________________
४० ]
मराठी
उपेन्द्र ०
अनुक्रमे जन्म भरोनि गेला । चांडाल गेही मग जन्म जाला ॥ दुर्गंध आंगी बहु दुःख दाटी । कोन्ही तिला बैसविनाचि पाटी ||२५|| माता मरे दुःख विशाल दीसे । सर्वत्रही देखुनि लोक हासे ॥ ते एकली टाकियली वनांत । रखे पडे दुःख घरी मनांत ॥२६॥ ते उंबराची फल खात राहे । गेले ऋतू वत्सल कर्मले हे ॥ तेथे वना एक मुनींद्र आला । नामे श्रुताब्धी शुभ भाव ज्याला ||२७|| असे गुणाब्धी र शिष्य त्याचा । तो बोलिला सद्गुरुसी सुवाचा ॥ संदेह हा दूर करावयासी । आता पुसावे बरवे गुरूसी ||२८|| अहो अहो श्रीगुरुराज देवा । हे कोण चांडालिणि पापठेवा || चंदे गुरू आइक बालका रे 1 इच्या भवाची कथनी कथा रे ||२९|| हे श्रीमती पूर्वि राजकांता | मुनीस दे आहर दुष्टचिता । तुंबीफलाचे कडु दान केले । त्याचे असे पाप फलासि आले ||३०|| गेली कथा पूर्विक व्यक्त केली । चांडालिनीसी श्रुत सर्व जाली ॥ हा हा वदे सिंदुनि पाप बाला । तेहा स्वभावे गुरु वंदियेला ॥३१ ॥ कुमाव गेला शुभ भाव झाला । पुनःपुन्हा चंदियले गुरुला ॥ घेवोनिया मूलगुणासि आठा । बास नते पालिति पुण्यपाठा ॥ ३२॥ तेथोनिया ते मरणासि पावें । पुढे कथा सांगण ऐक भावे || श्रृंगारिला मालव देश शोभा । तेथे पुरी उज्जनि रत्नगाभा ||३३|| ते ब्राह्मणाचे घरि हो कुमारी होताच बापावरि होय मारी । काही वाढे मग माय मेली । उच्छिष्ट खात्ता मग वृद्धि जाली ॥३४॥ आणीतसे काष्ट विशेष भारा | पुण्याविना केवि सुखासि थारा ॥ ऐसी भरी ते उदरासि बाला । तेथे सुनी तो तब येक आला ||३५॥ सुदर्शना काम विकार नाही । सम्यक्त्वधारी व्रत पूर्ण पाही || राजा पहा तेथिल अश्वसेन | वंदावया चालियला सुजाण ॥ ३६ ॥ घेऊनिया अष्टक द्रव्य पूजा । त्या गाविचा लोकहि जाय बोजा || गुरुसि केला प्राणपात तेही । सम्यक्त्व माचाविण हेत नाही ||३७|| सुमार्ग तो ऐकुनि लोक धाला । बहूत धर्मावरि हेत जाला || सांगे सुधर्मा गुरु तो म्हणाचा । या वेगला तो कुगुरू गणाया ||३८|| मोली सिरी घेउनि दुष्टगंधा | आली अकस्मात करीत धंदा || पुढे बरे देखिले सुनीसी । ते आठवे पूर्विलिया' भवासी ॥ ३९ ॥
1
शालिनी
मूर्छा आली ते पड़े भूमिकेला । राजा पाहे लोक विस्मीत जाला ॥ काहो स्वामी पातली ईसि मूर्द्धा । ऐसे सांगा आमुची भव्य पृच्छा ||४०|| १. ग पूर्विलच्या, २. क भ ऐसी
↓
[ ६६