________________
गुरु-शिष्य
करणार? हे काही खेळणी खेळायची नाही किंवा घरच्या देवघरातील मूर्तीना स्नान घालायचे नाही, असे तसे काहीच नाही.
प्रश्नकर्ता : पण मग स्वतः काहीच करायचे नाही? गुरूच सर्व करतील? दादाश्री : गुरूच करतील, स्वतः काय करणार? प्रश्नकर्ता : मग त्याला गुरू कशा तहेने पोहोचवतात?
दादाश्री : गुरूंनी स्वत:च्या गुरूंपासून आणलेले असते, ते त्याला देतात. हे सर्व परंपरेने चालत आलेले आहे. म्हणून गुरू जे देतील ते शिष्याने स्वीकारावे.
प्रश्नकर्ता : काही गुरू म्हणतात की, अभ्यास करा तर वस्तू' मिळेल.
दादाश्री : हो, बहुतेक सगळे असेच म्हणतात ना! दुसरे काय म्हणतील? 'हे करा, ते करा, ते करा.' करण्याने कधी भ्रांती जाते का? जर गुरूंच्या म्हणण्यानुसारच करायचे असेल तर असे घडणारच नाही ना? कुणी सांगितले की, 'आज खरे बोला' पण खरे बोललेच जात नाही ना? असे तर पुस्तकेही बोलतात. पुस्तके नाही का बोलत? परंतु त्यामुळे काहीच साध्य होत नाही? पुस्तकात सांगतातच ना की, 'प्रामाणिकपणे वागा,' पण कोणी वागला? लाखो जन्मांपर्यंत तेच तेच केले, दुसरे काहीच केले नाही. नुसती तोडफोड, तोडफोड, तोडफोडच केली आहे.
वर्तेल तेवढेच वर्तवू शकेल गुरूंकडे गेल्यावर आपल्याला काहीच पाळावे लागत नाही. पाळायचे असेल तर आपण त्यांना म्हणावे की, 'नाही साहेब, तुम्ही पाळा, मी कसे पाळणार? मी पाळू शकलो असतो तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? आता नाही पाळले जात याचे काय कारण? तर समोरची व्यक्ती की जी पालन करण्यास सांगत आहे, ती स्वतःच पाळत नाही. नेहमी, जिथे गुरू पाळतात तिथे शिष्य अवश्य पालन करतोच. म्हणजे हे सगळे बनावटीच आहे. मग गुरू आपल्याला सांगतात, 'तुमच्यात शक्ती नाही, तुम्ही पालन