________________
दोन हजार भिक्षुना जो नित्य भोजने देत महान पुण्योपार्जनासह, होते उच्च देवगति प्राप्त. आर्द्रक : सर्व ऐकुनि आईक म्हणतो खिल्ली उडवत आदर्शच आहे तुमची दृष्टि नि आदर्श आहे मत म्हणूनच झाला प्रसार तुमचा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत (भोजन देण्याचा) सोपा आहे उपाय तुमचा पण आम्हा नाही पटत जर असेल दाता असंयमी, नि रुधिर लिप्त हात कशी होईल बरे भोजने देऊनि देवगति प्राप्त ? पापकारी प्रवृत्तिचा हा सिद्धांत केवळ अयोग्य, अनुचित (शिवाय) इहलोकी होते निंदा, परलोकी अनार्य जन्मजात रसलंपट अनार्यच तुम्ही भिक्षुच नव्हेत ! आर्हत धर्माप्रमाणे : संयमी, विवेकवान पुरुषा असतो हिंसा त्याग समस्त त्रस-स्थावर जीव संयमाचा आमचा धर्म, परंपरागत.
(बौद्ध भिक्षु जातात)
सांख्य - मत परिव्राजक : जैन, बौद्ध नि सांख्यांचेही एक उगम स्रोत सांख्यांनी मग केली सलगी ‘भाऊ, भाऊ' म्हणत आचार धर्म समान आपला, अहिंसेस मानून केंद्रिभूत व्रत, यम, नियम, लक्षण धर्मात, आपण दोघेही स्थित जैन नि सांख्य, समानतेचे मुद्दे, मांडुनिया सात घेऊ पाहिला आर्द्रक मुनिंचा त्याने हातात हात
(हात सोडवत) आर्द्रक : उत्तर - अकर्ता पुरुषास मानुनि निष्क्रिय मानत पंच स्थावरा जड मानुनिया म्हणति महाभूत
आत्मा आहे सदैव नित्य, (पर्यायही) नाही बदलत मानले असे तर येतीलच ना अडचणी अनंत जो जसा तो तसाच राहील त्याच अवस्थेत, (तर) पुनर्जन्म, गति, जातिस काही अर्थच नाही उरत.
(सर्व श्रमण परंपरेचे विरोधक गेले.) वेद प्रामाण्य मानणारे ब्राह्मण, संन्यासी मत (माझे ऐका) आजीवक, बौद्ध, आहेत हे सारे वेदबाह्य मत उद्धार कधी ना होईल याने आहे वेद कथित दोन हजार ब्राह्मण स्नातकांना जो सदक्षिणा अन्नदान देत महान पुण्योपार्जनसह होते स्वर्गगति प्राप्त. (स्वगत - कसल्या स्वर्गाच्या बाता करताय ?) आर्द्रक : उत्तर -मांसलोलुप मार्जारासम घरोघरी भटकत, भोजनलोलुप ब्राह्मणास होते नरकगति प्राप्त !
(असे ब्राह्मणास निरुत्तर केले.)