________________
नाही. त्यांच्या आश्रित राहणाऱ्या प्राण्यांचा तसेच मांस, रक्त, चरबी यात राहणाऱ्या, उत्पन्न होणाऱ्या अनेक त्रसस्थावर जीवांचा घात होतो.
३) थोड्या जीवांना मारणारे अहिंसक म्हटले तर मर्यादित हिंसा करणारे गृहस्थ तर हिंसा दोषरहित मानले जातील. गृहस्थ त्रस सोडून (गाथापति-चोर-ग्रहण-विमोक्षण-न्याय) स्थावरांची मर्यादा घेऊन, बाकीच्या स्थावरांचे प्रत्याख्यान घेऊन हिंसा दोषाचे प्रमाण कमी करतात.
४) सप्त कुव्यसनात पण मांस निषिद्ध मानले जाते. ५) जैन साधू तर ईर्यासमितीने युक्त, भिक्षेच्या ४२ दोषांपासून रहित, यथालाभ संतुष्ट होऊन आहार घेतात.
६) 'सर्व जीव समान', असे म्हणून सन्नी पंचेंद्रिय मारणे म्हणजे दहा बलप्राण मारणे होय. एकेंद्रियात चार बलप्राण आहेत.
७) शिवाय आपण, वनस्पती शंभर पटीने वाढवू शकतो पण एक हत्ती मारला तर एक वंशच नाश पावतो.
८) पंचेंद्रियांची हत्या करणाऱ्या नरकगामी हस्तितापसाजवळ जास्त वेळ न घालवता आपण अहिंसा पाळणाऱ्या, मोक्षगामी भ. महावीरांच्या दर्शनाला लवकर जावे, या उद्देशाने आर्द्रकमुनी तेथून थोडक्यात उत्तर देऊन निघतात.
९) जैन साध तर भ्रमरवत्तीप्रमाणे गोचरी घेतात (दशवैकालिक-दमफप्फिया-अध्ययन १) उद्दिष्ट आहार घेत नाहीत. हस्तितापसांप्रमाणे वर्षभराची तरतूद व अन्नाबद्दलची आसक्ती न ठेवता, रोजची रोज गोचरी घेतात.
१०) मांस कच्चे असो, शिजविले जात असो किंवा शिजविलेले असो, तिन्ही अवस्थांमध्ये अनंत निगोदिया जीवांची उत्पत्ती होत असते, अशी मान्यता अनेक जैन आचार्य नोंदवितात.
खरे तर कोणत्याही अन्नात, थोड्या काळानंतर त्रसजीवांची उत्पत्ती होत असते. ज्यात त्रसजीव जास्त ते अन्न निषिद्ध आहे. मांसात निरंतर जीवोत्पत्ती होतच असते. नुसता स्पर्श केला तरी जीवहत्या होते.
११) मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणधर्मीय ग्रंथात म्हटले आहे - अनुमन्ता विशसिता, निहन्ता क्रयविक्रयी। संस्कर्ता चोपहर्ता च, खादकश्चेति घातकाः ।।
अर्थात्, प्राण्यांच्या वधाची आज्ञा देणारा, शरीरावर घाव करणारा, मारणारा, खरेदी करणारा, विकणारा, शिजवणारा, वाढणारा, खाणारा ह्या सर्व आठही व्यक्ती घातक आहेत.
१२) मांस खाणाऱ्याला परमधामी देव म्हणतात - तुहं पियाई मंसाइं खण्डाई सोल्लगाणि य । खाविओ मि समसाई अग्गिवण्णाई णेगसो ।। उत्तराध्ययन १९.७० । १३) श्रेणिक राजा देखील पंचेंद्रिय हत्येमुळे नरकात गेले - अशी जैन पौराणिक मान्यता आहे. १४) सव्वे जीवा सुहसाया दुहपडिकूला । सव्वेसिं जीवियं पियं ।। आचारांग
या सहअस्तित्वाच्या जीवनसूत्रांचा सर्वांनीच विचार करून जो प्राकृतिक आहार आहे, सहज उपलब्ध आहे, त्याचाच स्वीकार करावा.
हस्तितापस मनाला पटत नाहीत. एकाच प्रकारचे अन्न रोजच वर्षभर खाणे हे रुचत नाही. नुसताच मांसाहार पण करतील असे वाटत नाही. संयम पथावर जाणारे निरवद्य आहारच घेतात.