________________
६५ ]
१. ग क्रोध,
७. गरिघाली ।
सुगन्धदशमी कथा
राणीस सांगे सदनासि जाई । मुनीश्वरा भोजनदान देई || रानी मनी कूड धरोनि राहे । मिथ्यातिनी पाप विचारिताहे ॥ १० ॥ जाई राजा वर काननासी । मी काय जाऊ सड़नासि कैसी । आनंद माझा घडि एक गेला । पापी मुनी काम्हुनि आजि आला || ११| बोलेच ना ते सदनास आली । मुनीस ते भोजन काय घाली ॥
कडू दुध्या रांधुनि पाक केला । कुमाव चित्ती मुनि जेवचीला ॥१२॥ गेला मुनी घेउनि आहरासी । जैनालाई ध्यान घरी सुखेसी ॥
त्या आहरे विव्हल देह जाले । हा हा करी लोक समस्त आले || १३ | तो श्राविका श्रावक दुःख भारी । हे विघ्न कैस्यापरि कोण वारी ॥ ऐसी कसी पापिणि कोण आहे । मुनीस हा आहर दीवला हे ||१४|| केले तदा औषध शुद्ध पाही । गेला स्वभावे मग रोग काही ॥ जाला मुनी देह निरोग जेव्हा । सुखी मुनी जाय चनासि तेव्हा || १५ || हे तो कथा या स्थलि राहिली । नृपा घरी सांगण काय जाली ॥ तो भाव लोकी श्रुत त्यासि केला । भूपासही कोप चढोनि आला ||१६|| माझ्या घरी काय पदार्थ नाही । हे बाइको पापिन काय पाही ॥ जलो इचे तोंड दिसोचना की। कुसंगती पाप घडे जना की ||१७|| त्यानंतरे भूपति एक दीसी । गेला पहा सद्गुरुवंदनेसी || निदुनिया आपुलिया भवासी । करोनि प्रायश्चित ये घरासी ॥ १८ ॥ राजा तिला पाहुनि कोप आणी । श्रृंगार हारादिक घे हिरोनी ॥ सौभाग्य गेले मग दोन जाली । हे कर्कसा बोलति लोक बोली ||१९|| दुर्गंध तो आमय व्यक्त जाला । देहावरी कोड चढोनि आला || तो बास साहू न सकेचि कोन्ही । जलो जलो बोलति ठोक वाणी ॥२०॥
शालिनी
राणी तेव्हा दुःख आणी मनासी । हा हा देवा पाप जाले जिवासी || कैसी बुद्धी आठवे पापिणीसी । कैसी गोष्टी सांगणे हे जनासी ॥२१॥ राणी तेथे आर्तध्याने मरोनी । म्हैसी जाली पापिणी दुःखखाणी ॥ माता गेली जन्मता कालगेही । चारापाणी ते मिलेनाचि काही ||२२|| जाली देहीं दुर्बली चालवेना | काही केल्या दुःख तीचे सरेना ॥ पानी घ्याव्या ते तटाकी निघाली । तेथे कैसी कर्दमी मग्न जाली ||२३|| गेली प्राणे सूसरी काय जाली । माता नाही ते पड़े पाप जाली ॥ तेथोनीया साँवरी पापयोनी । तेथेही ते दुःख भोगी निदानी || २४||
[ १०
२. ग. सुख,
२. ग क्रोध, ४. कग व्याप्त, ५. ग दुःख, ६ क ग पाही,