________________
७६]
सुगन्धदशमी कथा
I
पातली तव सुगंधकुमारी | बोलली नृपवराप्रति भारी || माझिया जननिला जरि दंडा । लोक बोलति तरी मज लंडा ॥ ११९॥ हा विचार नव्हे बुझ राया । म्हणुनि जाउनि घरी दृढ पाय | ॥ सोडिनाच मग ते क्षण राहे । होलियांत भरले जल बहे || १२० ॥ ऐक ऐक म्हणे नृप सारा । व्यर्थ भाव दिसते जन थारा ॥ राख राख विभु माहेर माझे 1 दान फार घडले जरि तूझे ॥ १२१ ॥ म्हणुनि काकुलती जब आली। भूप अंतरि दया तब जाली ॥ सोडिली मग कृपाल नृपाले । सज्जनासि सुख अंतरि जाले ॥१२२॥ पट्टराणि पद ते मग पावे । राज्यवैभव सुखात सुखावे || करविले मग जिनालय तीने । त्यात चिंब घरिले सुविधीने ॥ १२३ ॥ नित्य पूजन करी जिनदेवा । मूलमंत्र जप लुकत ठेवा || कोन्हि येक सुदिनी सुख वेला । जिनगृही मिलला जन मेला ॥ १२४॥ जिनगृही वर सुगंध कुमारी | सावचित्त वसली सुख भारी || देव एक तब त्या स्थलि आला । देवदेव जिन तो नमियेला || १२५|| देखिली तव सुगंधकुमारी | हासिला खदखदा तब भारी || धन्य धन्य अवतार सुगंधा । बोलिला मग भवांतर धंदा || १२६ || तुझिया व्रतबले फल जाले । म्हणुनि देवपद हे मज आले ॥ स्वग भवांतर जई मज बोजा | व्रत विधी धरिला शुभ काजा ॥१२७॥ या स्थली उपजलीस सुगंधा । राज्यवैभव मह । सुखकंदा || धर्महेतु बहिनी मज तूची । साच गोष्टि बुझ पूर्वे भवाची || १२८|| बहुत फार बदू तुज काथी । वीसरू मज नको सखे बाई ॥ नित्य नित्य जिनदेव पुजावा | काल हा जाग असाचि खपाचा || १२९॥ वस्त्रभूषण दिल्हे मग तीला | स्वस्थासहि सुखे सुर गेला || सर्वलोक वदती यस तीचे । दानपुण्य करि ती यश साचे || १३०||
I
भुजंग०
सुगंधा पुन्हा त्या व्रतालागि साधी । पुरे सर्व आयुष्य पावे समाधी || घरी अंतकाली णमोकार मंत्रा | पुढे प्राण गेले सुखे ते स्वतंत्रा ॥ १३१ ॥ वधूलिंग छेदूनि ईशान स्वर्गी | महा इन्द्र जाला पहा पुण्यमार्गी ॥ विमानी बसूनी करी तो प्रयाशा । विभू श्रीसुपाश्वसि वंदू सुजाना || १३२ ||
उपेंद्र ०
वंदूनिया ते समबस्तीसी । गेला पुन्हा आपुलिया स्थलासी ॥ सम्यक्त संपूर्ण मनांत भावी । म्हणे कवी तेचि कथा बदावी ॥१३३॥
१. गनिज, २. ग काय
[ ११६