________________
(२०) सूत्रकृतांग (२) : एक चिंतनसप्तक
अर्जुन निर्वाण सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधात एकूण सात अध्ययने आहेत. यातील काहीशा वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींचा अध्ययनक्रमाने केलेला हा विचार -
१) पुंडरिक अध्ययन - एका सरोवराच्या मध्यभागी असणाऱ्या सुंदर कमळाच्या प्राप्तीसाठी चारही दिशांनी आलेल्या पुरुषांनी केलेले प्रयत्न व त्यांना त्यात आलेले अपयश. तर एका भिक्षूने केवळ तीरावर उभे राहून आवाह करताच, त्या कमळाचे स्वत:हून त्याकडे जाणे असा हा दृष्टांत.
या दृष्टांतात आजच्या आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातील काही रहस्ये दडलेली आहेत, असे मला जाणवले. 'जो उत्कृष्टतेचा ध्यास घेतो, त्याचे ध्येय आपणहून त्याकडे येते', असा संदेश यात दिलेला दिसतो. परंतु त्यासाठी 'न थकता अविरत परिश्रम करण्याचा मंत्रही जपायला हवा, याचे दिग्दर्शनही यात आढळते. व्यवस्थापन शास्त्रातल्या विद्वानांनी या भूमिकेतून हे अध्ययन अभ्यासायला हवे.'
२) क्रियास्थान अध्ययन - पहिल्या अध्ययनातील ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न म्हणजे 'क्रियास्थान' अध्ययनातील कर्मांचे प्रकार'. यातही भर दिलेला आहे तो वाईट क्रियास्थानांवर. असे का असावे ? -
कोणाही व्यक्तीला भुरळ पडते ती अशा इतरांचे अप्रिय होणाऱ्या गोष्टींची. त्यातून कदाचित आसुरी समाधान मिळत असावे. उदा. दरदर्शनवरील सर्व महिलाप्रिय मालिका, गन्हेगारीविषयक बातम्या इ. याचा दसरा पैल असाही असू शकतो की माणसाला त्याच्या वाटेवरील अडचणी, अडथळे, खाचखळगे यांची कल्पना द्यावी, जेणेकरून मार्गक्रमण करणे सुलभ व्हावे.
३) आहारपरिज्ञा - सर्व जीव कोणता आहार करतात हे सांगताना येथे वनस्पतिकायिकांचे सविस्तर वर्गीकरण दिले आहे. केवळ निरीक्षणातून ही शास्त्रीय माहिती आपल्यापुढे त्यांनी ठेवली आहे. आजच्यासारखी उपकरणे त्याकाळी उपलब्ध असती तर त्यांचेही अजून अधिक सविस्तर वर्गीकरण केले गेले असते. पण आहे तीही माहिती अत्यंत मौलिक व अभ्यासपूर्ण वाटते.
आजच्या वनस्पतिशास्त्रज्ञांनी, जीवशास्त्रीय जाणकारांनी, भूगर्भशास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करून त्यातील शास्त्र पुढे आणले पाहिजे. तसेच सर्व जीव हे सचित्तच आहार करतात हेही ठामपणे सांगून, आपल्या भ्रामक समजुतींना एक निश्चित धक्का देऊन, विचारप्रवृत्त केले आहे हे नक्की.
४) व ५) प्रत्याख्यानक्रिया अध्ययन व नालंदीय अध्ययन - ‘प्रत्याख्यान' ही महावीरांची जैनदर्शनाला दिलेली मोठी देणगीच म्हणावी लागेल. प्राय: ‘सर्वच जीव अप्रत्याख्यानी असतात', असे सांगून दोषांसकट सर्व संसारी जीवांचा स्वीकार केलात, हेच आपले मोठेपण. पण जीवांची सार्वयोनिकता असल्यामुळे पावा॑पत्यांना प्रत्याख्यान विरोधाचे हत्यार मिळाले. हा अंतर्गत संघर्षदेखील समर्थपणे हाताळला.
श्रावकाचारातही प्रत्याख्यानाचे महत्त्व तर्कदृष्ट्या पटवून देऊन त्याचे सुस्थापन केले व ते इतके दृढ झाले की आज ते दैनंदिन जीवनात रुळून गेले.
६) आचारश्रुत अध्ययन - साधूंच्या वाक्संयमाचा उल्लेख करताना तो केवळ त्यांचा न राहता, सर्व मानवांना लागू पडतो. कारण आजच्या अतिसंवेदनशील युगात बोलण्यावर लगाम घातला नाही तर काय घडते, हे पदोपदी आपण अनुभवत आहोत. सामाजिक शांतता व सलोख्यासाठी वचनगुप्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.