________________
हस्तितापस - मत श्रुति, स्मृति विहितच आहे, आमचा सिद्धांत तप, आतापन युक्त चर्या आमची सिद्धांतानुमोदिन अल्प हिंसेने अनेक जीवांना अभयदान देत उपजीविकेसाठी करतो आम्ही एकच महागज घात ऐकून सारे आर्द्रक मुनिही झाले व्यथित अज्ञान, अंधश्रद्धेची ही पाळेमुळे किती खोलात ! आर्द्रकाने फक्त एवढेच उत्तर दिले, खेदजनित शब्दात
(कोणत्याही परंपरेचा असो) भिक्षुना तर अल्प हिंसाही नाही कल्पत
जैन मते 'नरकाचे कारण' पंचेंद्रिय घात (गोशालक-आर्द्रक चर्चा प्रदीर्घ पंचवीस श्लोकात पुढे पुढे आर्द्रकाने उत्तरे दिली थोडी संक्षिप्त) उपसंहार : बधले नाही आर्द्रकमुनिही होते ठाम मत तार्किक नि तात्त्विक उत्तरे दिली प्रशस्त निग्रंथ प्रवचना धारे केले सर्वांपरास्त महावीरांप्रत जाऊन झाले सर्व प्रवर्जित. महावीर काळी भारत होता दर्शनश्रीमंत ३६३ मत-मतांतरे सूत्रकृतांगात खाणच आहे धर्मांची जणू आपला भारत
आजही होती धर्म हजारो येथे प्रसृत दर्शने ही किती आली गेली या कालौघात 'सत्यधर्माला नाही आदि नि नसतो हो अंत.' म्हणू या आपण सारे मिळूनि एका स्वरात सत्यधर्म प्ररूपक जय जय महावीर भगवंत.
(२२) मला भावलेले आचारश्रुत
लीना संचेती परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे व आजचे युग हे व्यावहारिक व वैज्ञानिक युग आहे. विज्ञानात कार्यकारण-भाव (cause-effect-relation) असल्याने आपले म्हणणे पटवून देण्यात तो यशस्वी झाला आहे. तरीसुद्धा सत्कार्यवाद व असत्कार्यवाद ह्या दोन दृष्टिकोनांमुळे काही गोष्टी विज्ञानाला सुद्धा गृहीतच मानून चालाव्या लागतात.
दार्शनिक जगात जेथे जेथे ज्ञान व सम्यक्त्वाचे वर्णन येते तेथे तेथे आचाराचेही वर्णन येतेच. सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधातील ‘आचारश्रुत' अध्ययनात आचार-अनाचार, नवतत्त्व, षद्रव्य याविषयी चर्चा तर आहेच पण त्याचबरोबर अनेकांतवादी दृष्टिकोणाची सीमारेषा व वाणीचा विवेक हेही या अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे.
आचारश्रुत अध्ययन आवडण्याचे कारण असे की, यात विज्ञानासारखी अनेक कृत्ये, Theory of Relativity