Book Title: Abhidhana Sangraha Part 02
Author(s): Sivdatta Pandit, Kashinath Pandurang
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 312
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अभिधानसंग्रह | प्राचीन संस्कृत ग्रन्थांचा जीर्णोद्धार करण्याचे काम सांप्रत चोहोंकडे मोठ्या सपाठ्यानें चालू झालें आहे, ही मोठ्या आनन्दाची गोष्ट होय । तथापि त्या ग्रन्थांतील ज्ञानाच्या प्राप्तीला उत्तम साधन असे जे प्राचीन शब्दकोश, त्यांकडे जितकें लक्ष लागावें, तितकें अद्यापि लागले नाहीं । हे कोश पद्यरूप असल्यामुळे, मुखोद्गत करण्याला फार सोईवार असून, पाहिजेल तेव्हां स्फूर्ति उत्पन्न करण्याला फार चांगले असतात तेव्हां अशा ग्रन्थांचा संग्रह करणें हें, संस्कृताभिमानी प्रत्येक गृहस्थाचें कर्तव्य होय । लोकवार्तेवरून कोश छप्पन्न आहेत असें समजते । तथापि त्यांतील बरेच सांप्रत नामशेष झाले आहेत । यास्तव, सध्य जे उपलब्ध आहेत त्यांच्या उद्धाराकडे जर कोणाचें लक्ष लौकर न पोचलें, तर तेही नष्ट होऊन जा ण्याचा फार संभव आहे हें जाणून, आली मोठ्या प्रयत्नाने त्यांतील बहुतेक कोशांचा संग्रह केल आहे, आणि राहिलेल्या इतर कोशांच्या प्राप्त्यर्थ यत्न चालविला आहे । तथापि त्या सर्वांची वाट पहात न राहतां, सांप्रत जितके उपलब्ध आहेत, तितकेच आधी सर्वोच्या उपयोगास्तव छापून प्रसिद्ध करावे आणि तोच क्रम पुढे चालू ठेवावा, असा निश्चय केला आहे । एककालीं एकाच पुस्तकामध्ये हे छापि ल्यास, काळ फार लागेल, ग्रन्थही अवजड होईल, आणि तदनुरूप किंमतही भारी होईल । म्हणून ग्राह कांच्या सोईकरितां असा बेत केला आहे कीं, जो कोश हातीं ध्यायाचा, तो एका खेपेस पुरा करायाचा अपूर्वा ठेवायाचा नाहीं । ग्रन्थ लहान असल्यास, दोन, तीन, किंवा अधिक पुरे ग्रन्थ घेऊन त्यांचे एव पुस्तक करायाचें । पुस्तके चांगल्या कागदावर सुरेख छापिलीं जातील । जसजसे ग्रन्थ तयार हो । जातील तसतशी यांविषयीं वेळच्यावेळीं सूचना देण्यांत येईल । प्रत्येक कोशाच्या पृष्ठांचा क्रम वेग गळा येईल । 1 या नियमाला अनुसरून याचें प्रथम आणि द्वितीय खण्ड छापून तयार झालें आहे । प्रथम खण्ड अमरसिंहकृत 'नामलिङ्गानुशासन ( अमरकोश)', आणि त्याचेच परिशिष्ट पुरुषोत्तमदेवकृत 'त्रिकाण्डशेष' आणि ‘हारावली’, ‘एकाक्षरकोश' आणि 'द्विरूपकोश' हे पांच कोश संपूर्ण आले आहेत । किंमत : रुपया । टपालखर्च २ आणे । द्वितीय खण्डामध्ये हेमचन्द्रकृत 'अभिधानचिन्तामणि', 'अभिधानचिन्तामणिपरिशिष्ट', 'अनेकार्थं संग्रह’, ‘निघण्टुशेष' आणि 'लिङ्गानुशासन' हे पांच कोश आणि जिनदेवमुनीश्वरविरचित 'अभिधान चिन्तामणिशिलोञ्छ' हा एक कोश इतके आले आहेत । किंमत १ | रुपया । टपालखर्च ३ आ तृतीय खण्डामध्ये महेश्वरकृत 'विश्वप्रकाश' आणि 'शब्दभेदप्रकाश' हे दोन कोश यावयाचे आहेत ज्या कोणांस हीं पुस्तकें घ्यावयाची असतील त्यांहीं आपली नांवे आणि वर्गणी आमचेकडेस पाठवावी जे पुस्तकें तयार होतांच त्यांजकडे पाठविण्यास ठीक पडेल । For Private and Personal Use Only तुकाराम जावजी । 'निर्णयसागर ' छापखान्याचे मालक १. दुसरीकडे दिलेल्या यादीवरून हे कोश छप्पन्नापेक्षाही अधिक आहेत असें दिसून येईल ।

Loading...

Page Navigation
1 ... 310 311 312 313