________________
११८ ]
मराठी
[७५ मालिनी खदखद नृप हासे तोष सर्वा जनाला । मग नृपवरु बोले मी वरू कन्यकेला ॥ म्हणत सकल नारी काय हो भाग्यलीला । स्वजन जन मिलाला तोष सर्वत्र जाला ॥११०॥ स्वरित मग सुगंधा आनिली पुण्यशाली । मलवट पट रेखा रेखियेली कपाली । लखलखित कुकाचे लाविले बोट दीसे । घवघवित विलासे काय लक्ष्मीच भासे ||१११||
शिखरिणी बिरोद्या पोल्हारे अनवट झणकार चरणी । कम्या वाक्या ही त्या चप्पल गुज-या सूर्यकिरणी ।। पदी घागूप्याचा रुणझुणित बाजे स्वर बरा । अनंगाचा कैचा त्रिभुचनि जयी घोष दुसरा ॥११२॥
शाईल. पाटाऊ बहुलाल जोरकसिचा त्यामाजि बुट्टा किती। मध्ये सारस हंस थोर रचना मोराचिये पंगती || ल्याली ते. कटिसूत्रही कटितटी बाला बहू शाहनी । हाती कंकण घातले घडलिया रत्नाचिया जोडणी ॥११३॥ कंठी दुल्हड दाटली मणि महा तैसी सरी लाखिली । घाली मोहनमाल ते गरसुली चित्रांग चापेकेली ॥ भोगी मुक्तिक पद्धती सहित ते सिंदूर रेखा भली । तैसी मूद सुराखडी लखलखी वेणी पहा लाँयली ॥११४|| कर्णी तानवडे सुरन जडली ते चंद्रसूर्यापरी । भाली चंद्रक सीस फुल्ल झलकी जाली फुलाची बरी ।। नेत्री अंजन घातले झलकती पंचांगुली मुद्रिका । ल्याली दाटित कंचुकी मग दिसे जैसी शरच्चंद्रिका ॥११५॥ बाजूबंद विशेप बाधुनि असा शृंगार पां दीधला । अंगी चंदन चचिला दशदिशा सौगंध तो व्यापला ॥ दंताची बरवी सुपंक्ति रचना डाळिंब बीजापरी । वक्त्री तांबुलं चर्चिला घवघवी आरक्त होटावरी ॥११६॥
रथोद्धता लन लावियले शुभ वेला । सर्व एफ मिलला जनमेला ।। वधुवरे मग वरे मिरचीली । जेवणावल सुखे करचीली ॥११७] एक दिवस थरी नृप कोपा । रूपिणीसि म्हनतो दृढ़ पापा । आनिली धरुनि दंड करावा । पापिणी कपट टाकि कुभाया ॥११॥
१. म साजिरो, २. ग सुख ।