्याकरण ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण असून, हेमचंद्रांच्या उत्तरावर्ती व्याकरणकारांना तो अत्यंत उपयोगी पडला अनेक ग्रंथातुन प्रस्तुत ग्रंथाचा उल्लेख कलेला आपणाला दिसून येतो ।
Jain Education International
आ० हेमचंद्रांची लेखणी जैनसाहित्याच्या प्रत्येक साहित्याशी निगडति आहे । त्यांचे दूरदर्शिता व व्यवहारदक्षता इ० गुण पाहूनच विद्वानांनी त्यांना 'कलिकालसर्वज्ञ' या उपाधीने विभूषित केले आहे । तर पीटर्सन सारख्या पाश्चात्य विद्वानांनी त्यांना "Ocean of knowledge'' अर्थात 'ज्ञानमहासागर' या सार्थ उपाधीने भूषविले आहे । आ । हेमचंद्रांची विषय वर्णन शैली सुस्पष्ट, प्रसादगुणांनी युक्त व हृदयस्पर्शी आहे | वाचकांना आपल्या ग्रंथरचनेतील शैलीने मंत्रमुग्ध करून टाकण्याची एक वेगलीच कला आहे । त्यांच्या प्रकांड पांडित्यामुलेच त्यांचे तत्कालीन विद्वानात अत्यंत मानाचे स्थान होते । साधारणपणे महान प्रतापी राजा विक्रमादित्याच्या राजदरबारात महाकवी कालिदासाचे, गुणज्ञ राजा हर्षाच्या शासन कालात जे स्थान लेखक पंडित प्रवर बाणभट्टाचे, स्थान होते तसेच राजा सिद्धराज जयसिंहाच्या राजदरबारात आ० हेमचंद्राचे स्थान होते । अर्थात यावरूनच आ० हेमचंद्र हे सर्व कलागुणसंपन्न एक महान आचार्य होऊन गेले हे स्पष्ट होते ।
'जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रंथ' या नावाखाली लिहिलेल्या या लेखामध्ये उल्लेखिलेले, आ० उमास्वाति, आ । हरिभद्रसूरि आ० भट्टाकजंक, आ० नेमिचंद्र व आ हेमचंद्र या पाचही आचार्यांचे जैनधर्मात अतिशय महत्त्वपूर्ण व उच्च असे स्थान आहे ।
या महान आचार्यांनी
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org