Book Title: Jain Tattvagyanchya Chaukatitun Utkrantivada
Author(s): Kaumudi Baldota
Publisher: Kaumudi Baldota

View full book text
Previous | Next

Page 4
________________ आणि परिग्रह.१७ यातील 'भयसंज्ञा' ही उत्क्रांतिवादातील जीवनकलह अर्थात् जीवनसंघर्षाची प्रतीक मानता येईल. दुःख टाळण्याची आणि अनुकूल ते स्वीकारण्याची सर्व जीवांची प्रवृत्ती आचारांगातील पुढील उद्गारांवरून स्पष्ट होते. “सव्वे पाणा पियाउया सुहसाया दुक्खपडिकूला, अप्पियवहा पियजीविणो जीविउकामा । सव्वेसिं जीवियं प्पिं १८ * उत्क्रांतिवादानुसार, प्राण्यांची आणि वनस्पतींची बाह्य रचना व अवयव वातावरणाच्या गरजेप्रमाणे अवस्थांत करीत करीत, स्थिर होतात. नंतर हे गुणधर्म आनुवंशिकतेच्या मार्गाने पुढील पीढीत संक्रमित होतात. त्यामुळे तो जीवनकलहात टिकाव धरू शकतो. जैन शास्त्रानुसार, जीव हा वेळोवेळी अनेक पर्याय अर्थात अवस्थांतरे धारण करीत असतो. ‘अनुकूल शरीर धारण करणे'- हा जीवाचा पर्याय मानता येईल. नामकर्मानुसार जीवाची योनी, शारीरिक वैशिष्ट्ये ठरत असतात. गोत्रकर्म म्हणजे स्पष्टत: genetic qualities होत." म्हणजे जीव हा त्याच्या कर्मानुसार विशिष्ट योनीत गेल्यानंतर त्या प्रजातीचे जे बाह्य शारीरिक आकार नक्की झालेले असतात त्यानुसारच त्याची शारीरिक वैशिष्ट्ये ठरतात. जीवजातींमध्ये प्रदीर्घ कालावधीत झालेले शारीरिक संरचनात्मक बदल हे फक्त बाह्य आकारात झालेली अवस्थांतरे म्हणजे पर्याय आहेत. त्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म मानले तरीही उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतास कोणतीही बाधा पोहोचत नाही. * उत्क्रांतिवादानुसार, ज्या जीवजाती बलिष्ठ आहेत त्या टिकून राहणार आहेत व ज्या दुर्बल आहेत त्या हळूहळू नामशेष होत जाणार आहेत. म्हणजेच 'survival of the fittest' हा निसर्गाचा नियम आहे. रूढ जैन मान्यतेनुसार जर जीवजातींची संख्या कोणत्याही काळात सुनिश्चित म्हणजे ८४ लाख मानली तर ते उत्क्रांतिवादाशी पूरक ठरत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की जीवयोनींची ८४ लक्ष ही संख्या काळाच्या ओघात टीकाकारांनी केलेली संकल्पनात्मक निर्मिती आहे. अर्धमागधी व शौरसेनी भाषेतील प्राचीनतम जैन ग्रंथांत ८४लक्ष योनींचा निर्देश नाही. याचाच अर्थ असा की, 'survival of the fittest' या सिद्धांताला जैन दृष्ट्या कोणतीच अडचण नाही. अर्थात् ८४ लक्ष योनींचे, एकेंद्रिय ते पंचेंद्रिय जीवजातींमध्ये सूक्ष्मतापूर्वक केलेले विभाजन, हा जैन शास्त्राचा एक लक्षणीय विशेषच मानावा लागेल. * डार्विनच्या मते उत्परिवर्तने जशी प्रगतीला (Progression) साहाय्यक व पोषक ठरतात, तशी काही सदोष उत्परिवर्तने उत्क्रांतीत परागती (Retrogression) करण्यालाही जबाबदार ठरू शकतात. जैन शास्त्रातही कालचक्राचे उत्सर्पिणी व अवसर्पिणी हे टप्पे उत्कर्ष व -हास या दोन्हीही गोष्टींचा निर्देश करतात. प्रगती व ऱ्हासाचे हे कालचक्र निसर्गाचाच एक भाग आहे, हे जैन शास्त्रकारांना जाणवलेले दिसते. * उत्क्रांतिवादाचा सिद्धांत पुढे नेताना लामार्क हा जीववैज्ञानिक म्हणतो की, 'उत्क्रांतीला प्राण्याची संकल्पशक्ती व प्रयत्न हेही जबाबदार असतात. ' प्रत्येक जीव तत्त्वतः अनंतचतुष्टयाने" युक्त असून आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जीवजाती पुरुषार्थ अर्थात् प्रयत्न करीत राहते असा जैन शास्त्राचाही एकंदर अभिप्राय आहे. - * रूढीवादी धार्मिक विचारांचा विरोधी हल्ला परतविताना डार्विन स्पष्ट करतो की, 'जगण्याची क्षमता ही केवळ शारीरिक रीत्या जिवंत राहण्याची क्षमता किंवा पात्रता समजावयास पाहिजे ; तिचा नैतिक पात्रतेशी गोंधळ करता कामा नये. शारीरिक पात्रता आणि नैतिक पात्रता या दोन गोष्टी एकरूप नाहीत. जीवशास्त्रीय अभिकल्प नैतिक

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9