________________
क्षेत्रात लागू करण्याच्या प्रयत्नातून या गोंधळाचा जन्म होतो.' परंतु डार्विन किंवा स्पेन्सर दोघेही उत्क्रांतीचे उपपत्ती नीतीस विरोधी आहे असे मानत नाहीत.
जैनशास्त्राने दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर सिद्धांताची रचना केलेली दिसते. नैतिक अथवा आध्यात्मिक विकासासाठी कर्मांवर आधारित, पूर्वजन्म-पुनर्जन्म यांना उपोबलक असा आध्यात्मिक विकासाचा द्योतक गुणस्चम अथवा गुणश्रेणींचा सिद्धांत मांडलेला दिसतो. म्हणजे व्यावहारिक पातळीवर अत्यंत अप्रगत अशी निगोद जीवांची संकल्पना तसेच एकेंद्रिय, द्वींद्रिय अशी जैविक दृष्ट्या मांडणी इत्यादी सांगून उत्क्रांतिवादाचेही बीजरूपाने संकेत दिले आहेत. या दोन्ही सिद्धांतांची पातळी वेगवेगळी आहे. त्यात परस्परविरोध नाही. नैतिक वादाच्या चौकटीतून जीवशास्त्रीय उत्क्रांतीकडे बघण्याच्या अट्टाहासामुळे जैन विचार उत्क्रांतीला पूरक नाहीत असे वरकरणी वाटते. किंबहुना सृष्टीत होणाऱ्या जैविक विकासाचे संकेत जैन ग्रंथांत आढळून येणे ही जैन दर्शनाची उपलब्धी मानावी लागेल.
* डार्विनच्या मतानुसार, मानवाची जाणीव आणि मन ही सुद्धा मूळ जडद्रव्याची विकसित रूपे आहेत. आत्मा व मन वेगळे आध्यात्मिक द्रव्य नसून ते उत्क्रांत होत गेलेल्या शरीराचेच आविष्कार आहेत.
जैन शास्त्रानेही डार्विनच्या मतानुसार, 'मन' हे पौद्गलिक मानले आहे.२१ आत्म्याला जडद्रव्याचे विकसित रूप मानणे मात्र जैन तत्त्वज्ञानाच्या प्रकृतीत बसत नाही. जैन मतानुसार चेतन व अचेतन ही दोन्ही तत्त्वे स्वतंत्र असून अनादि काळापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.
* विश्वातील आकार, व्यवस्था, योजना या नैसर्गिकपणे घडत असतात. यात श्रेष्ठ दैवी बुद्धीचा आणि शक्तीचा हस्तक्षेप नसतो, असे डार्विनचे मत आहे. डार्विनची भूमिका अनुभववादी, प्रत्यक्षार्थवादी आणि निरीश्वरवादी आहे.
__ जैन दर्शनानेही निरीश्वरवादी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. अर्थात् जीवसृष्टीबाबत कर्मसिद्धांत आणि पुरुषार्थवाद या दोन्हींची सांगड घातली आहे.
* डार्विनच्या मते, या विश्वात काहीही स्थिर, अचल आणि न बदलणारे नसते. 'बदलणे' निसर्गाचा स्वाभाविक धर्म आहे. परिवर्तनाची क्रिया समायोजनाच्या प्रक्रियेमार्फत अविरतपणे चालू आहे व चालू राहील. ____ जैन दर्शनाने 'सत्'ची व्याख्या करताना कूटस्थ व नित्य सत्३ संकल्पनेचा पाठपुरावा केला नाही. द्रव्यरूपाने सत् आणि पर्याय रूपाने बदलणारे असेच वस्तू, व्यक्ती व घटनांचे अस्तित्व मानले.२४ त्यामुळेच अध्यात्मवादाच्या आड न येताही सृष्टीच्या नित्य बदलत्या रूपाची उपपत्ती जैन तत्त्वज्ञानाच्या आधारे लावता येते. सद् वस्तू मुळातच अनंत धर्मात्मक आहे.२५ त्याशिवाय वस्तूकडे बघण्याचे दृष्टिकोण अर्थात् नयही अनेकविध असतात. ही तथ्ये सांगितल्यामुळे विकास, बदल, हास या सर्वांनाच जैन तत्त्वज्ञानानुसार एक सुदृढ पार्श्वभूमी प्राप्त होते.
उत्क्रांतिवादाचे मंतव्य डोळ्यासमोर ठेवून ही समीक्षा केली. आता जैन ग्रंथांतून मिळणाऱ्या उत्क्रांतिसूचक संकेतांवर नजर टाकू.
जैन ग्रंथांतून मिळणारे उत्क्रांतिसूचक संकेत : (१) निगोदी जीवांना आधुनिक परिभाषेत 'Microbes' म्हणता येईल. आधुनिक जीवशास्त्रातही स्वतंत्र सजीवाची मायक्रोब्ज ही अशी अवस्था आहे की ती, वनस्पतिसृष्टीच्या अंतर्गत येते की प्राणिसृष्टीच्या ?'-अशी संभ्रमावस्थ निर्माण करतो. लोकातील एक जीव मोक्षगामी झाल्यानंतर इतर निगोदातील एक जीव संसारात प्रविष्ट होतो, हे जैन शास्त्रातील विधान वेगळी दिशा देणारे ठरते. ज्या अर्थी आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत मनुष्य मोक्षगामी झाल्यानंतर, जीवसृष्टीत अप्रगत निगोदी जीव प्रवेश करतो, त्या अर्थी जैन शास्त्रातही क्रमिक जीवविकासाला निश्चित स्थान