________________
७) आर्द्रकीय अध्ययन - समवशरणमधील वेगवेगळ्या मतप्रवाहातील काही संप्रदायांच्या विचारधारांनी, जैनांना दिलेले आवाहन यात दिसून येते. महावीरांना कधीही न पाहिलेल्या आईकाला, आपल्या संप्रदायात सामील करण्यासाठी गोशालक, बौद्ध, वैदिकब्राह्मण, सांख्यश्रमण व हस्तितापस यांचे प्रयत्न. त्यातही महावीरांचा सहवास लाभलेला गोशालक महावीरांवर जास्त प्रकाश टाकतो. इतर अन्यमती मात्र आहारचर्चेतच अडकून राहतात, ही यातील मोठी उणीव दिसते. पण अन्यमतावलंबियांच्या मतांचा जसाच्या तसा उल्लेख करणे, यात जैनदर्शनाचा 'उदारमतवादी' दृष्टिकोण दिसून येतो, जो आपल्या वागण्यात आणला पाहिजे.
___ आचारांगाची सुरवात ‘षड्जीवनिकाय व त्यांच्या रक्षेने' झाली तर सूत्रकृतांगाचा शेवट ‘षड्जीवनिकायांच्या रक्षेनेच' झाला आहे. अशा प्रकारे आचारांग व सूत्रकृतांगाच्या सर्व अध्ययनातून समता व अहिंसेचा अंत:प्रवाह झुळझळत आहे. त्याला प्रत्याख्यानाची जोड देऊन दैनंदिन जीवनाचा एक भाग बनविण्याचे मोठे कार्य केले आहे. हाच आशय बाकीबाब (कविवर्य बा.भ.बोरकर) आपल्या सुंदर कवितेतून व्यक्त करतात. तो असा की -
'जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरि, सहजपणाने गळले हो.'
(२१) पद्यमय 'आर्द्रकीय' अध्ययन
चंदा समदडिया राजगृही एक नगरी होती सुंदर, सुविख्यात, महावीरही होते तेथे विराजित. (इराणहून) दर्शन करण्या आर्द्रक मुनि आले मित्रांसमवेत (५००) अन्य दार्शनिक भेटले त्यांना प्रवेशद्वारात, झाला जो संवाद, प्रकाशक स्वमत-परमत,
इतिहासाने नोंदवले ते सूत्रकृतांगात. (जैन उदारमतवाद) (श्रमण परंपरेचे नवनिर्मित बौद्ध व आजीवक हे महावीरांचे प्रबल विरोधक आहेत.)
सर्वप्रथम गोशालक मांडतो आजीवक मत' पण नाही सांगितले तत्त्व किंवा एकही सिद्धांत (पूर्वपीठिकेसह गोशालकाचे आक्षेप ---) आक्षेप - महावीर तर आहेत माझे पूर्वपरिचित, साथी होतो मीही त्यांचा, साधना काळात. ध्यान, मौन, तप:साधना नि पूर्ण एकांत, मम संग भोजन केले कितीदा, निरस अंत-प्रांत सर्व सोडूनि आता दिसती नित्य समूहात, जमवून जन समुदाया, यथेच्छ उपदेश देत. पूर्वीचे नि आत्ताचे त्यांचे वागणे विपरीत. द्विधा अवस्था होऊन त्यांचे झाले अस्थिर चित्त आर्द्रक : उत्तर - (पूर्वी) कर्म निर्जर हेतु केले तप नि एकांत, प्रयोजन ना उरले आता, झाले रागद्वेष रहित. कृतार्थ झाले महावीर करूनि, केवलज्ञान प्राप्त, वर्तमानासह एकांतच ते, पुढे भविष्यात. गोशालक : आक्षेप - नाही केला शिष्य एकही बारा वर्षात