________________
आर्द्रक : उत्तर - कामकृत्य नि बाळकृत्य ते नाहीच हो करीत स्वमर्जीचे मालक महावीर कुणा नाही भीत शास्त्रार्थाने केले निरूत्तर सगळे पंडित (११ गणधर) अविभाज्य त्या प्रश्नोत्तराने शेकडो झाले निश्चित ध्येय एकचि उपदेशाचे भव्य जीव हित परोपकारा धर्म सांगती ज्ञानी भगवंत स्वच्छंद विहारी पक्ष्यासम अप्रतिहत विचरत देवाज्ञा वा राजाज्ञेला नाही ते भीत (जीय भयाणं) गोशालक : हरले सारे युक्तिवाद मग झाला संभ्रांत हळूच टाकला खडा हिणवूनि महावीरा ‘वणिक' म्हणत (तुमचे महावीर) वणिकांमध्ये राहून झाले पक्के वणिकजात रात्रंदिन नफ्याचाच (लाभाचा) विचार असता मनामानसात आर्द्रक : उत्तर – एकांशाने खरे आहे रे गोशालका हे तुझे मत लाभार्थी तर आहेतच मुळी महावीर भगवंत रत्नत्रयाच्या मोक्षमार्गाचे जाणून गुपित भविजीवांच्या कल्याणार्थ, या रहस्याचा उपदेश अविरत वणिक कसा असतो --- आरंभ परिग्रह सावध कर्म हे व्यापारी तंत्र उपजीविका नि कामेच्छेचा हा वैश्य मूलमंत्र प्रेमरसामध्ये होऊन लुब्ध करती धनप्राप्त लयास जातो क्षणिक विकास हा थोड्या अवधित अशा व्यापाराने होतो मग मात्र आत्मा दंडित चतुर्गतिच्या चक्रामध्ये फिरतो अविरत. महावीर कसे आहेत --- वणिकासम सावद्यकर्मेही नाही ते करत नवीन कर्मांचे नाही उपार्जन, पूर्व कर्म अंत. महावीरांचा आत्मविकासही सादि-अनंत, जन्म-मरणरूप संसाराचा केला हो अंत स्वहेतु निरपेक्ष व्यापाराने साधति परहित सर्वांशाने वणिक-महावीर तुलना नाही रे होत. (गोशालक खजिल होऊन दूर जातो. आता बौद्ध भिक्षु येतो.) बौद्ध भिक्षु - शाक्य : (बौद्ध भिक्षुचा युक्तिवाद) पुरुषास मानुनि खळीपिंड, बालकास तुंबा मानत, केला असा मांसाहार, तरी कर्मबंध नाही होत. शुभाशुभ बंधाचे कारण, कुशल अकुशल चित्त, प्रत्यक्ष बुद्ध पण पवित्र समजून, असा आहार घेत (नर) मांस भक्षणाने आम्हा दोष नाही लागत, म्हणून करतो शाक्य भिक्षु, मांसाहार मनसोक्त.