________________
७४]
सुगन्धदशमीकथा
[x पुन्हा भेटि होईल केन्हा वदावे । मला टाकुनी एकले काय जावे | कसी आपुली वस्तुटाकोनि जाने । बरे हे नव्हे सर्वथा दीनवाणे ।।९।। वदे भूप येईन तुझ्या ठिकाणी । निशा मध्यभागी खरा बोल मानी ।। खरे गे खरे सत्य हे भाष घेई । प्रिये ऊठ तू शीघ्र गृहासि जाई ॥९६।। नृपाले घरालागि' गंतव्य केले । कलेनाचि कोन्हासि ते गुप्त जाले ।। सुगंधा कुमारी त्वरे ये घरासी । चदे रूपिणी पातली पापरासी ।।९७॥ सुगंधा वदे सर्वही गोष्टि केली । बरे ऐकिले रूपिणी हासियेली । म्हणे गे कसी गौलिया माल घाली । कसी भाग्यमंदा करी आपचाली ||९८॥ निशा मध्य भागी तिच्या मंदिरासी। पहा भूप ये नित्य तो आदरेसी ।। अलंकार दील्या बहू द्रव्य रासी । सुगंधा वदे गोष्टि ते माउलीसी ॥१९॥ असे वर्तले पितृ गावासि आला । अलंकार देखोमिया व्यग्र जाला ।। दिसे सर्व वस्तू नृपाची निशानी । म्हणे कोन तो चोर चोरोनि आणी ||१००॥ मनामाजि भ्याला नृपालागि सांगे । म्हणे चोरटा तुझिया गावि जागे ।। कसा माल घालोनिया कन्यकेसी। प्रती वासरे येत माझ्या घरासी ॥१०॥ अलंकार राजा तुझा सर्व घई । वदोनि असा लागला शीघ्र पाई ।। कलेनाचि तो कोन ठाई निवासी । कसा तो करू लाधला कन्यकेसी ।।१०२॥ वदे भूप तो चोर दावूनि देई । बहू वित्त गेले न लागे सुलाई ॥ कसा कोन येतो तुझ्या मंदिरासी । सुगंधा कसी रातली काय त्यासी ।।१०३॥ अलंकार माझ्या घरातील गेला । कसा चोर आला कसा काय नेला ॥ दिसे ना तु आणीक तो आणि दावी । न आणीस तेव्हा तुला सीख लावी ॥१०४|| अहो साहजी सांगतो बोल माना | समस्ता जना भोजनालागि आना ॥ वरी भोजने सारिल्या आदरेसी । बहू आदरे बैसवावे जनासी ॥१०॥
उपेंद्र अंतःपटा बांधुनि येके ठाई । चौरंग मांडा बरख्या उपायी । जो पाय धूता वरु ओलखीला । तो नोवरा होय कुमारिकेला ||१०६॥ सांगीतली रीत तसीच केली । बापे सुगंधा बहु वीनवीली ।। श्रेष्ठी घरी लोक समस्त माला । भूपालही हासत चालियेला ।।१०७॥
भुजंग. बहू पाय धूता न ये ओलखीसी । म्हणे हे नव्हे हे नव्हे पीतियासी ।। बहु साजिरे पाय माझ्या घराचे । अति कोमले काय सांगू गुणाचे ॥१०८।। अहो पद्म पायी जयाचे झलाली । दिसे चक्र अंकूश रेखा विशाली || असे ऐकुनी भूप सन्मूख आला । सुगंधा म्हणे तो वरू ओलखीला ||१०९॥
१. कम गृहालागि, २. क ग दील्हा, ३. क ग चि टाई ।