Book Title: Jain Sahityatil kahi pramukh Acharya va tyanche pramukh granth Author(s): A S More Publisher: Z_Anandrushi_Abhinandan_Granth_012013.pdf View full book textPage 2
________________ aouadarasinawwantarAJAJMEASABoaawanSADARADARMAdewasiaNASANNADASE wwwmarwareneurs आचार्यप्रवभिनयआचार्यप्रवरात्री Minocommmmmmm mmmmmmmmmms २०८ इतिहास और संस्कृति जगाला प्रत्यक्ष जाणतात व पाहतात । त्याचप्रमाण श्रुतकेवलीही शास्त्रात कथन केलेला प्रत्येक विषय श्र तज्ञानाने स्पष्टपणे जाणत । भ० महावीरांच्या निर्वाणानंतर तीन केवलज्ञानी व पाच श्रुतकेवली झाले । त्यातील भद्रबाह हे शेवटचे श्रुतकेवली होते । पुढे दुष्काल व इतर काही आपत्तीमुले साधूचारात बरीचशी शिथिलता आली । भद्रबाहूच्या गैरहजेरीत जे साहित्य लिहिले गेले ते एकपक्षी होते । त्यांना इतरांनी मान्यता दिली नाही व यामुलेच जैनधर्माचे श्वेतांबर व दिगंबर हे दोन संप्रदाय निर्माण झाले । प्रस्तुत लेखामध्ये श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायातील अगदी प्रमुख पाच आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ यांचा आढाबा घेण्यात आला आहे । यातील बहुतेक आचार्यांना दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे । ते आचार्य पुढील प्रमाणे १. आ० उमास्वाति, २. आ० हरिभद्रसुरि, ३. भट्टाकलंक, ४. आ० नेमिचंद्र, ५. आ० हेमचंद्र । आचार्य उमास्वाति व तत्वार्थसूत्र आ० उमास्वाति हे विक्रम सं तिसरया शतकात होऊन गेले । ते कूदकुंदाचे पट्टशिष्य असून त्यांनी जैन सिद्धांत संस्कृत साहित्यात निबद्ध करून 'तत्वार्थसूत्र' नामक महान ग्रंथाची रचना केली। श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची या आचार्यांना मान्यता आहे । दिगंबर परंपरेत त्यांना 'उमास्वामी' म्हटले असून, श्वेताबर परंपरेत त्यांना 'उमास्वाती' असे म्हटले आहे । या आचार्यांनी कमीत कमी लिहन जास्तीजास्त प्रसिद्धि मिलविली आहे। आ० उमास्वातीचा परिचय आपणाला श्वेतांबरी तत्त्वार्थाधिगम' या ग्रंथात मिलतो। त्यांचा जन्म न्यग्रोधिका नामक नगरीत झाला असून त्यांच्या पित्याचे नाव स्वाति आणि मातेचे नाव वात्सी असे होते । गोत्राने ते कौभिषिणी होते । त्यांना गृध्रपिच्छाचार्य या नावाने देखील संबोधिले जाते। गावोगाव विहार करीत असताना ते एकदा कुसुमपूर नगरात आले । तेथे तुच्छ शास्त्रामुले हतबुद्धि झालेल्या लोकांच्या विषयी अनकंपा निर्माण होऊन व त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता तत्वार्थसूत्राची रचना केली असावी, अशी एक कथा दिली जाते । तर सिद्धय नावाच्या विद्वानाला मोक्षाचे स्वरूप समजावून देण्यासाठी तत्वार्थसूत्र या ग्रंथाची रचना केली असावी, अशी दुसरी कथा सांगितली जाते अर्थात संस्कृतमध्ये सूत्ररचना करणारे हे प्रथम जैन आचार्य मानले जातात । शेकडो ग्रंथांचा सार काढून आ० उमास्वातीनी 'तत्वार्थसूत्र' या महान ग्रंथाची रचना केली। या ग्रंथाला दूसरे नाव 'मोक्षशास्त्र' असेही दिले आहे । वैदिक दर्शनात जे महत्व गीतेस, मुस्लिम धर्मात जे महत्व कुराणास, ख्रिस्ती लोकांत जे महत्व बायबल या ग्रंथास आहे, तच महत्व जैन परंपरेत 'तत्वार्थसूत्र' या ग्रंथास दिले गेले आहे । 'तत्वार्थसूत्र' द्रव्यानयोगातील एक प्रमुख ग्रंथ म्हणून गणला जातो।हा ग्रन्थ एकण दहा अध्यायात विभागला आहे । त्याचे प्रामुख्याने ज्ञानमीमांसा, ज्ञयमीमांसा व चारित्रमीमांसा या तीन भागात विभाजन केले असून, या ग्रंथात जवल जवल एकूण ३५७ इतकी सूत्रसंख्या आहे । 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः' या अतिशय महत्वपूर्ण सूत्राने या ग्रंथाची सरूवात झाली आहे। ज्ञानमीमांसेच्या पहिल्या Jain Education International - For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11