________________
६७ ]
मराठी
भुजंग०
असे आर्यखंडात सुभारताते । पुरी कंचनी ते असे शुद्ध त्याते ॥ सदा तेथिचा लोक भोगी सुखासी । बहू धर्मकार्थी असे लोभ त्यासी ॥ ५४ ॥ लहंसा
कनक नाम नृपती चलवंत | कनकमाल वधू जयवंत ॥ जैनधर्मं रुचि फार जयाला । धर्महेत धरिता दिन गेल| ||१५||
उपजाति
1
तेथे बसे तो जिनदास वाणी | जिनादिदत्ता वधु त्यासि मानी || तिच्या कुशी पूर्बिल ब्राम्हणी ते । जाली कुमारी बहु पावनी ते ॥ ५६ ॥ लुगंध देहावरि तीस दीसे । लोकासि आश्चर्य विशेष मासे || लोकी सुगंधा म्हुनि नाम केले । सर्वासि ते वर्तं कलोनि गेले ||१७|| तो मायबापा बहु लोभ दाटे । आनंद संपूर्ण मनात वाटे || काही पापास्तव माय मेली । पूर्वील दुःखावलि व्यक्त जाली ॥५८॥ हा हा करी तो मग बाप जीवा | म्हणे कसा पूर्विल पाप ठेवा ||
I
विवाह दूजा करि लोक बोले । संतोष मानी स्थिर चित्त केले ॥ ५९ ॥ ते कसा रूपिनि नाम नारी । क्रोधानना केवल पापधारी ॥ सकाल उठोनिय स्वाय दाना । ऐसी महा पापिनि पूर्ण जाणा || ६० || तिच्या कुसी एकचि होय कन्या । ते नाम श्यामा निज रूप धन्या ॥ माता करी स्नेह विशेष तीचा । सुगंधकन्येवरि द्वेष साचा ॥ ६१ ॥ शालिनी
श्यामा माझी काय बाहीर गेली । खाऊ जेऊ तीजला शीघ्र घाली ॥ श्यामा बाला आनुनी तेल रोला । बाली जेऊ तीजला तूपगोला ॥ ६२ ॥
I
भुजंग ०
|
सुगंधा बहू रोड जाली सरीरी नसे अन्न पाणी करे दुःख भारी || पित्याने असा पाहिला भाव पाही । म्हणे वेगले राहिजे सर्वथा ही || ६३ ॥ जुदा राहित्य वाणिया तो शहाणा तरी द्वेष तीचा कदापि चुकेना ॥ सुगंधा करी अन्न पाकासि भावे । पिता देखुनी अंतरी तो सुखावे ॥ ६४ ॥ असे देखुनी अंतरी लोभ आणी । म्हणे बाल माझी कसी हो शहाणी ॥ दिसे पूतली रेखिली सोनियाची । गुरू देव बंदी करी भक्ति त्याची ||६५ ॥ दुकान आनी नवीसी व्हाली । सुगंधा बलाऊनि ओटीत घाली ॥ तदा रूपिणी कस्मली काय बोले । म्हणे गे पित्यालागिही वश्य केले ॥६६॥ तदा एक दीसी पहा त्या नृपाने । बोलाऊन सांगीतले काय त्याने || तुवा जाइजे शीघ्र दीपांतराला | खरीदी करा रत्न आणी घराला ||६७॥
१. ग म्हणुनि, २ ग व्याप्त, ३. ग वोटीसि ।
[ ७१