________________
कर्माने बांधलेल्या, कर्मातून कर्मानेच सुटका होते हे जाणून, सर्व प्राणिमात्रांवर मैत्रीभाव ठेवून गुणग्राहकतेने माध्यस्थभावाने उत्कृष्ट संयमाचे अनुष्ठान केले ।।
आर्द्रकीय - ६) वचनगुप्ती साधलेल्या महावीरांच्या परमभक्त 'आर्द्रका 'ने, 'गोशालका ' च्या उपहासाने
गुरूंच्या व्यापारी, डरपोक म्हणून केलेल्या टीकेला, मार्मिक उत्तर दिले.
जीवात्म्याला एकांत सर्वव्यापक, नित्य मानणारे, ज्ञानानेच मुक्ती होते असे तत्त्व प्रतिपादन करणाऱ्या सांख्यांना क्रियारहित ज्ञानाने मुक्ती मिळत नाही हे पटवून दिले.
दोन हजार ब्राह्मणांना भोजन करवणारे, माणसाला खळीचा पिंड, बालकाला भोपळा म्हणून शिजविणारे 'शाक्य', एका मोठ्या हत्तीची हत्या करून वर्षभर त्याचा आहार करणारे 'हस्तितापस' कसे मिथ्याधारणेत गुंगले आणि देवगतीचे वारस होणार या भ्रमात राहिले.
त्यांना आर्द्रार्काने समर्पक उत्तर देऊन सावद्य-क्रिया आणि उद्दिष्ट आहाराचा त्याग करून
निष्कपट भावाने उत्कृष्ट साधक कसे व्हावे, हे पटवून दिले ।।
नालंदीय - ७) विशाल सरोवरात रहाणाऱ्या 'नाल' नागाच्या नावाने 'नालंदा' प्रसिद्ध झाली आणि मनमोहक नैसर्गिक वनश्रीने बहरली.
महावीरांच्या चौदा चातुर्मासिक काळाच्या वास्तव्याने ही धरती पावन झाली.
ज्ञानी, ध्यानी, त्यागी लोकांची कर्मभूमी बनली.
हस्तियाम वनखंडात वास्तव्य करणाऱ्या पेढालपुत्राच्या मनात प्रत्याखानाबद्दल शंका उद्भवली प्रत्याख्यान देणारे घेणारे पापाचे भागीदार असल्याची टोचणी मनाला लागली. गौतमांनी शंका निरसन करून ९ भंगाने प्रत्याख्यान- पालनाची दिशा दाखविली. ‘प्रत्याख्यान कसे सुप्रत्याख्यान', हे सांगून गुरुदरबारी त्यांची हजेरी लावली ।।
(१३) हस्तितापसांना यथोचित उत्तर
साधना देसडला
आर्द्रककुमार जातिस्मरणामुळे दीक्षा घेऊन भ. महावीरांच्या दर्शनासाठी आर्य देशात येतात. वाटेत त्यांना गोशालक व अन्य मतावलंबी लोक भेटतात. प्रत्येकजण स्वतःच्या धर्मात येण्यासाठी आपला धर्म कसा श्रेष्ठ व अंगीकार करण्यास सोपा आहे, हे सिद्ध करू पाहतात. शेवटी हस्तितापस भेटतात. ते म्हणतात, 'आम्ही वर्षातून एकदाच एक हत्ती मारतो व त्याचाच वर्षभर आहारासाठी उपयोग करतो. अशाने एकाच जीवाची हत्या होते व पुकळ जीवांची हत्या वाचते. '
आर्द्रकीय अध्ययनात ५३ व्या गाथेत या आक्षेपाला अत्यंत संक्षिप्त उत्तर दिले आहे. ते असे - "वर्षभर एकाच प्राण्याचा घात करणारेही जीव हिंसेपासून निवृत्त होऊ शकत नाहीत. तुमच्या या विचारानुसार गृहस्थही अन्य क्षेत्र-कालवर्ती जीवांची हिंसा करीत नाहीत. म्हणून त्यांनाही निर्दोष, अहिंसक मानावे लागेल.'
वस्तुतः हे उत्तर काही समाधानकारक नाही. याची थोडी तरी विस्तृत मीमांसा आवश्यक होती. पुढे विकसित झालेला साधुआचार आणि शाकाहारविषयक मान्यता जैन धारणांच्या सहाय्याने पुढील मुद्यात देता येतील. आर्द्रकमुनींच्या उत्तरात पुढील मुद्दे अध्याहृत होते -
१) हिंसा-अहिंसेचे मापदंड मृत जीवांची संख्या नसून, प्राण्यांची चेतना, इंद्रिये, मन व शरीराचा विकास व मारणाऱ्याचे तीव्र - मंदभाव यावर अवलंबून असते.
२) हत्तीसारख्या विशालकाय, विकसित, चेतनशील प्राण्याला मारणारा, हिंसा दोषांपासून निवृत्त होऊ शकत