Book Title: Bhattikavyam Author(s): Bhatti Mahakavi Publisher: Pandurang Javaji View full book textPage 7
________________ विशेष-सूचना. १-सदहू ग्रंथ छापण्याची व्यवस्था अशी ठेविली आहे की-विद्यार्थ्यांना पदच्छेद करण्यास सुलभ पडावें ह्मणून संध्यक्षरावर वैदिक खरितस्वराप्रमाणे ।' अशी उभी रेषा दिली आहे; तिचा अर्थ-ज्या अक्षरावर ही ।' उभी रेषा दिली आहे तें अक्षर उभे चिरून त्याचा पूर्वभाग पूर्वपदांत व उत्तरभाग उत्तरपदांत सामील करावा, असे समजावें. जसे प्रथम श्लोकांत 'इत्युदाहृतः' आणि 'पितरमुपागमत्' ह्या दोहोंवर ।' ही रेषा आहे. आतां त्यु-त्य+उ-त्युः मुम्+उ-मु ह्मणजे इत्य् , ( इति ) उदाहृतः पितरम् उपागमत् अशी पदें समजावीत. इ तियाचें इत्य् हे पाणिनीच्या 'इको यणचि' या सूत्राने झाले आहे; ह्याप्रमाणे पदच्छेद दाखवून सामासिक नामांत शब्द-(प्रातिपदिक) छेदही :-' ह्या चिह्नाने दाखविला आहे. आतां जेथे संधीमुळे '_' ह्या चिह्नाने शब्दच्छेद दाखवितां येत नाही, तेथे संध्यक्षराखाली वैदिकानुदात्तखराप्रमाणे '-' अशी आडवी रेषा दिली आहे. ह्मणजे तीच शब्दच्छेदरेषा खाली ओढली आहे. जसें ३ श्लोकांत (सर्वेषु-भृताम् ) वे यांत व+इ-, झणजे सर्व-इषु-भृताम् असें जाणावें. येथे सर्व+इषु सर्वेषु हे पाणिनीच्या 'आद्गुणः' या सूत्राने झाले आहे असे समजावें. स्वल्पविराम चिहाचा उपयोग करून वाक्येही निरनिराळी तोडून दाखविली आहेत. ह्याप्रमाणे मूळ ग्रंथाला बाध न येतां वाक्य-पदशब्दच्छेद दर्शविला. परंतु कित्येक स्थली 'अभून् नृपः' (श्लोक ११). 'स्त्रीभिर् युतानि' (श्लो० ७), 'ज्ञाताऽऽ शयस् तस्य' (श्लोक ११). असा पदच्छेद दाखविला आहे. त्या स्थळी 'अभून्नृपो,' 'स्त्रीभिर्युतानि,' 'ज्ञाताशयस्तस्य' असेंच पाठकालीं ह्मणावें. पदच्छेदबोधापेक्षां संयुक्त पाठ दुर्बोध नाही. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Suratwww.umaragyanbhandar.comPage Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 ... 514