SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 91
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सुगन्धदशमी कथा [ मराठी ] शार्दूल० श्रीमन्मंगल देवमूर्ति जिन हा सिंहासनी बैसला | छत्रे तीन विशालकाय शशि हा सेवा करू पातला । पाहा दक्षिनवामभाग चमरे गंगावने ढालिला । सूर्याचे नभि तेज कोटि लपले ऐसा विभू देखिला || १॥ अजंग० मी बोललो प्रार्थनि' शारदेसी । माते जरी तूं वरदान देसी || वाणी रसाला चदवीस काही । जे ऐकता साकर गोड नाही ||२|| आधीच या जैन कथेस गोडी । चाखोनि पाहा मग घ्या निवाडी || घेता बहू रोग तुटोनि जाती । होईल पुण्याश्रय थोर कीर्ती ॥३॥ जंबू महाद्वीप विशाल पाहे । त्यामाजि हे भारत क्षेत्र आहे || काशी बरा देश विशिष्ट जेथे । वाराणसी नम्र पवित्र तेथे ॥४॥ तेथे वसे भूपति पद्मनाभी | पुण्याश्रयी पूर्ण विशालनाभी ॥ त्या श्रीमती नाम कुभाव राणी | पुण्याविना केवल पापवाणी ॥५॥ वसंत I आला वसंत फुल्ले तरु मोग-याचे । जाई जुई बकुल चंपक पाडलीचे ॥ पुष्प फले लवति पादप अंबराई । छाया सुशीतल वनी जनि सौख्यदायी ॥६॥ उपेन्द्र ० आरूढ होउनि स्थावर हो कस । राजा निघाला रवि भास हो जसा ॥ पुढे बरे बोलति भाट वाणी । मार्गी जना वारिति दंडपाणी ||७|| सूर्यासवे जाइ सुदीप्ति जैसी । राणी नृपासंनिध होय तैसी || मार्गी जवे देखियले मुनीला । मासोपवासी दृढ हेत ज्याला ॥ ८ ॥ त्रिज्ञानधारी सुपवित्रदेही । सुदर्शन ख्यात जनात पांही ॥ I राजा तदा टाकुनि चाहनाला । भावे मुनीला प्रणिपात केला ||९|| १. बंदुनि, २. ग मालतीचे । :
SR No.090481
Book TitleSugandhdashmi Katha
Original Sutra AuthorN/A
AuthorHiralal Jain
PublisherBharatiya Gyanpith
Publication Year1966
Total Pages185
LanguageHindi, Apbhramsa
ClassificationBook_Devnagari, Story, & Biography
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy